Bluepad | Bluepad
Bluepad
महाराष्ट्राचा रांगडा गडी जीवन कदम (भाग 1)
Dipapooja Chavhan❤️
Dipapooja Chavhan❤️
21st Sep, 2022

Share

आज ज्यांच्या विषयी मी लिहत आहे तेवढा वेळ मी कधीच विचार करायला घेतला नसेल .... रांगडा गडी.... खेडेगावात राहणारा पठ्ठ्या.... गावाच्या ओढ्यात पोहणारा....... भटकंती ची वेड असणारा
इंजिनियर पण मनाने मात्र मराठमोळा साधा शेतकरी पुत्र.... आई बाबांची सेवा करणारा श्रवणबाळ.. तर मुलाचे लाड पुरवणारा बाप.... बहिणींना सुखी ठेवणारा नेहमी हसवणारा...
इतकं च नव्हे तर सगळ्या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राबाहेर असणाऱ्या लोकांना आपल्या बोलण्यातून प्रेमात पाडून जाणारा......
तसे तर आपल्या राज्यात आता गड किल्ल्यांची माहिती देणारे बरेच यूट्यूब चॅनल आहेत पण याची गोष्ट च न्यारी.. त्याला काय म्हणावे ... मावळा..... त्याला बघून वाटत की ह्यांना महाराजांनीच आदेश दिले असावे की जा...... आपल्या जनतेला आपली आणि आपल्या किल्ल्यांची माहिती सांग सांग ह्या लोकांना किती महत्वाचे आहेत ह्या वास्तू...... हे किल्ले ज्यांच्या साठी आपले बरेच लोक आपण गमावले.......
जीवन कदम.....
जीवन दादांना मी गेले चार वर्ष पाहत आहे..... वैयक्तिक तर नाही पण जेवढं ते यूट्यूब ला दिसतात तेवढं मी त्यांना ओळखते.
रांगडा गडी.....
आपला काळा घोडा...(गाडी). घेऊन सकाळ असो वा दुपार गड गाठतो..... मनापासून सगळ्या गोष्टी पाहतो आणि आपल्याला ही तेवढ्याच मनापासून त्या गोष्टी सांगतो आणि दाखवतो ही....
जवळ जवळ सगळे किल्ले..... एव्हाना जे आपल्याला माहीत ही नाही आता मध्ये आहेत तशी किल्ले सुद्धा तो शोधून काढतो त्यांची माहिती काढायला तळागाळापर्यंत जातो....
मराठी भाषेसाठी, मराठी लोकांसाठी उभा असतो. आपले मत प्रखर पणाने सांगतो .....
एका किल्ल्या वर गेला असता आजी बाजूचे सगळे लहान मोठे गड दिसत नसले तरी मॅप च्या आधारे का होई ना पण दाखवायचा प्रयत्न मात्र करतो... वाटेत भेटणाऱ्या लोकांशी शेतकऱ्यांशी भेटून त्यांचे पीकपाणी उन्हाळ्यात भेटला असता पाणी आहे का अश्या गोष्टी सुद्धा विचारतो. हॉटेल मध्ये राहण्यापेक्षा स्थानिक लोकांच्या घरी राहून त्यांच्या घरचं साधं जेवण करणे पसंद करतो अगदी च छोट्या खेडेगावात राहतो... त्यांच्या घरचे असेल ते जेवण करतो.... तिथे च आराम करून सकाळी किल्यांकडे प्रस्थान करतो...
आईबाबा सोबत खेड्यात राहलो. मोठा झालो... मी माझी मती माझी लोक कधी विसरत नाही ह्या मताचा तो ...
आज जवळ पास साडे चार लाख लोक त्यांच्या व्हिडिओ ची वाट पाहतात... नमस्कार मित्रानो आपण आज ..... ह्या किल्ल्यावर आहोत आणि आज आपण ह्या गोष्टी बघणार आहोत..... हे ऐकायला लाखो लोक वाट पाहतात.. .
क्रमशः
महाराष्ट्राचा रांगडा गडी  जीवन कदम (भाग 1)

173 

Share


Dipapooja Chavhan❤️
Written by
Dipapooja Chavhan❤️

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad