Bluepad | Bluepad
Bluepad
आपलं आयुष्य व्यर्थ वाया घालवू नका आपण स्वतः आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
22nd Sep, 2022

Share

*आपलं आयुष्य व्यर्थ वाया घालवू नका आपण स्वतः आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो*
वेळ निघून गेल्यावर आलेली जाग फार काही उपयुक्त नसते .महणुन आपल्याला भविष्यात पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही . यासाठी आपलं जीवन आपल्याला कसं घडवता येईल या कडे लक्ष केंद्रित करा .कारण आपल्या जिवनाचे शिल्पकार आपणच असतो. जीवनातील सुरवातीचा कालखंड जरा मजेदार असतो .आपण लहान असतो . परावलंबी असतो .जग फार जवळून बघितलेल नसतं म्हणून फार गांभीर्या पण नसतं .पण दिवसेंदिवस जसं वय वाढत जाईल तस आपल्या वरील जबाबदारी पण वाढते.जबाबदारी पुर्ण करत असताना उपलब्ध संसाधन आणि आवश्यक गरजा यांचा अनेकदा मेळ लागत नाही.याचा मेळ हा आपण सवलंबी झालो कि परावलंबी आहेत यावरच जास्त अंवलबुन असतो . म्हणून योग्य वेळी योग्य संधीचा लाभ घेऊन आपण आपलं जीवन घडविलच पाहिजे .पण असं होतं नाही . बहुतांश लोकांचा प्रश्न समस्या हिच आहे कि सर्व साधारणतः तीस-पस्तीस वर्षे जीवन प्रवास करेपर्यंत आपण जीवनात यशस्वी की अयशस्वी आहेत हे फार लक्षात येत नाही. कारण ही तसंच असतं या वयापर्यंत बहुदा आपण आपल्या कुटुंब प्रमुखावर अंवलंबीत असतो. परंतु जेव्हा आपण स्वतः कुटुंब प्रमुख या पदावर विराजमान होतो तेंव्हा मात्र मुल-बाळ त्यांचे शिक्षण भौतिक सुविधा आणि इतर वेगवेगळ्या बाबी याचे खर्च आणि उत्पन्न याचा जेंव्हा ताळमेळ लागत नाही तेंव्हा मात्र आपण गडबडल्यासारखे होतो. आणि विचार करतो की आपण नक्कीच चुकलो आहेत परंतु चुक लक्षात येण्याची ही योग्य वेळ नाही. कारण तोपर्यंत आपल्या आयुष्यातील अमुल्य असा काळ जो काळ आपण जिवनात काहीतरी घडून आपल्या दैनंदिन गरजा व्यवस्थितपणे पुर्ण करु शकू अशी व्यवस्था निर्माण करण्याचा असतो तोच कार्यकाळ आपला चुकीच्या पद्धतीने व्यथित झाल्याने अनेक समस्या अनेक आव्हानं आपल्या समोर उभी असतात आणि ती आव्हान पुर्ण करताना जो काही त्रास अडचणी निर्माण होतात याला आपण स्वतः जबाबदार आहेत. कारण आपण पंधरा वर्षं ते तीस वर्षे हा उमेदीचा काळ कशा पद्धतीने घालवला कुणाच्या प्रेरणेतून कार्य केले, आपला आधारस्तंभ कोण होता, आपली संगती कशी होती, आपण कोणत्या विचाराच्या प्रभावात होतो. त्यानुसारच याचं कालावधीत आपलं धेय्य उद्दीष्ट काय होतं तिथं पर्यन्त पोहचण्यासाठी आपण काय प्रयत्न केले काय निष्काळजीपणा केला. या सर्व बाबीच मुल्यांकन केले इतर कोणाही आपल्या या स्थितीतीस जबाबदार नाही. तर आपण स्वतः जबाबदार आहेत मग पुन्हा निराश न होता या माध्यमातून सुद्धा व्यवस्थित मार्ग काढला पाहिजे. आणि विशेषतः जे सध्या पंधरा वर्षं वयाच्या आत आहे किंवा पंधरा ते तीसचा प्रवास चालू आहे त्यांनी मात्र हा विषय खूप गांभिर्याने घेण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून आपल आयुष्य फुकट वाया गेल म्हणण्याची वेळ आपल्या स्वतःवर इतर सहवासीत व्यक्तिमत्त्व यांच्यावर येणार नाही. याची दक्षता घेऊन आपण मार्गक्रमण केले तर नक्कीच आपण स्टोरी ऑफ सक्सेस होऊ आणि स्टोरी ऑफ सक्सेस की स्टोरी ऑफ फेल्युअर हे इतरांच्या हातात नसुन हे सर्व आपल्या सद्सद्विवेकबुद्धीवर अवलंबुन आहे. की पंधरा ते तीस वर्षे मध्ये जीवनातील दोन मार्ग निघतात पहिला यशस्वी होण्याचा मार्ग या मार्गावरुन चालायचे असेल तर प्रचंड मेहनत, ध्येयशक्ती, जिज्ञासा चिकाटी वृत्ती, अभ्यासू वृत्ती आणि आपले मार्गदर्शक आई-वडिल यांच्या सुचनेनुसार आज्ञेत राहुन अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आणि या सर्व बाबी शेवटी तुम्हाला एका प्रचंड अशा यशस्वी ध्येयापर्यंत घेवून जाणार आणि दुसरा मार्ग आहे तो अभ्यासात लक्ष न देणे, ज्येष्ठांचे काहीच न ऐकणे, सामाजिक किंवा राजकीय संघटनेचा कार्यकर्ता होणे, राजकीय विचाराने प्रेरित होवून अल्पज्ञानावर चुकीच्या कृती करणे, मोठेपणा करणे, बडेजाव करणे, नम्रता नसणे, भौतिक मोठेपणाच्या नादी लागून अनेक वाममार्गाला लागणे आणि तीस वर्षे झाल्यानंतर त्याचे परिणाम दिसतात त्यासाठी आपण कोणत्या मार्गावरुन प्रवास केला पाहिजे याचे खुप बारकाईने विचारपुर्वक मंथन करण्याची आवश्यकता आहे जेणे करुन भविष्यात येणारी वाईट वेळ संकट या विषयी आपल्याला पश्चाताप करण्यााीच वेळ येणार नाही आणि पश्चाताप केल्याने वेळ किंवा मार्ग बदलत नाही म्हणून वेळीच सुजान व्हा, जागृत व्हा आणि स्वतःचा दैदिप्यमान असा एक इतिहास लिहिण्यासाठी सज्ज व्हा व यशाची सक्सेस स्टोरी लिहा.आणि आपलं आयुष्य फुकट वाया गेल म्हणायची वेळ आपल्यावर येणार नाही यासाठी योग्य वेळी योग्य वयात योग्य टायमिंग मध्ये जागे व्हा दक्ष व्हा .
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ, महाराष्ट्र वंजारी समाज इतिहासअभ्यासक व लेखक*बालसंस्कार शिबिर*अध्यात्मिक मार्गदर्शक*
मो.9011634301
आपलं आयुष्य व्यर्थ वाया घालवू नका आपण स्वतः आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो

173 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad