Bluepad | Bluepad
Bluepad
तळहातावरील रेषा
Rajashri Bhavarthi
Rajashri Bhavarthi
22nd Sep, 2022

Share

*#तळहातावरील_रेषा*
तळहातावरील तिच्या रेषा खूप काही बोलक्या होत्या....!
तिच्या अस्तित्वाच्या त्या खुणा , तिचे अवरित कष्ट
संकटाशी सामना केलेले दोन हात
अखंड आयुष्यभर हाताला लागलेला तो धुणं भांड्याचा साबण...
सारा काही चित्रपट झरझर सरत गेला...!
ह्या सगळ्यात तिच्या तळहातावरील त्या मूळ रेषा मात्र अधिक गडद होत गेल्या की पुसल्या जाऊन विरळ होत होत्या....
एक मात्र खरंय की , त्याचं एक नेटवर्क तयार होऊन त्याचा गुंता मात्र सुटता सुटत नव्हता..!
आयुष्याच्या ह्या टप्प्यावर सारं काही आठवतं अगदी लख्खंपणे...
कल्पनांचे काहूर मनामधी दाटलेलं...
पराक्रम ,कष्ट ह्यापेक्षा त्याग महत्वाचा वाटला त्या क्षणी तिला...
घेतलेला निर्णय चूक का बरोबर माहीत नव्हता पण
नवऱ्याने टाकलेल्या एका स्त्री ला मात्र वाढवायचं होतं छान..आपल्या गोजिरवाण्या पिल्लूला..
सिंगल पेरेन्ट म्हणून टीकाटिप्पणी झेलत शांतपणे मार्गक्रमण करत चढत होती , यशाच्या एकेक पायऱ्या...
नारी जातीची प्रतिष्ठा जपत ,पार पाडत होती सगळे कर्तव्ये...!
उचंबळून आलेल्या भावना आवरताना , क्षणभर मनाला प्रश्न केला की , ही आपली कृतज्ञता की विनम्रता...?
काहीही असो पण आयुष्याच्या ह्या टप्प्यावर मात्र आपण एक लढाई जिंकली....!
आज मुलाच्या कर्तृत्वाने तिची मान अभिमानाने उंचावली.
भर सत्कार समारंभात जेंव्हा त्याने आईच्या हाताचा मुका घेऊन तिचा बोलक्या रेषा असलेला तो तळहात आपल्या डोक्यावर ठेवला आणि
आशीर्वाद मागण्यासाठी तिच्या पायावर झुकला...!
क्षणभर इतिकर्तव्यता पार पाडल्याचा भास व्हावा...
नाही...नाही अजूनही खूप काही बाकी आहे ,
खूप काही साध्य करायचं आहे...
चला उठायला हवं ना...!
त्या क्षणी तळहातावरील त्या रेषा खुशीत हसत होत्या तिच्याकडे बघून...
आनंदाप्रीत्यर्थ...
अगदी बेहोष होऊन...!
होय खरंच आहे की ते..
म्हणतात ना...वासरू जेंव्हा नजरेआड होतं तेंव्हा गाईचा जीव कासावीस होतो.
मायेचे पास ही असेच असतात ना आपल्या पिल्लासाठी....
त्यात ही एक मोठी ताकद असते...
घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी...
पाश सुटता सुटेना..
ओढ मायेची तुटेना...!
तळहातावरील रेषा पहात होत्या आईच्या ममतेचे वात्सल्य....!!
©️®️सौ राजश्री भावार्थी
पुणे
२२ / ०९ /२०२२

183 

Share


Rajashri Bhavarthi
Written by
Rajashri Bhavarthi

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad