Bluepad | Bluepad
Bluepad
देहाचियारंगी २४
Vidyadhar Pande
Vidyadhar Pande
22nd Sep, 2022

Share

सिमींता
मी स्वप्नातून जागी झाले होते.
मामी म्हणत होत्या,
" आग अजून परशा दुदू घीऊन आला नाय."
मी चुल पेटवता पेटवता थांबले.दिवस उजडायला पांदीला जायची मला लाज वाटायची.म्हणून पहाटेच जात असे.आज उशीर झाला उठायला.संडासला जायच राहीलं.पोटात तगमग होऊ लागली.दिवसमावळेपर्यंत सहन केल्याशिवाय पर्याय नव्हता.त्या तगमगीत भिंती भिंतीवर लावलेल्या जाहिराती आठवू लागल्या.हगंणदारी मुक्त गावच्या पेपरमधील बातम्यांच्या हेडलाईन्स डोळ्यात अंजन घालू लागल्या. एकदा सरपंच आचुतभाऊनी मी हातात तांब्या घेऊन जाताना अंधारात पाहिले.लगेचं संदीप भाऊला फोन केला.' तुझ्या बहिणीला सांग संडास बांधण्यासाठी सरकारी अनुदान आले आहे.कागदपत्रं द्या म्हणावं.'
पण मी शिकलेली असून दुर्लक्ष केले.त्याचं महत्व आज जानवू लागलं.आणि लगेच ठरवून टाकलं.दोन दिवसांत ग्राम पंचायतीत कागदपत्रं दाखल करून टाकायचे.गावात घरोघरी जाऊन महीलांमधे हगंणदारी मुक्तीची जागृती करायची.
लाजेपोटी,इभ्रतीसाठी स्त्री जातीनं किती कुचंबना सहन करायची? भावभावनांचा चुराडा करायचा.समाजाच्या दडपणाखाली जगत रहायचं.नाच ग घुमा काय सांगते? मोठ्या घरात काय आणि छोट्या घरात काय स्त्रीची तिच दुरावस्था.सगळा पावलोपावली चकवा.कितीही योग्य नियोजन करा,ते बिचढवयाच काम पुरुषांनी मुद्दाम करायच.मग ती स्त्री कितीही शिकलेली सुजान असो,तीचा सामाजिक स्तर उंचावलेली विचारवंत असो.ती पुरुषांच्या हातातील खेळणं.मनात आलं की एका क्षणात मोडनं ठरलेलं.माधवीताई भालजी पेंढारकरांनसारख्या महान व्यक्तिमत्वाच्या कन्या, रणजीत देसाई यांच्या दुसऱ्या पत्नी.दोघेही दुसवटे.महाराष्ट्राचे भाग्यविधाते थोर विचारवंत यशवंतराव चव्हाण यांच्या सहवास लाभलेले प्रतिथयश लेखक पद्मश्री प्राप्त रणजीत देसाई यांच्या दंभाला आणि दांभिकतेला बळी पडल्या.अनेक वर्षे साथसंगतीत संसार करून सुखी जीवनाच स्वप्न भंग करावं लागलं.त्यांना मजबुरीने कोर्टात जाऊन घटस्फोटाच्या पेपरवर सही करावी लागली.फार हिरमुसलं त्यांचं जीवन.त्यांच्या त्या व्यथा म्हणजे ' नाच ग घुमा . ' हे आत्मचरित्र वाचताना कित्येकदा डोळे भरून आले.मन विशादाने सुन्न झाले.अनेक विचारांचे ढगं जमा झाले.कधी रिमझिम तर कधी धोधो पाऊस.गढूळ पाण्याचा अनेकदा महापूर.त्यात वाहुन जाण्याची भीतीही मनाला शिवून गेली.दुसऱ्या पतीच्या कल्पनेने मन कोलमडलं.मनात भयान असा एक कोपरा तयार झाला. माधवी देसाईंना भाग्यविधातेंचा सल्ला डावलून एका पुरुषाने हरवले.त्या पुरुषत्वाचा धिक्कार केला पाहिजे.असे मनोमन वाटु लागले.पण ते बळ आणायचे कोठून? हा ही प्रश्न भेडसावू लागला.
माझ्या मनपटलाच्या आकाशावर जमलेले पुरुषी अहंकाराचे व वर्चस्वाचे मळभ काही केल्या दूर जाईनासे झाले.त्यातच दुसऱ्या विवाहाचे स्वप्न कोमेजून जाऊ लागले.आई होण्यासाठी आसुसलेल्या गर्भात भृण तयार होण्याधी त्याची हत्या होणार का ? अशा विचारांनी मन सैरभैर झाले.पंधराविस दिवस झाले तरी नाच ग घुमाचा प्रभाव व पुरुषी वर्चस्वाचा तिरस्कार ओसरत नव्हता.वाचनालयात पुस्तक बदलण्यासाठी जावसं वाटत नव्हते.अभ्यासाची काळजी नव्हती.ते परीक्षेचे दिवस दुर होते.वाटायलं, काय करावे शिकून? कसल्याही स्त्रीला अवहेलने शिवाय काहीच मिळणार नसेल तर शिक्षणाचा उपयोगच काय ?
खाली मान घालून नोकरी करण्यासाठी ,
देहाचियारंगी २४
पैसे कमावण्यासाठी, जगण्यासाठी, रुढी परंपरेचे अनैसर्गिक, अनैच्छिक बंधनं झुगारुन देण्यासाठी नेमकं कशासाठी शिक्षण घ्यायचे? अशा विचारात माझे दिवस निघून जाऊ लागले.
क्रमशः

179 

Share


Vidyadhar Pande
Written by
Vidyadhar Pande

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad