Bluepad | Bluepad
Bluepad
सौन्दर्य
ashok MULAY
ashok MULAY
22nd Sep, 2022

Share

असे म्हणतात कीं सौन्दर्य हे पाहणारच्या नजरेत असतें,व व्यक्ती सापेक्ष तें असू शकते.व माणूस काय शोधतो एखाद्या व्यक्तीमत्वात,कुणाला समोरच्याचे डोळे आवडतात,कुणाला मग ती हरीनाक्षी वाटते,कुणाला सुनयना वाटते,कुणाची उंची डोळ्यात भरते.कुणाचा गौर वर्ण तर कुणाची शामल कांती.हिंदुचे आवडते राम सावळे तर कृष्ण नीलवर्ण म्हणजे डार्क काळे होते कीं काय,कुणाचे पाय,हात वा बोटे अतिसुंदर असतात .कांनं,हात,पाय,डोळे,यां सर्वांगीन सौन्दर्यवती असतात.त्यांचे आत्ता निकष बनवले आहेत.जागतिक सौन्दर्य स्पर्धा होतात,सिनेमा,नाटके यासाठी आकर्षक व्यक्तीमत्व लागते.याच बरोबर बोलण्यातील सौन्दर्य,चालण्यातील सौन्दर्य,पाहन्यातील सौन्दर्य,असे अनेक प्रकारचे सौन्दर्य असू शकते.मधुबाला,हेमा मालिनी,ऐस्वऱ्या रॉय,ही काही सिनेमातील सौन्दर्यांची उदाहरणे,माता जिजाऊ,अहिल्या बाई होळकर सारख्या महान चांगल्या स्वभावाचे उदाहरणं,तर महाराणी तारा बाई व झाशीची रानी लक्ष्मीबाई हे शोर्या,चांगला स्वभाव,धाडस याच उदाहरणं,तर काय नुसते सुंदर असन्याबरोबरोबरच दुसरे गुण म्हणजे माणूस सर्व गुण संपन्न असणे आवश्यक आहे. खरे तर हे सौन्दर्य आज हे तर काळाचे ओघात कमी कमी होत जाते.पण मनाचे,वागण्याचे,स्वभावाचे सौन्दर्य चिरंजीव असतें व शरीराचे सौन्दर्य व मनाचे सौन्दर्य एकत्र झाले तर ते ऐतिहासिक होऊ शकते.भारतीय माणसाला पण गोर्या रंगाचे फार आकर्षण आहे.पण ब्लॅक is ब्युटी असे ही म्हटले जाते.हल्ली अनेक कृत्रिम साधने सुंदर दिसणे साठी निघाली आहेत.पण सुंदर असून अल्प ज्ञान असेल तर त्यांचे हासे झाल्याशिवाय रहात नाही.म्हणून ज्ञान,सौन्दर्य,औदा र्य,हे एकत्र आले तर खूप छान.

191 

Share


ashok MULAY
Written by
ashok MULAY

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad