Bluepad | Bluepad
Bluepad
!! बराचसा काळ असा मागे निघून गेला !!
धर्मराज रत्तू पवार
21st Sep, 2022

Share

बराचसा काळ असा मागे निघून गेला
विचार करायला पाहिजे होता तो अजून नाही केला
दिवसामागून दिवस चालले
नाही हिशोब केला आयुष्य बाकी किती राहिले
काळे केश पांढरे ढवळे झाले
आरशापुढे तरी पाहिजे होते उभे राहिले
पण आरसाच तर नाही ठेवला
बराचसा काळ असा मागे निघून गेला
विचार करायला पाहिजे होता तो अजून नाही केला । १ ।
माय गेली बाप गेला
आजा पणजा तर नाहीच पाहीला
जाताना संगे काहीच न नेला
जमिन जागा इथेच राहीला
तरीही टोकरतो शेतधुऱ्याला
बराचसा काळ असा मागे निघून गेला
विचार करायला पाहिजे होता तो अजून नाही केला । २ ।
पहा दोन हात दहा बोटे
तयांनी कुणा किती टोचवले काटे
कुणा कुणा मारले दगडगोटे
आजही आहेत हाती कु-हाडी अन् सोटे
मारण्यासाठी पराला
बराचसा काळ असा मागे निघून गेला
विचार करायला पाहिजे होता तो अजून नाही केला । ३ ।
करू नये ते सदाच करी
नजर ठेवून पराची चोरी
जाऊ नये जेथे ज्या घरी
जाई सोडून आपले परदारी
श्रमाचे खातो परांच्या लाज वाटे कधी मनाला
बराचसा काळ असा मागे निघून गेला
विचार करायला पाहिजे होता तो अजून नाही केला । ४।
बोलू नये ते लोकांत बोले
आपल्या बोला आपण डोले
करू नये तेच नेहमी केले
अपकिर्तीला ते कारण झाले
नीच , निसाक , असा जगात झाला
बराचसा काळ असा मागे निघून गेला
विचार करायला पाहिजे होता तो अजून नाही केला । ५ ।
भक्षू नये ते अभक्ष्य भक्षण केले
पिऊ नये ते मदीरापान सतत केले
गेले तेज शरिर निस्तेज , निरस झाले
गेली लक्ष्मी दारिद्र्य चालून घरा आले
सोडता सोडिना , सवयींचा असा गुलाम झाला
बराचसा काळ असा मागे निघून गेला
विचार करायला पाहिजे होता तो अजून नाही केला । ६ ।
- - - - - धर्मराज रत्तू पवार

242 

Share


Written by
धर्मराज रत्तू पवार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad