Bluepad | Bluepad
Bluepad
खरे खोटे देव जाणे...
S
Shashikant Harisangam
22nd Sep, 2022

Share

खरे खोटे देव जाणे..... 🙏
................................
इरादा
खूप भरभक्कम बुरुज
पाडण्याचा असतो.
जो तो हाती हत्यार घेऊन येतो.
कातडीवर किल्ल्याच्या
थोडाही ' तवंग ' न दिसतो.
परतताना .....
बुरजाचा ' टवका ' नाही पडला.
' ये दिवार तुटती क्यो नाही '
भाव चेहऱ्यावर येती.
कुठल्या सिमेंटने बनला बुरुज.
ठाव कुठे लागतो?
मतदार राजा गालात हसत
कितवा हा प्रयत्न?
आपल्याशीच विचार करतो.
... शशिकांत हरिसंगम, वालचंदनगर 🙏🌹

167 

Share


S
Written by
Shashikant Harisangam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad