Bluepad | Bluepad
Bluepad
भान
श्री विलास रामचंद्र सुतार
श्री विलास रामचंद्र सुतार
21st Sep, 2022

Share

.... भान......
भान यावे या क्षणाला
बळी जाणत्या मनाला ....धृ
नको देऊ बळी विष
तुझ्या काळ्या रं आईला
भान यावे या क्षणाला
बळी जाणत्या मनाला ....१
विष पेरुन रानात
बोलवी तू मरणाला
भान यावे या क्षणाला
बळी जाणत्या मनाला ......२
शेणखत गोमूत्र देई
नवी संजीवनी शेताला
भान यावे या क्षणाला
बळी जाणत्या मनाला .....३
घे जाणून तू थोडं
पारंपारिक पध्दतीला .
भान यावे या क्षणाला
बळी जाणत्या मनाला ....४
कर सेंद्रीय शेती बळी
सुख लाभेल जीवनाला
भान यावे या क्षणाला
बळी जाणत्या मनाला ....५
कवि अटलविलास

238 

Share


श्री विलास रामचंद्र सुतार
Written by
श्री विलास रामचंद्र सुतार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad