Bluepad | Bluepad
Bluepad
आई
Tokade Shriram
Tokade Shriram
22nd Sep, 2022

Share

■■■■■■◆◆ आई ◆◆■■■■■■
रोजच्याच भाकरीला ! आकार नवा द्यायची !!
रोज भाकरी नवी ती ! चव सारखीच राहायची !!
लोळलो मातीत कितीदा ! कुशीत तरीही घ्यायची !!
बोल बोबडे तरीही ! समजून मज घ्यायची !!
रडलो असेल कितीदा ! वेगवेगळ्या कारणाने !!
पापणी तिची ओली ! लगेच मग व्हायची!!
मज हट्ट तेव्हाचे! पुरविले सारे तिने!!
जेव्हा होतो उदरात ! डोहळ्यात पुरवायची!!
होती अनेक दुःखे ! पदरात जडलेली!!
न दाखवी कुणा ती! मनात दडलेली!!
असले मनात स्वप्न! करून दाखवायची!!
केलेल्या कामाची !चर्चा मग व्हायची !!
आई तुला स्मरूनी!मन धन्य धन्य होते!!
कसे फेडू पांग सारे! मन कासावीस होते!!
असेल जर पुनर्जन्म ! उदरी तुझ्याच व्हावा !!
इतकाच आशीर्वाद! विध्यात्याने मज द्यावा!!
●◆★◆©तोकडे श्रीराम◆★◆●

176 

Share


Tokade Shriram
Written by
Tokade Shriram

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad