Bluepad | Bluepad
Bluepad
विनवणी बळीराजाला
श्री विलास रामचंद्र सुतार
श्री विलास रामचंद्र सुतार
21st Sep, 2022

Share

.... विनवणी बळीराजाला....
काळ्या आईशी राखा इमान
पेरु नका रे रासायनिक विष
न येईल घरी लक्ष्मी कधीही
न मिळेल सुखाचा घास....१
पारंपारिक शेती देई सदा
जगाला अमृताचा घास
रासायनिक फवारणीनं
येई रोगराई हमखास .....२
पेराल तेच उगवेल रानी
मंत्र असू द्या मनी खास
समृद्ध जीवनासाठी बळी
जगी शेतीच असे झकास.... ३
शहाणा हो तू बळीराजा
विनवणी तुजला रे खास
जगाचा या पोशिंदा तू
घे सेंद्रीय शेतीचा ध्यास..‌‌.४
कवि अटलविलास

233 

Share


श्री विलास रामचंद्र सुतार
Written by
श्री विलास रामचंद्र सुतार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad