Bluepad | Bluepad
Bluepad
पारिजात
Anjali K.
Anjali K.
21st Sep, 2022

Share

आजची सकाळ मालाला खुप आनंददायी वाटत होती. तिने चहा बनवला आशा आणि रंजना आन्हिक उरकत होत्या. चहापातेलीवर झाकण ठेवून मालाने स्वतःच्या कपाला तोंड लावले कपातील चहा पीत पीत ती सोबत वर्तमानपत्रात डोकावू लागली,राजकीय घडामोडींवर तर फक्त नजर फिरवत तिन चतुरंग पुरवणीच वाचन सुरू केल.
महिलांचे आरोग्य,महिलांवरील मालिका, कुठेतरी एखाद दुसरी कार्यक्रम ची झलक असे वाचन करून ती ऑफिस डब्यात नेण्यासाठी काय बनवायच असा विचार करू लागली . इतक्यात
आशा घाई घाईत बाहेर पडत होती हे तिच्या लक्षात आले,"अग काल मला वंदना काकु भेटली". ती म्हणाली. आशा वळली. "कशी आहे ग काकु?खुप दिवसात ती घरी आली नाही आपल्या.आईच आणि तिच तस पटायच नाही पण आई असताना ती अधूनमधून यायची घरी"आशा बोलली. माला म्हणाली "हो ना आजही आईदादाघरातचआहेत असच वाटत. तेआताआपल्यात नाहीत अस मला वाटतच" नाही.,तिचे डोळे पाणावले होते."तू चहा बिस्किट घेतली ना ?अशी घाईत कुठे निघालीस पण?" "आलेच बघ दहा मिनिटात "अस बोलतच आशा दरवाज्यातून बाहेर पडली देखील.
आशा घरातील वयान लहान..माला रंजना आणि आशा या एका कुटुंबातील तीन बहिणी. पैकी माला ही एकटी कमावती मोठी ताई.
आईवडील एकापाठोपाठ दोघ एका वर्षात तिघींना सोडून देवाघरी गेले होते. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एका मोठ्या कुटुंबातील हे नोकरीसाठी मुलुंडला स्थाईक झालेल चौकोनी कुटुंब.
आई वडील मोठी मुलगी माला मधली रंजना आणि धाकटी आशा. वडील सदाशिव बांगर हे ठाण्यात एका खाजगी कंपनीत काम करत होते तर आई मंदा ही गृहिणी . घरकाम करून मुलींना तिने खूप प्रेमाने मोठे केल.मुलीही शिक्षणात चांगलाच दर्जा प्राप्त करून होत्या.
पण नेहमीच नियती कठोर परीक्षा घेत असते.तस झाल आणि आजाराच निमित्त झाल आणि सदाशिवराव मृत्यू पावले.घरावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. काही महिन्यानंतर लगेच मंदाताई पण जिन्यातून उतरताना तोल जाऊन पडल्या आणि दोन एक आठवड्याचा आजारात आणि नवर्‍याबरोबर घालवलेले सुखदुःख आठवित त्यांचीही प्राणज्योत मालवली.
मालाला हे रोजच सकाळीच आठवणार आणि छळणार पण विसरू म्हणताही न विसरता येणार बालपणापासूनचा जीवनाचा प्रवास.
आजकाल ती थोडी रूळली एवढ खर.
एकदम तिची तंद्री भंग पावली "अग ताई आज जायच की नाही तुला ऑफिस ला "या रंजनाच्या वाक्यांनी.ती थोडी हडबडली. वर्तमानपत्राची पाने सावरून चहाचा कप ठेवून ती पुन्हा स्वयंपाक घरात शिरली. ऐवढ्यात तिला आंबट असा इडलीपीठचा डबा दिसला तिने तो उघडला पीठ तरारून वर ऊठलेले तिने पाहिले.
अरेच्चा; म्हणजे मघाशी जी धावपळ करीत बाहेर पडलेली आपली लहानी बहीण आशा ही बहुतेक चटणी च सामान म्हणजेच नारळ.मिरच्या.डाळ.कोथिंबीर आणायला गेली आहे हे तिच्या सहजीच लक्षात आल आणि ती खूप सुखावली..आपल्या बहीणी आता खरच मोठ्या झाल्या आहेत आणि आईवडीलाच्या संस्कारातून साकारणार उद्याचे सुखद क्षण पाहत ती मनस्वी आनंदान हसली..
अंजलि

182 

Share


Anjali K.
Written by
Anjali K.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad