Bluepad | Bluepad
Bluepad
आपले वृत्ती दोष तत्परतेने हटवले पाहिजे .
Shrikrishna Savargaonkar
Shrikrishna Savargaonkar
22nd Sep, 2022

Share

🙏🚩॥अमृतवाणी॥🚩🙏 आपण सत्संग करतो परंतू कुसंग होत रहातो . दुर्वर्तन दुराचार सोडत नाही . संयम करतो पण असंयमही करत असतो . साधन करतो त्याच बरोबर असाधनही करत असतो . जो पर्यंत साधने बरोबर असाधन तसेच गुणां बरोबर अवगुणही राहतात , तो पर्यंत साधना पूर्ण होत नाही . .
जो पर्यंत अवगुणांचा वा असुरी गुणांचा आधार असतो तो पर्यंत भगवत प्राप्ती होत नाही . म्हणून आपण नित्य सावध असले पाहिजे . नकळत जरी आपल्यात दोषवृत्ती निर्माण झाली तर ती ताबडतोब हटविण्याचा प्रयत्न केला पाहिजे . प्रयत्न करुनही दोषवृत्ती दूर हटली नाही तर व्याकूळतेले भगवंताला प्रार्थना करावी . पण प्रयत्न स्वतःच करुन दोष हटवले पाहिजेत . आज काल देवच सर्व माझ्या कडून चांगले वाईट करवून घेतो म्हणत स्वतः भक्तिच्या नावाने कसेही कहिही करुन न कळत भगवंताला दोषच देतात . हे बरे नाही . याला साधना वा भक्ती कसे म्हणावे . भक्ती हे अंतरंग बदलण्याचे साधन आहे . स्वतः अवलोकन करावे . इतरांनी दोष दाखविले तरी राग निंदा न धरता . भगवंतच त्याचे रुपाने आपल्याला मार्ग दाखवित आहे म्हणून आभार मानून स्वतः उन्नत व्हावे .
श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो .
🙏 श्रीकृष्ण सावरगांवकर
२२/०९/२०२२
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
आपले वृत्ती दोष तत्परतेने हटवले पाहिजे .

189 

Share


Shrikrishna Savargaonkar
Written by
Shrikrishna Savargaonkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad