Bluepad | Bluepad
Bluepad
देहाचियारंगी २३
Vidyadhar Pande
Vidyadhar Pande
20th Sep, 2022

Share

सिमींता
मी नाविलाजाने बसले.तेव्हा ते त्यांच्या गावातील अनुभव सांगू लागले.
" गावगन्ना पुढारी ही एक विकासाला लागलेली किड आहे.अशिक्षीत माणूस गावचा सरपंच होतो आणि स्वतःचा प्रपंच करतो.गावातील सुशिक्षित तरुण त्याची डोकेदुखी ठरते.तेव्हा अशा तरुणांना हस्तेपरहस्ते वेसनाधिन बनवतो.गावात बदनाम करतो.त्याच्या वाटेतला काटा दूर करतो.असे अनेक तरुण मुलं उध्वस्त करून गावच्या विकासाचा निधी हडप करतो." मी म्हणाले,
"माझा अनुभव सुशिक्षित महिलांविषयी अचंबित करणारा आहे.त्या जेवढ्या सुशिक्षित तेवढ्या खूप देवभोळ्या असतात.सगळ्यात जास्त अंधश्रद्धेच्या वाहक त्याच आहेत.विषेश म्हणजे शिक्षीका मुलांवर देवधर्माचे संस्कार करण्यात आघाडीवर आहेत.परवा मी सकाळी शाळेसमोरुन जात असताना थोडा वेळ शाळेत थांबले.प्रार्थना संपून मुलं वर्गात बसले.तेव्हा एक शिक्षिका मुलांकडून हजेरी संपताच "जय जय स्वामी समर्थ" हे तालासुरात गावून घेत होती.जे आपल्या घटनेत किंवा अभ्यासक्रमात कोठेच नाही.हे गावकरी आनंदाने ऐकून घेतात .नव्हे तर त्या शिक्षिकेचे तोंड भरून कौतुक करतात.आहेत ना मंदीरे अशा उपक्रमांना.शाळेत विद्यार्थ्यांना फक्त ज्ञानच द्या.हे ठनकावून सांगणारे कोणी नाहीत.हे सावित्रीबाईंचे दुर्दैव का आपली माणसीक गुलामगिरी ? या अशा समाजव्यवस्थेत माझ्यासारख्या कितीतरी मुलींचे दरदिवशी आजही स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी पर्वात जीवन उद्ध्वस्त करणे सुरुच आहे."
हे ऐकून गुरुजी गंभीर झाले.मग काही विशेष बोलले नाहीत.चेहरा थोडा बारीक करून हसले.वेळ किती झाला आहे,ते पाहीले.आणि मला विचारले,
" वाचनालयातून कोणतं पुस्तक घेणार आहात?तुमची आवड काय आहे ?"
"एखाद्या मोठ्या लेखकाची सामाजिक विचाराची कादंबरी वाचावी.असा विचार करुन आले आहे."
" ठीक आहे, तुम्ही माधवी देसाई यांचे'नाच ग घुमा ' हे आत्मचरित्र वाचा.थोर लेखक पद्मश्री रणजीत देसाई यांच्या त्या पत्नी.भालजी पेंढारकराच्या कन्या. श्रीमान योगीचे लेखक रंजीत देसाई यांनी त्यांची कशी कुचंबना केली?ते त्या आत्मचरित्रात लिहिले आहे.स्त्री कोणी ही असो तिची विवंचना संपत नाही.हे माधवी देसाई यांनी सांगितले आहे.रणजीत देसाई सरंजामदार घराण्यातील नावाजलेले लेखक.त्यांचा दांभिक बुरखा टराटरा फाडला.ती कादंबरी सामाजिक अभ्यासाचा विषय समजून गांभीर्याने वाचा.चिंतन करुन मला फोन करा."
गुरुजींनी मोबाईल नंबर दिला.येतो म्हणाले, निघाले ! धिम्या गतीने चालत जाताना मी दूरपर्यंत पहात राहिले.
खूप उशीर झाला होता.मी लगबगीने वाचनालयात गेले.नाच ग घुमा पुस्तक घेतलं.बस स्टॅंडवर गेले.बस लागली होती.घरी दारात मामी वाट पहात बसल्या होत्या.गेल्याबरोबर विचारले,
"कुठं ग्येलतीस ग सिमू? सिरमुचे मायबाप आल्ते.बोलायच मणीत व्हते.दोन दिसान कसली तारीक हाय मणले.उद्यांचला सकाळा आजुक येणार हायीत.म्या नाही काय बोल्ले."
मी ऐकले," मामी चहा करु का?" असं विचारुन घरात गेले.मला चहा घ्यायचा होता.आदन ठेवले.पाणी उकळेपर्यंत साडी बदलली.साखर,पत्ती,दुध टाकलं.दोघींनी चहा घेतला.मामी जेवायचं नाही म्हणाल्या.माझ्या एकटी पुरत्या सकाळच्या चपात्या होत्या.नाच ग घुमा वाचायची मला उत्सुकता लागली होती.सुरवात केली, वाचता वाचता डोळा लागला.जेवनाच भान राहिले नाही.पहाटेच्या साखर झोपेत स्वप्न पडलं.
माझा नवरा गोविंद स्वप्नात आला.काळबांडेच्या शेतात दारुमटनाची पार्टी झाली होती.खूप पिऊन आला होता.दुपारीची वेळ होती. सिमू सिमू अशी हाक कानावर आली.मी कामात होते .मला उचललं.झोकांड्या देत पलंगावर नेऊन टेकवलं.माझे चुंबन घेऊ लागला.स्वप्नात सुध्दा दारुचा अंबट वास येत होता. तरी मी आडेवेडे न घेता शरीर त्याच्या हवाली केले.आनंद वाटत असतानाच मामीची हाक कानावर आली.
" सिमू आज सडा टाकायचा नाय का?"
चांगलच फटफटलं होतं.मी डोळे चोळत उठले.नाच ग घुमा पलंगावर उशाला पडलं होतं.ते उचलून बाजूला ठेवताना रणजीत देसाई यांची आठवण झाली.आणि नवऱ्याच्या पहाटेच्या स्वप्नातील झोंबाझोंबीकडे घेऊन गेली.अन मन खिन्न झालं.
मामींनी दररोजच्या प्रमाणे शेन आणुन ठेवलं होतं.ते बकेटात कालवलं.दारात पहाटेच्या स्वप्नातील आठवनींचा सडा शिंपू लागले.त्या धुंदीत बकेटाला खरडण लागलेलं ध्यानात आले नाही.मामीच म्हणाल्या,
"सिमू कशाला येवड जागतीस.तुज्या डोळेत अजून झोप तशीच हाय.तोंड हिसळून घे आदेवल.कर च्या.व्हचील की पास.ईतकी जागतीस कशाला?"
मी हो म्हणाले,ब्रशवर पेस्ट घेऊन तोंडात घातला.लागले दात घासायला.स्वप्नातील चुंबनाचा अंबट गोडवा थुंकावा वाटत नव्हता. गिळता ही येत नव्हता. क्षणभर दातखीळ बसवून विचार मग्न झाले.तंद्री भंग पावे पर्यंत.
देहाचियारंगी २३
क्रमशः

240 

Share


Vidyadhar Pande
Written by
Vidyadhar Pande

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad