Bluepad | Bluepad
Bluepad
हे जीवन सुंदर आहे....
Prakash Dalke
Prakash Dalke
22nd Sep, 2022

Share

Hii.. माझा मित्र आणि मी काल गार्डन मध्ये बसून होतो.. मी त्या सोबत गप्पा करत होतो तरी तो मोबाईल मध्ये गुंतून होता मला तर त्याचा रागच आला. मी चिडून त्याला म्हटलं काय त्या मोबाईल मध्ये इतका तोंड खुपसून बसला आहे, मी काय बोलत आहे लक्ष तरी आहे का ?? तो उत्तरला शेवटचे पाच मिनिट. फक्त इतकं बोलून परत तो मोबाईल मध्ये गुंतून गेला. पाच मिनिटांनी अचानक जोरात ओरडला," शिट यार!! थोडच बाकी राहिलं होत. मला तर कळेनासं झालं. मी त्याला उलट प्रश्न केला काही समस्या आहे का? काय बाकी राहील ?
तो उत्तरला, ' अरे आज माझा नेट पॅक संपणार होत तर मी वेळेच्या आत माझ् नेट पॅक वापरणार होतो तरी बरेच व्हिडिओ आणि फोटो डाऊनलोड करायचे राहिले.
मी थोडं स्मितहास्य करत म्हटलं अरे जाऊ दे कशाला लोड घेतो परत रिचार्ज कर आणि डाऊनलोड कर. तरी त्याच्या चेहऱ्यावर काही तरी गमवल्याच दुःख दिसत होत. थोड्या वेळाने आम्ही घराच्या दिशेने निघालो. मनात एक विचार आला माणूस किती विचित्र आहे नाही. काही गोष्टी संपणार आहे हे माहिती आहे म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत पुरेपूर वापर करून घेतो मग हे आयुष्य पण एक दिवस संपणार आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुठलीही पूर्वकल्पना न देता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माणूस हा काही पैशात मिळालेला मोबाईलचा डाटा संपणार म्हणून त्याचा एक क्षण ही व्यर्थ न गमावता पूर्ण वापर करून घेतो आणि आयुष्यातील कित्येक क्षण हे निरर्थक वाया घालवतो.
मित्रांनो कितीतरी लोकांना स्वतःच आयुष्य त्याच्या पद्धतीने जगायचं असत तरी लोक काय म्हणतील या भीतीने ते जगण्याचा आनंद गमावून बसतात. कधीतरी एखाद्या चित्रकाराला विचारा की त्याने ज्या वेळेस एखादे चित्र रेखाटले त्यांनतर कुणाला तरी विचारलं का की यात कुठला रंग भरायचा . स्वतः रेखाटलेल्या निर्जीव चित्रामध्ये जर रंग भरताना चित्रकार कुणाला विचारत नाही, तर आपल्या आयुष्यात रंग भरताना लोक काय म्हणतील याचा विचार का करायचा ?आता माझा उद्देश हा नाहीं की मनात पडेल ते करा. नाहीतर काही लोकांना वाटेल की रणवीर सिंग सारखे नग्न फोटो नेट वर टाकणे हे पण जीवनाचा उपभोग घेण्यासारखे आहे. समाजाने आखून दिलेल्या चौकटीत राहून पण आपण जीवनाचा आस्वाद घेऊ शकतो.
लोक काय म्हणतील याचा एक उत्तम उदाहरण काही दिवसाच्या अगोदर वाचण्यात आलं.. एक प्रजादक्ष राजा आपल्या प्रधानाला चर्चा करताना म्हणतो की प्रधानजी,' हे राज्य माझं नसून यावर पूर्ण अधिकार माझ्या प्रजेचा आहे म्हणून माझी अशी इच्छा आहे की या पुढे कुठलाही निर्णय हा प्रजेला विचारून घेण्यात यावा.यावर प्रधानजी उत्तरता की, माझी हरकत नाही पण फक्त माझी एक इच्छा आहे, की कुठलीही उणीव नसणारी एक मूर्ती उद्या राजदरबरात ठेवण्यात यावी. राजाला या मागील रहस्य काही उलगडत नाही तरी मूर्ती ठेवायला राजा स्वीकृती देतो.
दुसऱ्या दिवशी राजदरबार एक एक मूर्ती ठेवण्यात येते. प्रधानजी घोषणा करतात की, ज्या कुणालाही या मूर्ती मध्ये उणीव दिसत असेल त्यांनी पुढे येऊन निदर्शनास आणावे. काही वेळात एक एक नागरिक येऊन उणीवा सांगू लागतोआणि त्याच प्रमाणे शिल्पकार त्यात बदल करू लागतो. कुणाला डोळे लहान वाटत होते तर कुणाला मोठे, कुणाला नाक लांब वाटत होत तर कुणाला चपट असे बरेच बदल झाल्यावर मूर्ती नव्याने तयार होते.. आता नव्याने तयार झालेल्या मूर्तीवर राजाने जेव्हा कटाक्ष टाकतो तेव्हा तो थकचं होतो. ज्या मूर्तीला उणीव विरहित म्हणून राजाने आपल्या राजदरबारात स्थान दिलं होत. त्या मूर्तीकडे बघवत पण नव्हत.ती मूर्ती इतकी कुरूप झाली होती. आता ही गोष्ट सांगण्याचा उद्देश हाच की आपल आयुष्य पण एक शिल्पच आहे आणि देवाने प्रत्येकाला ते शिल्प स्वतः निर्माण करायला दिलं आहे. म्हणून लोक काय म्हणतील वां लोक सांगतील त्या पद्धतीने जर जगणं सुरू केलं तर आपल आयुष्य रुपी शिल्प कुरूप व्हायला वेळ लागणार नाही. आता माझा सांगण्याचा उद्देश हा नाही की आपल्या जवळचे लोक काय म्हणतील या कडे पण काना डोळा करायचा ज्या प्रकारे एका चांगल्या चित्रकाराला एखाद्या चित्रा विषयी अथवा शिल्पकराला एखाद्या शिल्पा विषयी त्रुटी काढण्याचा पुरेपुर अधिकार असतो त्याच प्रमाणे आपल्या हितचिंतकांना पण आपल्या आयुष्यात बद्दल काही निर्णय घेण्याचा अधिकार असतो. आणि बाकी लोकांन साठी एकच सांगा वाटते...
कूछ तो लोग कहेंगे,लोगो का काम हैं कहना......!!!!!
धन्यवाद..💐💐
प्रकाश डालके... 7350189200

170 

Share


Prakash Dalke
Written by
Prakash Dalke

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad