Bluepad | Bluepad
Bluepad
🔥 दुसऱ्या महायुद्ध संबंधित पुनर्जन्माची एक रोचक कथा ( भाग.2)🔥
उपेंद्र सावंत
उपेंद्र सावंत
22nd Sep, 2022

Share

To be continued.......
                         शेवार्डने त्याची काही गुपित उघड झाल्याने त्या जहाजावरील 27 माणसांना विषबाधा करून मारून टाकलं. त्यांच्या कारस्थानात  इंग्लंडवर हल्ला करण्याची योजना अंतर्भूत होती. काही रासायनिक शस्त्र निर्मितीकडे कल होता. शेवार्डला बर्नोल्ड बरोबर स्वीडनला पोहोचायचे होते. ते दोघेही टर्की ( Turky) ते स्वीडन( sweden ) पाणबुडीने ( submarine ) पोहोचले होते. त्या ठिकाणी आणखी चार माणसं त्यांच्या योजनेत सामील झाली. ते नॉन जर्मन होते. मग तेथून त्यांनी एक मोठी वॅगन घेतली. शेवार्ड स्वतः ड्राईव्ह करत होता. पण वॅगनखाली लँडमाईन्स ( land mines)आल्याने स्फ़ोट ( explosion 🔥) होऊन शेवॉर्ड मारला गेला.
      .. मोहीम( mission )पूर्ण न करू शकल्याची खंत गौतम मधील अस्तित्वात असलेला पूर्वजन्मीचा शेवार्ड दुःखी होऊन बोलत होत. मोहीम पूर्ण न झाल्याचं शल्य वर्तमान स्थितीत देखील त्याला भासत होतं. कारण शेवार्ड हे व्यक्तिमत्व, गौतमच्या अंतरंगात कुठेतरी जिवंतच होतं. गौतम ची मैत्रीण शिल्पा हे सर्व ऐकताना सुन्न झाली होती. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक एक भाग.... आठवताना त्यामध्ये पूर्व जन्माच्या व्यक्तिमत्त्वाच्या... झलका, छटा ... तिने स्वतः अनुभवल्या होत्या. प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याच्या पूर्वजन्माचं अस्तित्व कुठे ना कुठे दडलेलं असतंच! पूर्व जन्मांच्या स्मृती या जन्मी देखील मानवाला प्रभावित करत असतातच! फक्त त्याना शोधता आलं पाहिजे. हा विषय फार गहन आहे.
     इथे पूर्वजन्माची कथा महत्त्वाची नाही. आपल्या अंतरंगाचा शोध घेताना त्यामधून दिसून येणारे आपल्या मनाचे कंगोरे आत्मशोध घेण्यास मदत करतात. तुमचा भूतकाळ तुम्हाला सतत प्रभावी करत असतो. याकरिता आपल्याला भूतकाळात जगण्याची गरज नाही. मात्र भूतकाळातून काही बोध घेणं फार गरजेचे आहे. संपूर्ण विश्व हे विश्व उत्क्रांतीमय( evolution )आहे. एका जन्मात सर्व करणे शक्य नाही. विकास हा हळूहळू होत जात असतो. त्यासाठी सहनशीलता आवश्यक असते.
      गौतमचं पूर्वजन्मीचं व्यक्तिमत्व त्याला प्रभावित करत होतं. त्याचे चांगले वाईट परिणाम त्याला भोगावे लागत होते. गौतमच्या मैत्रीण शिल्पामुळे त्याच्या स्वभावातील काही गुणदोष, चांगल्या वाईट गोष्टी इथे नमूद कराव्याशा वाटतात.
1) पूर्वजन्मीच्या काळात एक गुप्तचर संस्था शेवार्डच्या मागे त्याला पाठिंबा देण्याकरिता कार्यरत होती. त्याच अविर्भावात गौतम ह्या जन्मात देखील जगू पाहत होता. मात्र या जन्मा त्याच्या मागे कोणीही ठामपणे उभे नव्हते. हे त्याला समजून घेणं गरजेचं होतं.
2) गौतमला देखील लहानपणापासून वेगवेगळ्या शस्त्रास्त्रासंबंधी माहिती गोळा करण्याचा शौक होता.
3) गौतम च्या पूर्व जन्मात  एका देशाची संस्था त्याच्या पाठीमागे असल्याने त्याची कामे सहजपणे होऊन  जात असत. परंतु आता तसे नव्हते.
4) पूर्वजन्मी कोणतीही गोष्ट त्याला सहजपणे उपलब्ध होत असे.... परंतु आता त्याला सर्व गोष्टी स्वतःच्या स्वतः पाहाव्या लागत होत्या. त्याला तो कंटाळून चिडा चिड करत असे.
5) पूर्वजन्मीचा नाझी कॅप्टन हा स्वतःचं म्हणणं पुढे रेटणारा होता.... कारण त्याच्या हातात विशेषाधिकार होते. परंतु तोच भाग गौतम आता, या जन्मातही करू पाहत होता. त्यामुळे इतरांशी त्याची भांडणे होत असत.
6) पूर्वजन्मी  एका गुप्तचर संघटनेशी संबंध आल्याने प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करण्याची... संशय म्हणून पाहण्याची प्रवृत्ती ह्या जन्मी देखील गेली नव्हती. त्याच्या ह्या प्रवृत्तीला इतर जण कंटाळून जातं. तो सतत आंतरराष्ट्रीय ( international ) घडामोडींवर लक्ष ठेवून असे. तसं पाहायला गेलं तर त्याचा त्या गोष्टींशी काही संबंध नसे. ही त्याची पूर्वजन्मी मनाला लागलेली सवय होती. ही सवय तो ह्या जन्मी सुद्धा कॅरी फॉरवर्ड ( carry forward )करत होता.
  7) या जन्मी गौतमला विषबाधेमुळे  दोन वेळा हॉस्पिटलला ऍडमिट व्हावे लागले होते. त्याला झालेला फूड पॉइजनिंग( food poisoning )मुळे त्याच्या जीवावर बेतले होते. पूर्वजन्मी केलेल्या 27 लोकांचा विषबाधा करून  त्याने मारलं होतं. कर्माचा काही भाग पुन्हा फिरून येत असतो. असो!
           यावर प्रत्येकाने विचार केला पाहिजे.
( या ठिकाणी  पूर्व जन्माचा भाग महत्त्वाचा नसून, त्यातून घ्यावयाचा बोध जास्त महत्त्वाचा ठरतो. पुन्हा एकदा सांगतो... Past life regression वगैरेच्या फंदात सहसा कोणी पडू नये. इथे मी सर्व सत्य घटना... ज्या मी स्वतः अनुभवलेल्या आहेत... त्याच नमूद करत आहे. इथे ज्ञान रंजन अपेक्षित आहे, मनोरंजन नाही  🙏🙏🙏🌹🌹🌹)
      गौतम आपल्या स्वतःच्या मनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यास यशस्वी ठरला आहे. तो आपले पुढील जीवन जगत आहे. भूतकाळातून वाहून आलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कर्माचे पडसाद, भावनांचा भाग त्याला समजून चुकले आहेत. त्यातील काही भाग सुधारण्याचा प्रयत्न गौतम कसोशीने करत आहे. 🙏🙏🙏
🔥 दुसऱ्या महायुद्ध संबंधित पुनर्जन्माची एक रोचक कथा ( भाग.2)🔥
          
        

0 

Share


उपेंद्र सावंत
Written by
उपेंद्र सावंत

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad