Bluepad | Bluepad
Bluepad
जाणवले तुला.
प्रीती लांडगे.
प्रीती लांडगे.
22nd Sep, 2022

Share

पाहिले मी परंतु दिसले तुला, हसले मी अन खळी पडली तुला,स्पर्श केला मी आणि जाणवले तुला,मी हरपले परंतु तू जपले मला,कंठ माझा दाटला मात्र अश्रू ओघळती गाली तुझ्या, मी बावरले मात्र तु सावरले मी सजले सवरले पण गाली लाली आली तुझ्या. मी शहारले आणि तु मोहरला,आस माझी पण श्वास तुझा,मी मदमस्त तु बेधुंद, अवखळ मी आणि लिडिवाळ तु,गाल माझे अन लाली तुझी, मी आलेख तर तु निर्लेप,मी खंड तु अखंड, मी शब्द भाव तु मी दृष्टी तु दृष्टिकोन, मी प्रकृती तर तु आकृती, मी आधिर तर तु सुधिर, मी गंध तु सुगंध,मी राधा तर तु कान्हा,मी ज्योती तु दिपक मी शक्ती तर तु मुक्ती.
प्रीती लांडगे.
जाणवले तुला.

181 

Share


प्रीती लांडगे.
Written by
प्रीती लांडगे.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad