Bluepad | Bluepad
Bluepad
आम्ही एकांकिका करणारचं आणि बरचं काही... 
श्री.धनंजय मोहन झोंबाडे
श्री.धनंजय मोहन झोंबाडे
22nd Sep, 2022

Share

परवा आदरणीय सरांचा फोन आला होता. ते म्हणाले की, आपल्या कॉलेजची अण्णा भाऊ साठेंच्या कथेवर आधारीत 'मरीआईचा गाडा' हि एकांकिका आहे. त्यासाठी तुला यावचं लागेल..! सरांच्या आज्ञेला 'होकार' दिला. आणि भूतकाळाचा विचार करू लागलो. आठ वर्षापूर्वीचा 'पट' एकदम डोळयांसमोर उभा राहिला. गेल्या आठ वर्षात काय-काय घडलं असेल आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात. नाटकाचं 'वेड' मनात घेऊन परिस्थितीला 'पराभूत' करायला निघालेली आमची दोस्त मंडळी आज काय करत असतील? अजूनही त्यांच्या डोक्यात 'नाटकचं' असेल काय?त्यामधले काही जण 'प्रयोगिक' व 'व्यावसायिक' रंगभूमीवर आज सुध्दा 'तग' धरून असल्याचे समाधान वाटते.
तुला यायला जमेल का? त्यांना 'नाही' म्हणता आलं नाही. पण कामाचा व्याप म्हणून जाता ही आलं नाही. मग मात्र आम्हाला एकांकिका व नाटकाचं वेड लावणाऱ्या हितेशला फोन लावला. सवयीप्रमाणे 'तो' उचलला गेला नाही. पुन्हा केला. पण उचलला गेला नाही. परंतु काही वेळाने 'त्यांचा'च फोन आला. मी मात्र फोन उचलला नि भरभरून बोललो. एकांकिके बद्दल विचारलं. जुन्या दोस्तांविषयी विचारलं. कॉलेजच्या नि एकांकिकेच्या अनेक गोष्टी ऐकून समाधान वाटलं. बदललेल्या काळात कॉलेजचा एकांकिका 'संघा'कडे पाहाण्याचा दृष्टिकोन सुध्दा 'अनुकूल' झाल्याचं हितेश सांगत होते. मला मात्र संकटांचा, अपुऱ्या साधनांचा, नकारात्मक विचारांचा काळ आठवत होता.
हितेशला तब्बल दिड-दोन वर्षांनी बोललो होतो. त्यांच्याकडूनचं अशिषचा नंबर घेतला. त्याला ही बोललो तब्बल तीन वर्षांनी. पण अशिष नेहमी सारखाचं विनोदी आणि गंभीर बोलला. 'प्रयोगा'ला या असं त्यानेही आग्रहाने सांगितलं आहे...त्यालाही 'हो'चं म्हणालोय.
हे सगळं घडत असताना मला जुना काळ आठवत होता. 'आम्ही एकांकिका करणारचं' आणि 'शाहाऱ्या' अशा दोन एकांकिकेच्या दरम्यान घडलेले सगळा प्रवास. जो प्रवास आयुष्याला ही एक वेगळं वळण देवून गेला. अनेक जीवाभावाचे मित्र जोडले गेले. सहकार्य, आदर, नम्रता, संयम, सकारात्मकता अशा अनेक गुणांचा विकास सुध्दा झाला. आनंद मिळाला. समाधान भेटलं. भांडण झाली. रूसवे-फुगवे झाले. अडचणी आल्या. अपमान झाले. पण सगळयांना पुरून उरेल असा दांडगा आत्मविश्वास 'टिम' मध्ये होता. म्हणून चांगलं काही करू शकलो. कमी बजेट, मुलींनी काम करू नये अशी घरची मानसिकता, यांना काय कामचं नाही? असं म्हणणारा एक वर्ग. प्रॅक्टिसला जागा नाही. हिशोबनीसांकडून नेहमीचं अडवणूक? अगदी शिपाई सुध्दा हसायचे. पण अशा ही वातावरणात 'उजेडाची स्वप्ने' घेऊन आमच्यातला प्रत्येक जण पुढे जात होता. हे स्पिरीट फक्त आणि फक्त 'परिस्थितीनं' दिले होते. मात्र याही वातावरणात तेव्हाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आणि काही प्राध्यापक मंडळींची तळमळ आजही प्रेरणा देते. सोबतचं ग्रंथपाल, लिपीक, सेवक यांची झालेली मदत कधीचं विसरता येत नाही. आदरणीय सर तर 'बी पॉझिटिव्ह...डोन्टवेरी' असं म्हणून आत्मविश्वास वाढवायचे. महाविद्यालयात उत्साह निर्माण व्हावा म्हणून आनंदाने 'फलक लेखन' करायचे. प्रयोगाला यायचे. दिवस बदलतील याची हमी द्यायचे.
खरं तर एकांकिका, कला आणि कौशल्यां विषयी 'उपनगरात' जसा उत्साह नसतो तसाचं विचार' उपनगरातल्या महाविद्यालया 'विषयी' आयोजकांनीही केलेला असतो. याची जाणीव पदोपदी होत असे. 'संघप्रमुख' म्हणून 'मिटींग'ला हजर झालो की हमखास याची प्रचिती येत असे. पण पोराचं स्पिरीट बघायचे नि रात्रीची मिटींग विसरून कामला लागायचो.
तसं पाहिलं तर इतर महाविद्यालयाकडे 'चेअरप' करायला तगडी टिम सज्ज असायची. पण आमच्याकडे बोटावर मोजता येतील इतकीचं स्नेही मंडळी. त्यामुळे आम्हाला 'खालून' चेअरप मिळायचं नाही. खरं म्हणजे आम्ही एकांकिकेत काम करणाऱ्या प्रत्येकाच्या मित्राने किंवा नातेवाईकाने तिकीट घेतलेले असायचे. फार-फार तर २५ ते ३० तिकीटे खरेदी व्हायची. तिकीटांचा हिशोब घेऊन 'भरत'ला गेलो तर गेटवर उभा असलेला 'वॉचमन' सुध्दा विचारायचा 'टि.ज.कॉलेज का? मग मात्र निराशा वाटायची. पण करणार तरी काय?
कॉलेज मधून 'प्रॉक्टिस'ला जागा मिळत नसायची. एकचं जिमखाना हॉल. तिथेही रोजचं एखादा कार्यक्रम असायचा. ज्या दिवशी हॉल मध्ये कार्यक्रम असायचा. त्या दिवशी तयारीचे तीनतेरा व्हायचे. मग अशिष, प्रशांत आणि हितेशची धावपळ सुरू व्हायची. त्यामुळे कधी लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे प्रांगण, तर कधी बुध्द विहार, कधी राणी लक्ष्मीबाई उद्यान, तर कधी ग्रंथालय समोरील मोकळी जागा. पण प्रॉक्टिस जोरदार व्हायची. अशा अवस्थेतून नाटकाची जास्तचं तळमळ असणारा राहूल एका प्राध्यापकाशी कडाक्याचं भांडला होता. हेही आज आठवत आहे.
कॉलेज कडून अत्यंत कमी पैसे मिळायचे. त्यामध्ये सगळे बसवावे लागायचे. म्हणून कमी पैशात 'संगीत' करून मिळावे म्हणून मी, हितेश, अशिष आणि राहूल मुसळधार पावसात सुध्दा 'गाडी नं ११' ने अनेक 'स्टुडिओ'च्या पायऱ्या पालथ्या घालायचो. कमी बजेट आणि मुलांची मागणी जास्त त्यामुळे माझे आणि त्यांचे 'शीतयुध्द' सुध्दा होत असे. अनेकदा इच्छा असूनही मी पोरांना 'वडापाव' शिवाय दुसरं काही खाऊ घालू शकलो नाही. त्याची 'खंत' आजही वाटत आहे. अशिषची इच्छा बऱ्याच वेळा 'नॉनव्हेज'ची असायची. अशा वेळी मी स्वप्निल आणि प्रशांतला पाठवून गरमागरम वडापाव मागवायचो. त्या गरमागरम वडापावमुळे अशिषही 'नॉनव्हेज' विसरून जायचा.
सादरीकरण करताना 'टिमवर्क' गरजेचे असते. सर्वांनी वेळेवर यावं. गंभीरपणे घ्यावं. या हेतून मी अनेकांवर 'रागवायचो' नंतर लगेच प्रेमाने बोलायचो. आणि एकत्र  येऊन एकांकिकेचा विचार करायचो. परिणामी 'आम्ही एकांकिका करणारचं' चा प्रयोग बराच गाजला. अपेक्षेप्रमाणे अशिषला 'अभिनया'चं पारितोषिक मिळाले. नितीनची भूमिका विशेष गाजली. अर्थात 'टिमवर्क'चं ते यश होतं. यामध्ये हितेशच दिग्दर्शन, राहूलच संगीत, रोहितची लाईटस आणि मंगेशच नैपथ्य या सगळया गोष्टी जुळून आल्या होत्या.
नंतर 'शाहाऱ्या' करताना इतक्या अडचणी आल्या नाहीत. टिम चांगली मिळाली. नव्याने काही मंडळी सहभागी झाली होती. त्यामुळे शाहाऱ्या करताना अनेक गोष्टी सोप्या झाल्या. पण प्रॉक्टिसला जागा 'न' मिळणं तेव्हा ही कायम होतं. स्र्किप्ट सगळयांना पाठ झाली होती. कमी बजेट असल्यामुळे स्वत:चे दोन पैसे घालून किंवा घरची साधने वापरून खर्च कमी करण्यास मदत करू शकणारा पोरगा 'बॅकस्टेज' साठी शोधत होतो. अशातचं वर्गमित्र मंगेश भेटला. त्याला 'बॅकस्टेज' प्रमुख करून मोकळा झालो.
ज्या हेतून मंगेशला पुढे केलं होतं. तो त्याने पूर्ण ही केला. मंगेश खरं तर फार शांत माणूस, प्रेमळ मित्र, संवेदनशील विद्यार्थी, माणुसकी जपणारा तरूण. मंगेश घरून पाच-पाच पोरांचा डब्बा घेऊन यायचा. घरी चारचाकी वापरून कामे सोपी करून दयायचा. पदरमोड करून गाडीत 'प्रेट्रोल' टाकून मिटींग व इतर व्यवस्थापनाच्या कामासाठी हजर असायचा. त्यामुळे खूप काही कामे बिना पैशाचीच व्हायची. म्हणून कधी-कधी स्वत:चीचं पाठ 'थोपवून' घ्यायचो की मंगेशला पुढे करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि त्याचा फायदा झाला.
टिम मधल्या एका-एका पोरांविषयी असंख्य आठवणी आहेत. प्रशांत चांगला गुणी कलाकार. पण, त्याला टिममध्ये घेण्याचा हेतू की त्याच्याकडे गाडी आणि फोन सुध्दा आहे. आजच्या सारखं 'जिओ' तेव्हा नव्हतं. त्यामुळे आमच्या टिमसाठी 'अनलिमिटेड संवाद' साधण्यासाठी मोबाईल देणारा प्रशांतचं आमचा 'जिओ' किंवा 'फोरजी' झालचं तर 'मुकेश अंबानी' होता.
'शाहाऱ्या'च्या वेळेस आम्ही एक गोष्ट केली होती की, मी आणि मंगेश व चंदनने एन.एस.एसच्या मित्रांना 'चेअरप'साठी येण्याची विनंती केली होती. त्याला प्रतिसाद देऊन अनेक मित्रमंडळी 'शाहाऱ्या' बघायला आली होती. आम्ही 'बॅल्कआऊट' मध्ये सेट उभारत होतो नि खाली 'आव्वाज कुणाचा.....टिजे..टिजे...टिजे...
हिप..हिप..हुर्रे..अशा घोषणांनी 'भरत' दणाणून गेलं होतं. दुसरं म्हणजे आमची तळमळ बघून महाविदयालयाने प्रत्येकी १३० रूपये व आम्ही प्रत्येकी १०० रूपये घालून पुढे कॉलेजचे नाव असणारे 'टि शर्टस' छापून घेतले होते. त्यावर मी आणि काळे मॅडमने विचार करून 'विस्तारणारी क्षितीजे, उंचावणाऱ्या आशा,असे आम्ही टिजेन्स' असा संदेश पाठीमागे टाकून घेतला होता. त्यामुळेही टिम मध्ये उत्साह होता.
 टिम मध्ये असणाऱ्या प्रत्येकाच्या असंख्य आठवणी आहेत. प्रत्येकाने दिलेला आदर, सन्मान आज ही स्मरणात आहे. अशिष टिळक, हितेश, नितीन, प्रशांत, विशाखा, राहूल, आनंद, तुषार , विशाल, प्रिया, वाजेद, स्वप्निल, सागर, क्षितीजा, संदीप, मयुर, अमोल, अश्विनी, अफरीन, रोहित, प्रेम, मंगेश, आरती अशी खूप मोठी मित्र मंडळी नाटकाच्या माध्यमातून जोडली गेली होती. 'संघप्रमुख' असल्या कारणाने अनेकांवर रागवावे लागत असे. पण मनात कोणतीचं 'कटुता' नव्हती हे मात्र नक्की.
मागे वळून पाहाताना 'तो' काळ फारचं कठीण वाटतोय. पण आज निर्माण झालेली सकारात्मक खूपचं बळ देणारी आहे. महाविद्यालयात तयार झालेलं 'अनुकूल' वातावरण हि चांगली बाब आहे. अशिष सांगत होता की, महाविद्यालयातील प्रत्येकाचा एकांकिका संघाकडे बघण्याचा दृष्टिकोन फारचं बदलला आहे. आता सगळे नाटकची आस्थेनं चौकशी करतात. मला व हितेशला 'सन्मानाने' बोलवलं जातं. आदरणीय सर 'सांस्कृतिक विभागप्रमुख' झाल्या पासून त्यांनी वातावरण बदलायला खूपचं प्रयत्न केले आहेत. आता ग्रंथालयाच्या समोर नाटकाच्या 'प्रॅक्ट्रिीस'साठी स्वतंत्र 'हॉल'आहे. सगळं कसं छान आहे. अशिष फोनवर सांगत होता नि मला फार आनंद झाला होता. तेव्हा मला आदरणीय सरांच वाक्य आठवयला लागलं की, हे दिवस जातील. दिवस काही घर बांधून राहत नसतो.
सामाजिक समतेची चळवळ पुढे घेवून जाणाऱ्या साहित्यिकांमध्ये अण्णा भाऊंचा समावेश होतो. त्यांची 'मरीआईचा गाडा' हि कथा विज्ञानवादाचा पुरस्कर करते. त्यातील 'नाना' नावाचे पात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात अंधश्रध्दा बाळगणाऱ्यांना 'चपराक' देतो. त्या दृष्टिकोनातून हि एकांकिका फारचं महत्वाची आहे. याची जाणीव 'परीक्षक' आयोजक आणि प्रेक्षकांना झाल्याशिवाय राहाणार नाही. असा आशावाद वाटतो आहे. बाकी विजय आणि पराजयात न पडता हि एकांकिका 'टॉप नऊ' मध्ये येईल यात कोणतीचं शंका नाही.
आता थोडं आताच्या नव्या संघासाठी काही सांगावं वाटतंय.  आपण एकजुटीनं राहा. ऐकमेकांविषयी आदर ठेवा. सकारात्मक राहा. प्रयोगाला भेटूचं. पुन्हा एकदा एकांकिका प्रयोगाला मनपूर्वक शुभेच्छा....! तुम्हा सर्वांना चेअरप करण्यासाठी आम्ही सगळे येत आहोत. आव्वाज कुणाचा...टिजे...टिजे...टिजे...टिजे...टिजे...टिजे..!!
साहीर सुधीर लुधीयानवी लिहितो की,
 कौन कहता है की,
आसमान में छेद नहीं होता
एक पत्थर तो 'तबीयत' से उचालो यारो...!!
आम्ही एकांकिका करणारचं आणि बरचं काही... 

180 

Share


श्री.धनंजय मोहन झोंबाडे
Written by
श्री.धनंजय मोहन झोंबाडे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad