Bluepad | Bluepad
Bluepad
मौन ,अबोला !!
saru pawar
saru pawar
22nd Sep, 2022

Share

असावे मी तुझ्या सवे हि तुझी आस रे कि मालकी हक्काची हि बात रे मौनाचा आता हा कहर जाहला गेला बहर मोहरून ! मोगरा ही रूसला नसे मूक संवादा काय गंमत ती न नजरेचे कटाक्ष , न ओठांचे बोल ते आसुसले मी आता तोड रे मौन है कर आता बट्टी गड्या सोड मौन है असुन समिप बघ संवाद खुंटला तुझ्या कुठल्या दुखण्याला रे मी हात घातला नेमक मौन कशा साठी धरलयस नाही रे राजा मला अजुन उमगलय कसा बर तुझ्या रागाचा फुगा आता फोडायचा तु घातलेल्या कोड्याचा गुंता कसा सोडायचा बस !आता माझा अंत नको पाहूस आहे आसपास तुझ्याच तु असा दून नको रे जाऊस नात साता जन्माच नियतिन आपल जोडल तुझ्या अशा वागण्यान ते किती वेळा तोडल आता संध्या-छायेची रे वेळ जुळवून घेऊ थोड थोड जाईल निघुन वेळ माझ्या आधी तु कि तुझ्या आधी मी सांगता येत नाही होईल तेच जे नियतिन ठरवलय मग सांग गड्या !आता तरी तुझ मौन तुटलय ??

184 

Share


saru pawar
Written by
saru pawar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad