Bluepad | Bluepad
Bluepad
पावसाळी दिवस
वसुधा जावकर
वसुधा जावकर
22nd Sep, 2022

Share

सध्या दिवसा अंधार आणि रात्री उजेड असतो! बरोबर ना ? बाहेर बघावस वाटत नाही , नुसता काळोख दाटलेला असतो , सूर्य कुठे दडून बसलाय कोण जाणे .म्हणजे असे झालेय की गारठली ही धरणी गारठले असमान . आता शेकोटी करावी की काय असे वाटू लागले आहे .रात्री घरात आणि बाहेरचे दिवे लागले की जरा बरे वाटते ! बर पाऊस पण घडाघडा पडून जातोय असेही नाही , जरा पडतो आणि तोही गायब होतो , पण अंधार काही हट्ट सोडत नाही .पुन्हा काढे करून प्यायची वेळ आलीय ! बऱ्याच ठिकाणी नवरात्रीची तयारी सुरू झाली आहे . मंडप बांधणी जोरदार दिसू लागलीय .गरबा खेळणारे विचार करत असतील , नाचावे कसे , बऱ्याच मैदानात चिखल आहे अजून .काही असो , या वाता वरणाचा खूप वीट आलाय आता .तुम्हालाही आलाय का की बरे वाटतेय हे पावसाळी वातावरण? चला कॉफी करूयात , या कॉफी प्यायला .

181 

Share


वसुधा जावकर
Written by
वसुधा जावकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad