Bluepad | Bluepad
Bluepad
चिंता
swati jangam
swati jangam
20th Sep, 2022

Share

🏜️चिंता.....🏞️
मन हजार चिंतांनी सतावते,
बंद जुन्या दारासम किरकिरते ...
ना कळे कसा तो जीव
बिजागरी परी गंजतो ....?
आज कडी कोयंडे तोडून
वाटते चौकट लंघुन
अंतर पार करावे...
पण हाक मनाची शाप ,
होतो सूर्याहून संताप...
सडा अंगणी काचे परी,
रुतल्या वेदना जरी
हृदयी नक्षीने मांडतो...
मन अस्तिक मोजते पुण्याईची खोली, नवसाची लाच ठेवून वाढवित बोली...
असा रोज अध्यात्माचा शृंगार,
मान साचविते अपुऱ्या इच्छांचे भंगार...
मोडला डाव जरी
अनेक संधीने जिंकतो,
पण सरते शेवटी
स्व-खुशीने हरतो..
अशा उनाड मनाचा
लागला मज ठाव.
आता सहज झेलतो वार,
भरून टाकतो घाव..
मन असेच असते स्वच्छंदी अटकेपार
मान -अपमानाची वगळून कात, सत्यापलीकडचे उमगली वाट..
धीट उडाले सैर ...
दूर फेकल्या चिंत्या त्या हजार...
गरुड भरारी घेऊन देवाचे मानतो आभार....
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
काव्यपंक्ती :स्वाती धन
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
चिंता

181 

Share


swati jangam
Written by
swati jangam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad