Bluepad | Bluepad
Bluepad
संत श्री. बाळूमामा श्रावण महिना
स्वाती प्रभाकर आलदर
21st Sep, 2022

Share

एक महिना बचत केली तर ती वर्षेभर पुरत नाही पण रोज थोडी थोडी बचत केली तर ती जन्म भराची शिदोरी असते.... त्याचप्रमाणे फक्त
श्रावण महिन्यात आपण जे काही भक्ती, जप माळेवर नामस्मरण, ग्रंथ पारायण, उप‌वास, धार्मिक कार्य करतो त्यामुळे आपल्याला अधिक प्रसन्न, उत्साहित, आनंदी वाटते तसेच आपल्या आजूबाजूचे वातावरण सुद्धा म़ंगलमय, प्रसन्न होते....
श्रावण महिन्यातच आपण आचरण शुद्ध ठेवतो, धार्मिक कार्य करतो.... १२ महिन्यातून फक्त आपण एकाच महिन्यात हे का करतो....?
कारण....विज्ञान असं म्हणतं कि जर २१ दिवस सातत्यानी आपण कोणते हि कार्य केले तर आपल्याला त्याची आयुष्यभर सवय लागते....
श्रावण महिना हा शिवशंकराला अधिक प्रिय असणारा महिना आहे.
श्रावण महिन्यात निसर्ग आपल्या विविध रूपांचे दर्शन घडवत असतो. श्रावणातील ऊन सुद्धा अतिशय कोमल असते. या महिन्यांमध्ये विविध सणांना आणि समारंभांना सुरुवात होते. एक वेगळेच भक्तिभावमय वातावरण या महिन्यात निसर्गामध्ये निर्माण झालेले असते. त्यामुळे आपल्याला सुद्धा नामस्मरण, उपवास, व्रत-वैकल्य, पुजा-आर्चा, ग्रंथ पारायण करण्याची गोडी लागते... आणि आपल्याला कायमचीच या सर्वांची सवय लागते....
एक महिना बचत केली तर ती वर्षेभर पुरत नाही पण रोज थोडी थोडी बचत केली तर ती जन्म भराची शिदोरी असते. त्या बचतीमुळे आपल्याला कर्ज काढण्याची किंवा धावपळ करण्याची गरज पडतं नाही... त्याचप्रमाणे फक्त एक महिना भक्ती करून वर्षेभर देवाच्या मदतीची अपेक्षा करणं चुकीचंच....
श्रावण समाप्त होत आला आहे.... या नंतर हि आपण सर्वांनी अशीच देवाची भक्ती, नामस्मरण केले पाहिजे....
*"नामस्मरणाने देवाला आपल्या सोबत राहावेच लागते...."*
|| जय बाळूमामा ||
|| जय हलसिध्दनाथ ||
✍कु. स्वाती प्रभाकर आलदर✍
संत श्री. बाळूमामा श्रावण महिना

169 

Share


Written by
स्वाती प्रभाकर आलदर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad