Bluepad | Bluepad
Bluepad
ओळख भारतीय वाद्य संस्कृतीची.
Kiran Sarjine
Kiran Sarjine
21st Sep, 2022

Share

या लेखात आपण काही भारतीय वाद्यांची ओळख करुन घेऊ
.
१) सुंदरी - हि सनईची धाकटी बहीण म्हणजे आकाराने
लहान.हिच्यातुन सुंदर सुर निर्माण होतात
म्हणून हिच नाव सुंदरी.
२) शिंग. हे वाद्य तस पितळी आणि आवाज तसा चांगला
मैलभर ऐकु येतो. ह्याचा उपयोग पुर्वीच्या काळी
युद्धाची सुरुवात करण्यासाठी वापरत होती. फार
पूर्वी रेड्याच शिंग वाजवत त्यावरून याला हे
नाव आकार व नाव मिळाले.
३) अलगुज - हे वाद्य म्हणजे लहान पावा किंवा बासरी.
४) पुंगी - गारुड्यांकडे आढळणारे हमखास वाद्य.
५) कर्णा - हे पितळी वाद्य देवळातील नगारखान्यातील
नगारा बंद करते वेळी वापरल जाते.
६) तुतारी - कर्णाचा धाकटा भाऊ म्हणजे हे पितळी वाद्य.
हे एक लहान वाद्य आहे
७) शंख - विष्णू च्या हातत आढळणारे व समुद्रात
मिळणारे हे वाद्य. ह्यातील नारळाच्या आकाराचे
शंख वापरण्यायोग्य असतात.
८) मोरचंग - हे वाद्य राजस्थानी संस्कृतीत रुळलेल
छोटेखानी वाद्य
शब्दांकन
किरण सरजिने
ओळख भारतीय वाद्य संस्कृतीची.

183 

Share


Kiran Sarjine
Written by
Kiran Sarjine

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad