Bluepad | Bluepad
Bluepad
नारीशक्ती
Neha Sankhe
Neha Sankhe
22nd Sep, 2022

Share

नारीशक्ती
तूच जगदम्बा तूच भवानी तूच लक्ष्मी तूच महाकाली
सगळीच रूप तुझे असती नारी सगळेच रूप तुझे असती
तू थांबू नकोस तू चाल ,चालू नकोस तू धाव
एक दिवस तुच बदलेल इतिहास हे जाण
नाना रुपानी तू सजतेस बहरतेस सौंदर्य फुलवितेस
कधी तु गृहलक्ष्मी तर कधी महाकालीसम रणरागिणी होतेस
द्रौपदीसम वचनबद्ध राहणारी महिषासुरमर्दिनी तूच ती वीरांगणाही
सामर्थ्थवान तू ,सहनशीलता तू वेळप्रसंगी दुर्गेचे रूप धरती
सोज्वळ तू , निरागस ही माता सरस्वती समान संयमी
स्वाभिमानी जगतेस प्रसंगी चंडिकेचे रूप घेऊन तांडव घाली
पार्वती सम एकनिष्ठ तू समर्पणी अन त्यागी
सीतेसम पतिव्रता तू अन् लक्ष्मी समान असतेस सधा विष्णु सोबती
वंशाचं बीच रुजवते , वाढवते अन् जन्म देतेस तू
सृष्टीचे पालन करणारी तूच भवानी असतेस नारी
अवघी सृष्टी अपूर्ण तुजवीण तू आहे महाशक्ती , सर्वशक्तीमान
हो मुक्त तू बंधनातूनी हे विश्व सारे तुझेच गीत गाती
नवदेवी ही तुझेच रूप असती नारी
बाळग थोडे स्वप्न उराशी मी आणि जग थोडीशी तुझ्यासाठी ही

0 

Share


Neha Sankhe
Written by
Neha Sankhe

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad