Bluepad | Bluepad
Bluepad
Title

Swati Kumbhar
Swati Kumbhar
22nd Sep, 2022

Share

चंद्र घंटा
"पिण्डजप्रवरारूढ़ा ण्डकोपास्त्रकेर्युता।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥
दुर्गा मातेच्या पुजनाचा आज तिसरा दिवस.
आजचे देवीचे तिसरे रूप आहे माता चंद्र घंटा.
देवीच्या मस्तकावर चंद्राकार घंटा विराजमान आहे.दशभुजा मृगेंद्र आरूढा ,चंद्र घंटा देवी आयुधं संपन्न असून ,हाती कमंडलू अन् जपमाळ आहे.पांढरी फुलं माळ घातलेल्या देवीची सुवर्णासम कांतीप्रभा सर्वदूर पसरली आहे.
कल्याणकारी चंद्र घंटा देवीच्या आराधना करणार्या भक्तांना देवी हृदय रोग निवारण करण्याचे वरदान देते.देवी ,चंद्र घंटा निनादाने जनसामान्यांचे रक्षण करते.
चंद्र घंटा देवीला दूध, खीर, मध नैवेद्य आवडतो.
चंद्र घंटा देवी आपणा सर्वांना आरोग्यपूर्ण आणि सुखासमाधानाचा आशिश देवो ही तिच्या चरणी प्रार्थना.
तृतीय रुप चंद्रघट कपालिनी। हृदय आरोग्य दायिनी।
घंटा निनादे सकलां रक्षसि । श्री चंद्रघंटा नमो नमः।।
।।शुभम भवतू।।

0 

Share


Swati Kumbhar
Written by
Swati Kumbhar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad