Bluepad | Bluepad
Bluepad
"बिन्नी बंसल" एक प्रेरणास्रोत
omkar deogade
omkar deogade
22nd Sep, 2022

Share

*_💫 "बिन्नी बंसल" एक प्रेरणास्रोत 💫_*
"बिन्नी बंसल" एक प्रेरणास्रोत
_२००५ साली आयटी दिल्लीतून कॉम्पुटर सायन्स इंजीनियरिंग पास झालेल्या एका तरुणाने गुगल सारख्या एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळविण्यासाठी दोन वेळा प्रयत्न केला. परंतु, दोन्ही प्रयत्नात तो अयशस्वी झाला._
_पण, दहा वर्षातच त्याने इतकी मेहनत घेतली की, भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत २०१५ साली त्याला पहिल्या शंभर लोकांमध्ये स्थान मिळाले. कोण ही व्यक्ती? काय आहे त्याचा संघर्ष? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग !_
_५ ऑगस्ट १९८१ रोजी चंदीगड येथील एका सधन कुटुंबात त्याचा जन्म झाला. वडील बँक कर्मचारी व आई एक सरकारी कर्मचारी होती. तो एकुलता एक असल्याने आई वडिलांनी त्याच्यावर बारीक लक्ष ठेवले. त्यामुळेच तो खूप हुशार आणि बुद्धिमान बनला. आपल्या बुद्धीच्या जोरावरच त्याने आयआयटी दिली येथे कॉम्पुटर सायन्स इंजीनियरिंगसाठी प्रवेश मिळविला._
_२००७ साली तो पास होऊन नोकरीच्या शोधात बाहेर पडला. सुरुवातीला त्याने गुगल सारख्या नावाजलेल्या कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न केला. पण, त्याला दोनवेळा अपयश आले. नंतर त्याने अमेझॉन या कंपनीत नोकरी मिळविली._
_नोकरी करत असतानाच त्यांच्या मनात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार येवू लागला. त्याच्या सारखाच भव्य विचार करणारा एक मित्र त्याच कंपनीत नोकरीला होता. दोघांचेही विचार जुळले आणि त्यांनी अमेझॉन मधील ९ महिन्याच्या नोकरीचा राजीनामा देवून २००७ साली स्वतःची कंपनी स्थापन केली._
"बिन्नी बंसल" एक प्रेरणास्रोत
_ऑनलाईन पुस्तके विक्री करणे. या मुख्य उद्देशाने कंपनीची स्थापना झाली, सुरुवातीला तो आपल्या मित्राच्या सोबतीने पोस्टाच्या माध्यमातून तर कधी स्कूटर वरून स्वतः पुस्तके पोहचवू लागला. मोठ्या संकटाना तोंड देत आपली कंपनी त्याने नेटाने पुढे नेली. २०१४ साली त्याच्या कंपनीने कात टाकली. आता तो पुस्तका सोबत अनेक इलेक्ट्रॉनिक, घरगुती वापराच्या, किराणा वस्तूंची ऑनलाईन विक्री करू लागला._
_२०१४ साली त्याने ग्राहकांना खरेदीसाठी बिग बिलियन डे आयोजित केला. या दिवसानेच त्याला बिलेनियर बनविले आणि २०१५ साली भारतातील १०० सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत त्याचा समावेश झाला._
_ज्या कंपनीने तो इतका श्रीमंत झाला, ती कंपनी म्हणजेच फ्लिप्कार्ट ऑनलाइन सर्विस प्राइवेट लिमिटेड आणि त्याचा सह-संस्थापक म्हणजेच *बिन्नी बंसल* होय._
_केवळ नऊ महिन्यांच्या नोकरीतच बिन्नी बंसल यांनी स्वतःची कंपनी सुरू करण्याचा विचार केला आणि या विचारावर लगेच काम सुरू केले, खरंतर इतकं कमी अनुभवात नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय हा खूपच धाडसी आहे, कदाचित हा निर्णय घेताना त्यांना भीती देखील वाटली असावी. परंतु, मित्रांनो 'डर के आगे जीत है!' हे विसरून चालणार नाही._
_आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपल्याला धाडसी बनावं लागेल आणि धाडसी निर्णय देखील घ्यावे लागतील. व्यवसायात यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीमध्ये धाडसी निर्णय घेण्याची मोठी क्षमता असते. हेच धाडस बिन्नी बंसल यांच्यामध्ये होतं. म्हणूनच ते यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. *म्हणूनच ते एक यशवंत आहे.*_
_इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार._
_धन्यवाद !_
⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️⌨️

170 

Share


omkar deogade
Written by
omkar deogade

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad