Bluepad | Bluepad
Bluepad
गरिबी...
Vikas chavan
Vikas chavan
22nd Sep, 2022

Share

गरिबी...
गरीबी ही कशी दिसते तिचा रंग कोणता ती स्त्री आहे का पुरुष हे देखील मला
माहीत नाही...
गरीबी काय असत हे मला मी लहानपणी शाळेत असताना समजलं शाळेत जायला दप्तर लागते ते घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते बाजाराची पिशवी घेऊन शाळेत जायचो मुलांच्या अंगावर शाळेचा गणवेश असायचा माझ्या अंगावर फाटलेल शर्ट आणि ठिगळ लावलेली पेंड तेव्हा सगळे मूल मला चिडवायचे माझी मस्करी करायचे तेव्हा मला गरिबीची जाणीव झाली..
जसा जसा मोठा होत गेलो तस तश्या जबाबदाऱ्या वाढायला लागल्या घरात आई आणि एक बहीण वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलं होतं
हळू हळू बहीण मोठी होत गेली तिच्या लग्नाची जबाबदारी माझी होती
लग्नाच्या बोलणी साठी माझी आई अन मी गेलो तिथंही तोच प्रश्न मुलाला हुंडा किती देणार पैश्यांची मागणी झाली त्यांच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नव्हतो कारण तिथंही मला गरिबी आळ आली
सर्वात जास्त गरिबीची जाणीव मला
तेव्हा झाली जेव्हा माझी आई मला सोडून गेली ते म्हणतात ना 'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी" तसा मी भिकारी झालो होतो तेव्हा संपूर्ण जगात माझ्या इतका गरीब कोणी नव्हता कारण माझी आई माझ्या सोबत नव्हती....
लेख आवडला असेल तर नक्की प्रतिक्रिया कळवा
लेखक & कवी
✍विकी
गरिबी...

179 

Share


Vikas chavan
Written by
Vikas chavan

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad