Bluepad | Bluepad
Bluepad
सोबत
किशोर पाटील
22nd Sep, 2022

Share

सोबत..
शब्दवेडा किशोर
होते सोबतीला  पाच जण
परत फिरले चार जण
नव्हते बोलत कोणीच
मुकी झाली होती शब्दसरीता
स्मशानात भरली स्मशान शांतता
जळताना ओढकेही रडत होते
जगणंच एक जळणं होतं हे
सगळ्यांना शिकवत होते
अर्थ नाही उरला या देहाला
प्राण कधीच सोडून गेला
अर्थ नाही प्राण वायुला
जेव्हा त्याचा खरा अर्थ उमगला
म्हणे सोबतीला अर्थ होते
देहाच्या तिजोरीत मात्र रितेपणाच्या
खडखडाटाचे फटाके वाजत होते
लेखन माझ्या नावावर
रजिस्टर असुन copy pest
केल्यास कडक कायदेशीर
कारवाई होईल.

239 

Share


Written by
किशोर पाटील

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad