Bluepad | Bluepad
Bluepad
आई योग्य सावली
Darshan Joshi
Darshan Joshi
21st Sep, 2022

Share

स्त्रीवर केलेले सुंदर लिखाण....कोणी लिहिले माहिती नाही पण अफलातून वर्णन..... लेखक माहीत नाही. कुणाला तरी एका प्रवासात एकाने दिलेल्या मासिकातील पद्य
बाई शिकली म्हणून शहाणी झाली नाही.ती शहाणीच होती... आधीपासून. आजही आहे.उंबरठ्याच्या आत गुलाम असली तरी सलामाची मानकरी होती ती, आजही आहे.ओझी वाढलीत तिच्या पाठीवरची. तरीही वाकली नव्हती ती. आजही नाही.ती माऊली होती, सावली होती. आजही आहे. पण बाहुली कधीच नव्हती. आजही नाही.ती होती कणा. नसून 'मी' पणा. ती होती जिद्द. सांभाळून हद्द. आजही आहे.ती नुसती अय्या - बय्या नव्हे, छय्या - पिय्या नव्हे, नुसती शय्या तर नव्हेच नव्हे. ती मनाचा हिय्या. होती आणि आहे.ती पणती, तीच तेल, वात, ज्योत. तीच तेज, प्रकाश. जळणारी आणि उजळणारी. तेव्हा आणि आताही.मार्ग खडतर. आयुष्य दुस्तर. मात्र ती कणखर. सुख कणभर, दु:ख मणभर. तरी ती घरभर. आभाळ जशी.आता ती उत्क्रांत. नाना क्षेत्रे पादाक्रांत. खांद्याला खांदा. पावलासोबत पाऊल. उज्वल उद्याची चाहूल..मी खरच नतमस्तक होणाऱ्या गोष्टी म्हणजे आई किती छोटा शब्द आहे आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर पण आई समजून कुठे ना कुठलंही आपण कमी पडतो का आदर राखायला हवा पत्नी आदर राखायला पाहिजेच पण आई वडिलांना आदर राखायला शिकले पाहिजे नाहीतर परिणाम गंभीर होतात कधी नवरा रागवतो पण या गोष्टी अश्या त्या बहिणीला इजा ना कराव्या लागतात कारण आपण आई समजून किती घेतो याचा विचार करावा लागेलच ना कितीवेळा या गोष्टी आदर असल्यामुळे कित्येक गैरसमज दूर होण्यास मदत होईल ना आदर असायला हवा नाहीतर आई वडिलांना आदर राखायला पाहिजेच कारण नसेल संवाद होणे अशक्य असतेच आई योग्य सावली असेल राहील कारण आई माया अशक्य मिळणार आणि टिकवायची असते म्हणले स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे म्हणले आहे नाही म्हणूच आई सर्वात मोठी योग्य सावली आहे .

186 

Share


Darshan Joshi
Written by
Darshan Joshi

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad