Bluepad | Bluepad
Bluepad
कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त
Pravin Wadmare
Pravin Wadmare
22nd Sep, 2022

Share

"रयत" हा शब्द मराठी संस्कृतीच्या जिव्हाळ्याचा शब्द आहे. पण हा मूळ अरबी भाषेतील शब्द आहे. रयत म्हटले की एक आपुलकीची भावना मराठी भाषिकांच्या मनात निर्माण होते. कारण छत्रपती शिवाजी राजांनी जे राज्य निर्माण केले, त्या राज्याला रयतेचे राज्य असे म्हटले जाते. रयत म्हणजे सर्व जनता! त्यामध्ये भेदभाव नाही.
कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त
छत्रपती शिवाजीराजांनी समतेचा पाया राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रांमध्ये घातला. तीच परंपरा शैक्षणिक क्षेत्रामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून कर्मवीर भाऊराव पाटलांनी घातला.
कर्मवीर भाऊराव पाटील हे शैक्षणिक क्षेत्रातील छत्रपती आहेत. कर्मवीरांचे कार्य हे सर्व जाती-धर्मांसाठी होते. रयतेच्या शिक्षणाची माऊली म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील होत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी छत्रपति शाहूजी महाराज यांच्या कार्याचा वारसा शैक्षणिक क्षेत्रामध्ये कर्मवीर अण्णांनी उभारला. ते सत्यशोधकी होते, शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य होते, म्हणूनच हे मानवतावादी होते.
शिक्षण संस्था उभारून कर्मवीरांनी पैसा कमावला नाही, परंतु स्वतःच्या कमाईचा सर्व पैसा रयतेच्या शिक्षणासाठी खर्च केला, म्हणूनच त्यांना शिक्षणमहर्षी म्हटले जाते.त्यांचे गाडगेबाबा,प्रबोधनकार ठाकरे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि क्रातिसिंह नाना पाटील यांचेशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.
आण्णा हे सामान्य शेतकरी कुटुंबातून आले होते,त्यांचा जन्म कुंभोज या आजोळी गावी झाला.त्यांचे गाव वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक होय.वडील सरकारी सेवेत होते पण त्यांच्या बाणेदारपणामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली.अण्णांचे शिक्षण कोल्हापुरातील जैन बोर्डिंगमध्ये झाले.बोर्डिंगचे नियम मोडल्यामुळे त्यांना अधीक्षकांनी काढून टाकले, तेंव्हा शाहू महाराजानी त्यांना राजवाड्यावर ठेवून घेतले.
आणणा बालवयापासूनच बंडखोर होते,अस्पृश्याना सार्वजनिक विहिरीवर पाणी भरू दिले नाही म्हणून त्यांनी रहाटच मोडून टाकला.ज्ञानदेव घोलप या मुलाला घेऊन त्यांनी परिवर्तनाचा लढा सुरू केला.सत्यशोधक चळवळीचा त्यांच्यावर प्रभाव होता.
आण्णा सहावीत नापास झाले,पण डगमगले नाहीत,निराश झाले नाहीत,ते हिम्मतवान होते.त्यांना गरीबाप्रति खूप तळमळ होती.गरिबांना शिकविण्यासाठी त्यांनी पत्नी लक्ष्मीबाईचे दागिने मोडले,पण बहुजन मुलांना उपाशी राहू दिले नाही किंवा त्यांचे शिक्षण बंद पडू दिले नाही.गावोगावी जाऊन त्यांनी मुलं आणून त्यांना मोफत शिक्षण दिले.आण्णा महाराष्ट्राची मायमाऊली आहे.
आणणानी विचारधारेशी कधीही तडजोड केली नाही,ते शेकापशी एकनिष्ठ होते.बाळासाहेब खेर यांनी ग्रँट बंद केली म्हणून त्यांनी पक्षांतर केले नाही किंवा ते साधे भेटायलाही गेले नाहीत,त्याच्याविरुद्ध लढत राहिले,इतके ते स्वाभिमानी होते,ते अडचणीत असताना एक व्यापारी अण्णांना म्हणाला "मी तुम्हाला पैसे देतो पण तुम्ही कॉलेजला दिलेले शिवाजीराजांचे नाव बदला आणि माझे नाव द्या" तेंव्हा आण्णा म्हणाले "एक वेळेस जन्मदात्या बापाचे नाव बदलेण पण एकदा दिलेले शिवाजीराजांचे नाव मी कधीही बदलणार नाही" आणणा हे महान शिवप्रेमी होते पण त्यांनी शिवाजीराजांचे नाव घेऊन तरुणांच्या हातात दगड धोंडे आणि तलवारी दिल्या नाहीत तर त्यांच्या हातात पाटी-पुस्तक आणि लेखणी दिली.
महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक चळवळीचे ते सक्रिय कार्यकर्ते होते.1906 सालचे सयाजीराव गायकवाड यांचे अस्पृश्योधाराबाबतचे भाषण वाचून अण्णांच्या मनात त्या वर्गाबाबत प्रचंड तळमळ निर्माण झाली.शाहूंराजांच्या छत्रछायेखाली त्यांचे शिक्षण झाले.
त्यांनी सत्यशोधकी विचारांसाठी मरण पत्करले, परंतु सनातनी विचारधारेला ते कधीही शरण गेले नाहीत, बाळासाहेब खेर या सनातनी मुख्यमंत्र्यांनी कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेची ग्रँट बंद केली, तरी अण्णा त्या सनातनी विचारधारेला शरण गेले नाहीत. शेवटपर्यंत पुरोगामीवृत्ती आणि तत्त्वनिष्ठा त्यांनी सोडली नाही. अशा नीतिमान, निस्वार्थी, निष्कलंक, निर्भय, निर्व्यसनी, निपक्षपाती, शिक्षणमहर्षीना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
---श्रीमंत कोकाटे

169 

Share


Pravin Wadmare
Written by
Pravin Wadmare

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad