Bluepad | Bluepad
Bluepad
श्रेष्ठ भक्त अर्थात संतांचे गुणांचा आदर्श .
Shrikrishna Savargaonkar
Shrikrishna Savargaonkar
21st Sep, 2022

Share

🙏🚩॥अमृतवाणी॥🚩🙏 साधक भक्तांचा सिद्ध भक्तां बद्दल अत्यंत पूज्य भाव असतो . सिद्ध भक्तांच्या श्रेष्ठ गुणां बद्दल आकर्षण असते . म्हणून ते त्या गुणांना आदर्श मानून आदरपूर्वक त्यांचे अनुसरण करण्यासाठी भगवत्परायण होतात . अशा प्रकारे भगवंताचे चिंतन करण्याने आणि भगवंतावर दृढ विश्वास ठेवण्याने थोर भक्तांचे श्रेष्ठ गुण आपोआप येतात . यास्तव थोर संतांचे चरित्राचा अभ्यास व मनन चिंतन करावे . त्यांचे श्रेष्ठ गुणांचा आदर्श ठेवून भगवंताचे चिंतन करावे . भक्ती सुलभ व सहज होते . परिश्रम टाळून अंधपणाने भक्ती करणे सर्वथा अहिताचे आहे . अशा भक्तीने असा भक्त स्वतः बरोबर देव देश आणि धर्माचे अहितच करतो . भगत्कृपेसाठी सत्गुणांचा अंगीकार करुन सत्कर्म (सेवा)करणेच श्रेष्ठ आहे . श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 🙏 श्रीकृष्ण सावरगांवकर २१/०९/२०२२ 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
श्रेष्ठ भक्त अर्थात संतांचे गुणांचा आदर्श .

177 

Share


Shrikrishna Savargaonkar
Written by
Shrikrishna Savargaonkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad