Bluepad | Bluepad
Bluepad
बिंभिंतीची शाळा...
manisha Deepak chitre
manisha Deepak chitre
22nd Sep, 2022

Share

बिनभिंतीची शाळा...
       भारतीय शिक्षण पद्धतीत अनेक बदल आज होऊ
घातले असले तरी आजही शिक्षण शिकून ही पोट भरण्याचं
साधन होऊ शकत नाही शिक्षणाने  रोजचा उदरनिर्वाह
होऊ शकत नाही.
           आज ट्रेन मध्ये वय वर्ष १० असेल त्याच्या हातात
मी चॉकलेट बिस्कीट विकताना पाहिलं तो असा ही ट्रेन मध्ये
कधी भाजी, आणि चॉकलेट विकताना दिसतोच.आज त्याच्याशी बोलण्याचा योग आला,शिक्षण घेताना शाळेतील
मुलं, आणि परिस्तिथी ने आलेली वेळ  त्याच्या चेहऱ्यावर
असलेला आनंद मला त्या मुलांपेक्षा जास्त भावला.
कारण त्याला जो  व्यवहार  आजच्या शिक्षणाने वयाच्या
21 व्या वर्षी मिळणार होता,तो त्याच्या आजच्या  वयालाच
प्रत्यक्षात धडे गिरवत होता जे धडे त्याला पुस्तकात कधीच
पाठांतर करून मिळणारे न्हवते ते समाधान मी त्याच्याशी
बोलताना मिळवत होते.
        त्याच्याशी बोलताना तो अगदी मस्त मनमोकळं
बोलत होता म्हणून माझा आतून शिक्षक जागा झाला
तू शाळेत का जात नाहीस,शिक यापेक्षा चांगला नंतर
काही तरी कमवशील, पण मी त्याला सांगत होते आणि
खरं तर तो न शिकता ही खूप काही पुस्तकाबाबाहेरच वास्तव जग त्याला जास्त धडे देत होत जे पुस्तक शिकल्यानंतर उपयोगी पडेल,किंवा झगडावं लागले आज
तो यापैकी त्याच्या उदरनिर्वाहातून कमवण नक्कीच शिकत
होता,तिथे कुठे ही व्याख्या पाठ करायची न्हवती की कुठे किती वजा किती मिळवले याची कुठल्याही पुस्तकात मांडणी करायची न्हवती जे तो विकत होता त्यातच तो मिळवत होता तीच त्याची बाकी होती ते त्याला चांगलंच माहीत होतं,खरेदी केलेला माल आणि त्यात  त्याची चॉकलेट बिस्कीट विकून मिळणारी किंमत मात्र त्याची तोंड पाठ होती दिवसभरात त्याचा माल विकला गेला पाहिजे हे
त्याच गणिती शिक्षण ,भाषा माझ्याशी बोलत होता माझं त्याला त्याच मला बोलले समजत होत ती भाषा शिक्षण अवगत होतं बाकी विषयांच त्याला काही देणंघेणं न्हवतं.
वातावरणातील शाळेत त्याच शिक्षण त्याला जास्त खुणावत होत,माझ्या शालेय शिक्षणाचा उपदेशाचे धडे त्याला अजिबात आवडत न्हवते तो फक्त हसत होता.
          मी त्याचा फारसा वेळ न घेता त्याला शाबासकी
दिली पण त्याला म्हणाले शाळा शिकलास तर अजून चांगलं काही तरी यापेक्षा करशील.त्याची ट्रेन मधली विक्री त्याला जास्त खुणावत होती माझे उपदेश मी माझ्या पुरता ठेवून
माझ्या उदरनिर्वाह ठिकाणी उतरून गेले.तो पाठीवर त्याच्या सामानाची गाठोडी घेऊन क्षणार्धात उतरून दूरवर निघून
गेला.
        भारतातील असंख्य मुलांचे शिक्षण हे त्यांची गरज आणि शिक्षण याच्या कोंडीत अडकले आहे,कारण शिक्षणापेक्षा अर्थाजन महत्वाचं शिक्षणात हे समाविष्ट नाही अर्थाजन टप्पा पूर्ण शिक्षण झाल्यावरच त्याशिवाय नाही कमवता कमवता शिक्षण असले तरी खूप समस्या त्यांच्या स्वतःच्या आहेत ज्या नंतर  शिक्षणही त्यांना नकोसे होते. त्यापैकी हे उदाहरण त्याच्या आईवडिलांनी मार्क कमवून आणण्यापेक्षा वस्तू विकून पैसे आणण्यात जास्त आनंद वाटतो.
          असे चिमुकले हात अर्थाजन करतात तेंव्हा वाईट वाटत नाही कारण त्यांची गरज पुस्तक भागवू शकत नाही
अश्यावेळी त्यांचा कुठे तरी अभिमान वाटतो.शिक्षण आणि
अर्थाजन  यातली दुरी शिक्षणाने कधीच दूर होणार नाही हे
मात्र तितकंच खरं असंख्य योजना,राबवून शिक्षणातील गळती ही तशीच रहाणार हे वास्तव आहे.अश्या मुलांना
बिंभिंतीच्या शाळेतील शिक्षण मिळत राहील जे पुस्तकापेक्षाही आयुष्यभर पुरत राहील.
बिंभिंतीची शाळा...
Ma..निषा
Secret wonderful journey of my life.

179 

Share


manisha Deepak chitre
Written by
manisha Deepak chitre

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad