Bluepad | Bluepad
Bluepad
ब्लॉग - मी आणि सरकते जिने
वंदना गवाणकर
22nd Sep, 2022

Share

मॉल आले आणि सरकते जिने नव्याने प्रत्येकाच्या आयुष्यात आले. मनात धडधड सुरू झाली त्याच्यावर पाय टाकतांना. आजूबाजूला साधे जिने शोधायची सुरूवात झाली....पणं सरकत्या जिन्यापुढे त्याची शान नाहीशी झाली.
वरच्या मजल्यावर पोचायचा शॉर्टकट, अगदी दोन मिनिटात.... पहिला पाय सरकत्या पायरीवर टाकून दुसरा त्याच्यावर पटकन adjust करतं, गुडघ्याच्या वाट्या न वाकवता, ताठच्या ताठ, बाजूच्या रेलिंगला पकडून, आता शेवटच्या पायरीवरून सामोरं पाय टाकायची तयारी..... ह्यात मनाचा कंट्रोल महत्त्वाचा, इकडे तिकडे लक्षच जात नाहीं. एकग्रता आणि पायऱ्यांच बॉडींग जमलं की नकळत चेहऱ्यावर हसू येतं....
ह्या सरकत्या जिन्यावरून पहिलं जाताना नकळत आपल्या बरोबरच्या चा हात पकडला जातोच....तो पणं मनातून घाबरलेला असतोच पण शांतपणे आपला हात थोपटत आणि घट्ट धरत आपल्याला वरच्या मजल्यावर पोचवतो. पुण्याला फिनिक्स मॉल आहे आमच्या घराच्या जवळच.... तिथं खाली उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी जिने ठेवलेत, शक्यतो मी तेच वापरते, कारणं ह्या सरकत्या जिन्यावरून माझ्यासमोर दोघं तिघ पडलेले ह्या डोळ्यांनी पाहिलं आहे, उगाचंच रिस्क नको.... आपला एवढ्याश्या जीवाला किती किती अडचणीत टाकायचं....हा साधा विचार.
त्या मॉल मध्ये शक्यतो साठीच्या जवळपासच्या बायका पुरूष...जरासे गावाकडचे कुतूहल म्हणून बघायला येतात.... सगळी चकाचौकी बघितल्यावर त्यांचे डोळे दिपतात आणी मग त्यांना त्यांच्या बरोबरच कोणी सुजाण ह्या जीन्या जवळ घेऊन येत, कुतूहलाची जागा नकळत भिती घेतें.... खालच्या सेक्युरिटी वाल्यांना अश्या लोकांची सवय असते मग ती सेक्युरीटीवाली बाई त्यांचे हात शेजारी पकडायला सांगते आणि पाय टाकायला सांगते, कधीतरी ते खुप घाबरलेले वाटले तर त्यांच्या बरोबरीने वरपर्यंत सोडते त्यांना....मग जग जिंकल्याचा आनंद त्या लोकांच्या चेहऱ्यावर असतो.
माझा लेक मला नेहमी सांगतो escalator वरून खाली उतरताना पायरीवर पाय ठेवलास कि खाली बघायाचच नाही, आजूबाजूला बघतच राहायचं, खाली बघितलं की चक्कर येऊं शकते, आता पन्नाशी उलटलेली मी आजूबाजूला काय बघणार? आधीच सगळं बघितले असते, आता लक्ष फक्त एकच.....खालचा जिने गाठणं.
परवा एक सतरा अठरा वर्षाची मुलगी समोरच्या escalator वरून उतरायला पाय टाकला आणि तिला कळलं की तिचा बॉयफ्रेंड मागे लपलाय.... अडाणी मुलगी उलटी जिने चढायला लागली, माझ्या काळजाचा ठोका चुकला.... मगं तिचा बॉयफ्रेंड हसत हसत तिला हाताने थांब म्हणाला आणि त्याने तिला हाताला धरून खाली आणलं... त्याक्षणी मला त्याच्या एक कानाखाली द्यावीशी वाटली....ह्या खेळात ती उलटी पडून जखमी झाली असती.... एक छोटीशी मस्करी कितीला पडली असती, बर ह्यांचे कपडे अंगावरचे एवढे छोटे असतात की पडलं तरी डायरेक्ट हाडावर आघात.
कधीतरी असे सल्ले द्यावेसे वाटते की त्या सरकत्या जिन्यांच्या कडान जरा मऊशार कपडा लावला तरं पडताना खुप लागेल ही भिती राहणार नाही....अगदी वेलवेटचां मऊशार पणं चालेल......नविन तंत्रज्ञानात आपल्या डोक्यातली एक आयडिया....बाकी काही नाही.
🙏 वंदना ❤️

231 

Share


Written by
वंदना गवाणकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad