Bluepad | Bluepad
Bluepad
रवी पाटील अरबट धरपडे व्यक्तिमत्व
G
Gajanan Harne
21st Sep, 2022

Share

🙏रवी पाटील अरबट एक धडपडे व्यक्तिमत्व 🙏. 🙏🙏🙏. वाढदिवसाचे अभिष्टचिंतन.🙏🙏🙏👍.
👍 आपला शेती, व्यवसाय सांभाळत असताना समाजकार्याची आवड असलेला शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील अरबट विविध सामाजिक संस्था संघटनांच्या माध्यमातून आपले समाज कार्या गेल्या तीस वर्षापासून करीत आहे.शेती, युवक, महिला, बेरोजगार, , सेंद्रिय शेती, आधी विविध विषयाला धरून त्यांनी अनेक कामे केली आहे. समाजकारण-राजकारण करीत असताना त्यांनी कोणत्याही प्रकारे भेदभाव पहालेला नाही. तरुण वयापासूनच समाज
कार्याला त्यांनी सुरुवात केली असून आजतागायत त्यांचे हे कार्य सातत्याने सय्यमाने चालू आहे. शेतकरी संघटना, नागरिक मंच, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, शेतकरी जागर मंच आदी अनेक संघटनेच्या व संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कामाचा मोठ्याप्रमाणात झपाटा लावला होता .त्या माध्यमातून अनेक शेतकरी युवक महिला नागरिक शेतकरी संघटनेशी जोडून त्या माध्यमातून अनेक मोठमोठे कामे पार पाडली आहे. या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी कार्य केले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना विविध सामाजिक संस्था संघटनेच्यावतीने सुद्धा त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. त्याच बरोबर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या चळवळीशी जुळून गेल्या अनेक वर्षांपासून ते सातत्याने भ्रष्टाचाराचा विरोधात काम करीत आहे. शेतकरी जागर मंच, पत्रकार संघटना, निर्भय बनो जनांदोलन ,माहितीचा अधिकार, ग्रामसभा, रॉकेल गॅस संबंधित कायदा, रेशनिंगच्या बाबत कायदा ,दारूबंदीचा कायदा शेतकरी कायदा अनेक कायद्यासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने उपोषणे मोर्चे केलेले आहेत. नागरिक मंच चा माध्यमातून त्यांनी शेतकरी व सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांसाठी मोठी एक चळवळ उभी केली होती त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न सोडून त्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोबत जुडून प्राध्यापक श्याम मानव यांच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात करून अनेक कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करून ग्रामीण भागात अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत . गावा, गावामध्ये असलेला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी गाव तेथे भ्रष्टाचार निर्मूलन समिती, नागरिक मंच, शेतकरी जागर मंच समितीची शाखा स्थापन करून, लोकांमध्ये सभा घेऊन लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण केलेला आहे. शेतकरी जागर मंच या माध्यमातून शेतकरी व मजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने ते कार्य करीत आहेत. अकोला मध्ये पार पडलेल्या दोन्ही कासोदा परिषदेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.माहितीचा अधिकार, जनलोकपाल कायदा व्हावा अण्णा हजारे यांची जेला मधून सुटका व्हावी म्हणून माझ्यासोबत त्यांनी गांधी जवाहर बाग अकोला येथे नऊ दिवस आमरण उपोषण सुद्धा केले तसेच अनेक आंदोलने केली आहेत. धरणे, मोर्चे, उपोषणे, रास्ता रोको आंदोलन, आदी विविध आंदोलने करून त्यांनी शासनावर दबाव आणून जनतेचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. तरुण वयात शिवसेनेसोबत काम केलेले आहे. तर आता राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबत धडाडीने काम करीत आहेत. अशा या धडपड्या युवा सामाजिक भान असलेल्या रवी पाटील यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन . तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास लाख.पुढील सामाजिक व राजकीय प्रगतीसाठी त्यांना मनापासून लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. भाऊ तुम जियो हजारो साल साल के दिन हो लाखो हजार. माणसाच्या गर्दीत अनेक चेहरे भेटतात. काही चांगले काही वाईट. काही कधीच लक्षात न राहणारे ,आणि काही कायमचे मनात घर करणारे, मनात घर करणारी जी अनेक माणसं जगताना लाभली ,त्यातलेच एक तुम्ही. म्हणूनच भाऊ व्यक्तिमत्व आपका ,शान है हमारी ,कर्तुत्व आपका ,पहचान है हमारी, हिफाजत करना है जिंदगी की, क्युकी सासे आपकी जान है हमारी🙏🙏🙏 भाऊचा मोबाईल नंबर..७०२८९११०८०🙏🙏🙏. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏आपला स्नेही मित्र 🙏
गजानन ओंकार हरणे, समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जन आंदोलन , खडकी अकोला. मोबाईल नंबर 🚩९८२२९४२६२३. 🙏👍.
रवी पाटील अरबट धरपडे व्यक्तिमत्व

235 

Share


G
Written by
Gajanan Harne

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad