Bluepad | Bluepad
Bluepad
🔥 दुसऱ्या महायुद्धा संबंधित पुनर्जन्माची एक रोचक कथा ( भाग.1)🔥
उपेंद्र सावंत
उपेंद्र सावंत
22nd Sep, 2022

Share

गौतम हा इंजिनियर म्हणून एका कंपनीत कार्यरत होता. सतत जॉब बदलण्याचा त्याचा मनाचा कल असे. त्याच्या चिडखोर स्वभावाने( short tempered)त्याने अनेकांना दुखावले होते. छोटे फुटकळ विवाद मोठ्या भांडणात रूपांतरित केल्याने त्याला अनेक शत्रू निर्माण झाले होते. त्याच्या झपाटल्याप्रमाणे काम करण्याच्या सवयीने, त्याचे वरिष्ठ खूश असत. परंतु त्याच्याबरोबर काम करणारी इतर माणसे गौतमचा अति उत्साहीपणा व कामाचे विचित्र नियोजनाने गडबडून जात असत. त्याच्या महत्वकांक्षा फार मोठ्या होत्या.
    सहजपणे अवतीभवती घडणाऱ्या छोट्या बाबींमध्ये त्याला षडयंत्र असल्याचा संशय येत असे. त्यामुळे उगाचच हेरगिरी करून तो काहीतरी उकरून काढण्याचा प्रयत्नात त्याचा भरपूर वेळ खर्च होत असे. त्याच्या ह्या स्वभावाने त्याचे मित्र व इतर माणसे कंटाळून  जातं. तो सतत आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे लक्ष ठेवून असे. त्याच्या पद्धतीने त्याचा विश्लेषण करण्याचा त्याचा प्रयत्न वाखाण्याजोगा असला तरी, सर्वसामान्य माणसांना त्याचे हे वर्तन रुचणे कठीण होते. कोणतीही छोटी गोष्ट करण्यात त्याला रुची नसे. त्याच्या घरातल्यांनी सांगितलेल्या छोटी मोठी वस्तू आणण्याच्या मागण्या देखील तो विसरून जात असे. त्याला कोणतीही छोटी गोष्टी करणे कमीपणाचे वाटे. त्याच्या ह्या स्वभावाचे गूढ कोणाला उकलले नव्हते.
        त्याच्या खास मैत्रिण शिल्पाला त्याचा हा स्वभाव रहस्यमय भासत असे. शिल्पाने गौतमला Past life regression करून घेण्यासाठी हट्ट धरला. त्याला त्याची उपयुक्तता पटवून दिल्याने, अति बुद्धीचा वापर करणारा गौतमही त्यास तयार झाला.
    रिग्रेशनच्या सेशनला सुरुवात झाली. कुठच्याही कामात झोकून देण्याची गौतमची प्रवृत्ती असल्याने, पूर्णपणे सूचना पाळून  त्याने थोड्याच वेळात खोल तंद्रावस्थेत, ( deep trance)प्रवेश केला. हळूहळू अनाकलनीय सत्यसमोर येऊ लागले. खुद्द regression करणारा व्यक्ती देखील भयचकीत झाला. शिल्पा तेथे उपस्थित होतीच.
   गौतम वर्णन करू लागला...... हा काळ होता, दुसऱ्या महायुद्धाचा! जर्मनीचा हूकुमशाह एडॉल्फ हिटलर कोणत्याही परिस्थितीत माघार घेण्यास तयार नव्हता. त्यावेळी ची ही घटना आहे.
   ... गौतम त्याला दिसणारी दृश्य वर्णन करीत होता.त्यामध्ये विविध भावनांचे संमिश्रण दिसून येत होते. कधीतरी त्याचा आवाज जड होत होता. तो पुढील वर्णन करत राहिला.....
      गौतम आपल्या पूर्व जन्माचे वर्णन करीत होता. त्या वेळेला तो जी भूमिका त्या जन्मामध्ये पार पाडत होता.... त्याचा कथानक सांगत होता. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान गौतम हा नाझी कॅप्टन होता. त्याच्याबरोबर त्याचा मित्र बर्नोल्ड ( Bernold)होता. गौतम चा पूर्वजन्मीचं नाव  शेवार्ड ( scheward) असं सांगितलं गेलं. ते दोघेही एका जहाजाने प्रवास करत होते. ते हिटलरच्या एका गुप्त मोहिमेवर ( secret mission ) कार्य करत होते. त्यांचा विस्टन चर्चीलना जीवे मारण्याचा डाव होता. विस्टन चर्चील हे इंग्लंडचे( united kingdom)पंतप्रधान होते. शेवॉर्ड हा शस्त्रांसंबंधी हेरगिरी करत असे. तो एक नाझी कॅप्टन असल्याने साम-दाम-दंड-भेद  सर्वांचा वापर करून तो त्याचे ईप्सीत साध्य करून घेण्याच्या बेतात होता...( क्रमशः )  
🔥 दुसऱ्या महायुद्धा संबंधित पुनर्जन्माची एक रोचक कथा ( भाग.1)🔥
🔥 दुसऱ्या महायुद्धा संबंधित पुनर्जन्माची एक रोचक कथा ( भाग.1)🔥
ॲडॉल्फ हिटलर
🔥 दुसऱ्या महायुद्धा संबंधित पुनर्जन्माची एक रोचक कथा ( भाग.1)🔥
विस्टन चर्चील
( पुढील लेखात उर्वरित भाग पाहूच!))

0 

Share


उपेंद्र सावंत
Written by
उपेंद्र सावंत

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad