Bluepad | Bluepad
Bluepad
DAIRY 😍😔😁🤔😜👨‍❤️‍👨🥰
नाम नहीं बताऊंगा
नाम नहीं बताऊंगा
20th Sep, 2022

Share

आज पासून मी diary लिहिणार आहे. खरतर ही पर्सनल आहे तुम्हाला वाचायची असेल तरच वाचा.रोजच लिहिलं असं नाही पण imp day विषयी लिहिलं.
➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️
20 सप्टेंबर 2022
आज मी सकाळी 7 वाजता उठलो. पाणी तापायला ठेवलं आणि मग भांडी घासली. कि पुन्हा मस्त अंघोळ केली आणि कॉलेज ला गेलो.
पहिलं lecture केल आणि मग library मध्ये गेलो तिथे newspaper वाचला आणि मग पुन्हा वर्गात आलो. पण lecture झालाच नाही. मग पुढचा lecture करून मी घरी निघालो.
घरी येऊन आमटी घातली आणि मग भात घातला. मग जेवण तयार झाल्यावर मोबाईल बघत बघत खाल्लं. आणि थोडा वेळ बसलो.
सध्या मी खूपच confuse असतो कि life मध्ये पुढे काय करायच. पण म्हणलं काय होऊ ते होऊ पण अभ्यास भरपूर करायचा. म्हणून मी आज पासून अभ्यासिका join करायची असं ठरवलं होतं.
ठरल्या प्रमाणे मी 1 वाजता अभतासिकेत गेलो. तिथे सातवी च इतिहास च पुस्तक वाचलं. मध्ये शेजारच्या मुलाचं mpsc च पुस्तकं थोडं बघितलं तसं खूपच टेन्शन यायला लागलं. आपलं कसं होणार आपण एवढा अभ्यास करू कि नाही. मी पाच वाजेपर्यंत म्हणजे जवळ चार तास अभ्यास केला पण. माझं मन काय एका जागेवर नव्हतं नुसतं आपण पुढे काय करायच हेच.
मधेच असं वाटायचं सगळं सोडून जावं निघून कुठे तरी मग पुन्हा वाटायचं जायच तरी कुठे.
मग घरी आलो जेवलो. मग थोडा वेळ मोबाईल घेऊन बसलो. पुन्हा थोडा फ्रेश झालो. थोडा अभ्यास केला. बाथरूम ला गेलो. जेवलो आणि मग म्हणलं आजचा दिवस थोडा वेगळा होता म्हणून लिहून ठेवू.
आता थोडं the secret पुस्तकं वाचतो आणि झोपतो आज खूप झोप आले खूप अभ्यास झाला ना 😁.ok byyy😘(10:00)
➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️
आज 22 सप्टेंबर 2022
आता रात्रीचे साडे दहा वाजलेत आणि आता मी झोपतच आहे त्यापूर्वी आज काय घडलं ते सांगतो.
आपण आधल्या दिवशी काय करायच हे ठरवून ठेवत असतो. आणि त्याचप्रमाणे आपण दिवस घालवायचा असं आपण ठरवतो. पण खरतर आपण कितीही काहीही ठरवलं तरी जे व्हायचं ते होतच. आणि याचा आज मला प्रत्यक्ष अनुभव आला.
दररोज प्रमाणे मी सकाळी उठून अंघोळ करून आणि पाणी भरून कॉलेज ला गेलो. दोन lecture झाले आणि वाघमारे चा फोन आला. मी खरतर खूपच चकित झालो कारण मी नेमका त्यावेळी त्याचाच विचार करत होतो. आणि रात्री माझ्या स्वप्नात पण तो आला होता. यावरून असं सुद्धा समजतं कि आपण ज्या गोष्टीचा मनापासून विचार करतो ती गोष्ट आपल्याकडे आकर्षित होते. गेले कित्येक दिवस आम्ही भेटलो सुद्धा नव्हतो आणि बोललो सुद्धा नव्हतो आणि मी परत लवकर भेटणार पण नव्हतो पण नियती समोर काही नाही.
मी कॉलेज मध्ये असल्यामुळे फोन उचलला नाही. मग कॉलेज सुटल्यावर फोन केला. तर आज त्याने सुट्टी मारली होती. तो बोलत होता मी आज येतोय मला भेट. एवढे दिवस झाले न भेटल्यामुळं मला पण खूप आठवण येत होती. मग मी म्हटलं भेटू. पण तोही जेवला नव्हता आणि मी पण जेवलो नव्हतो. म्हणून आम्ही कुठेतरी जेवायचं ठरवलं. आम्ही चौकात भेटलो. तेथून जरा रेशन कार्ड च काम होतं ते केल.
मग तेथून हॉटेल मध्ये जेवायला गेलो. या आधी मी एकदाच मित्रांसोबत हॉटेल मध्ये जेवायला गेलो होतो पण बिल सुद्धा मी भरला नव्हतो. पन आज मी स्वतः च्या मर्जीने हॉटेल मध्ये जेवायला गेलो होतो.
मग आम्ही दोन चिकन ताट मागवले. मी काय जास्त खात नाही पण खाल्लं कसं तरी तोही पोटभर जेवला.460 रुपये बिल झाला मीच दिला.मग आता मला कंटाळा आला होता म्हणलं आता मला तूझ्या घरी यायच आहे. मग मी सायकल ने गेलो आणि तो st ने. मग गेल्यावर थोडी tv बघितली आणि दोघेही झोपलो. मला काय झोपच येत नव्हती तरी पडून राहिलो. थोडया वेळाने तो उठला कपडे धुतले आणि मग अंगनातले गवत काढण्यासाठी गेला. मी झोपलेलो पण झोप शेवटी नाहीच आली. मग थोडया वेळाने उठून बाहेर आलो तर तो गवत काढत होता मग मी पायरी वर बसलो मग तोही बसला.
मग आम्ही भरपूर वेळ गप्पा मारत बसलो. मग आता जायच ठरलं पण माझं तर मन करतच नव्हतं तरीही कसातरी निघालो. मग अर्ध्यात गाडीवर आणि अर्ध्यातून चालत आलो.
घरी आलो पण काय मन कशातच लागत नव्हतं तरीही थोडं पुस्तकं वाचलं. पण तरी नाही रहावलं आणि मग शेवटी कॉल केला थोडं बोललो तेव्हा कुठे बर वाटलं.
मग जेवलो आणि मग मोबाईल घेऊन लिहायला बसलो.
मी ठरवलेला दिवस आणि घडलेला दिवस यात खूप फरक आहे. मी कॉलेज, जेवण, अभ्यासिका, घर, अभ्यास, जेवण आणि झोपणे असं ठरवलं होतं पण झालं काय वेगळंच. असं आहे. असो जे काही घडेल छानच घडेल. 😘आयुष्य खूप सुंदर आहे जर ती व्यक्ती सोबत असेल. 😘
➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️
27 सप्टेंबर 2022
आज सकाळ तर वाघमारे च्या घरी सुरु झाली मग तेथून आलो मग जेवण बनवल जेवलो आणि खाली लायब्ररी मध्ये गेलो तेथून मग फोटो काढून घरी गेलो. मग आता काय करायच मग थोडं झोपलो.
आणि मग मित्राला फोन केला म्हणलं देवीला जाऊ वरची वाघजाई ला. मग पटकन जेवलो आणि वर गेलो मग तेथून गाडीवर आम्ही हातनोशी गावात गेलो तेथून वर चालत गेलो खूप मज्जा आली वरून गावे खूप सुंदर दिसत होती. मग तेथे दर्शन घेतलं फोटो काढले. तेथून केंजळगड, रायरेश्वर, रोहिडा, तोरणा, राजगड, मोहनगड, देवघर धरण, मांढरदेवी, घेवडेश्वर अशी ठिकाण दिसत होती.
खूप मज्जा आली मग नंतर खाली आलो खाली मग मी गाडी घेतली खूप मज्जा आली गाडी चालवायला. ती गाव किती सुंदर दिसत होती, सगळं सुंदर सुंदर वाटत होतं कायम लक्षात राहील. मग भोर ला आलो चहा पिली, समोसा खाल्ला आणि घरी चाललो तर दुसरा मित्र भेटला त्याच्यासोबत पुन्हा चहा पिली आणि खालच्या वाघजाई ला जाऊन आलो. मग घरी आलो हात पाय धुतले आणि शेजारच्या मित्राकडे गेलो 😂. तिथे बसलो आणि तिथेच जेवलो. आणि झोपणार तर सहजच वाघमारे ला फोन केला आणि तो एवढा बोलत बसला कि दीड तास आम्ही बोलत बसलो. आणि आता लिहून झोपतोय उद्या कॉलेज ला जायच आहे ना. 🙏🏾😘
DAIRY 😍😔😁🤔😜👨‍❤️‍👨🥰
DAIRY 😍😔😁🤔😜👨‍❤️‍👨🥰
➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️
27 सप्टेंबर 2022
आज सकाळी जरा उशीरच झाला उठायला पटकन उठलो, अंघोळ केली. आणि कॉलेज ला गेलो चारही lecture केले आणि मग कॉलेज सुटलं घरी आलो जेवण बनवल, जेवण गॅस वर ठेवून तसाच मावशी न भाकरी आणल्या होत्या त्या घेऊन आलो जेवलो. मग खूप कंटाळा आला होता म्हणून झोपलो.
नंतर उठलो, बाथरूम ला गेलो, तोंड धुवून पुस्तक वाचत होतो तेवढ्यात पारस आला मग जेवलो आणि त्याबरोबर बाजारात गेलो, कपड्याच्या दुकानात फिरलो, समोसा खाल्लं आणि दुसऱ्या मित्रा कडे गेलो तिथे बसलो खूप वेळ. आणि मग वाघमारे बर बोलत बसलो. मग जेवलो आणि आम्ही पाच मित्र वरती वाघजाई मंदिर कडे गेलो तिथे खूप मज्जा केली. दर्शन घेतले आणि ice स्क्रीम खाल्ली. तिथे आम्ही game खेळल्या खूप मज्जा आली. रिंग टाकायची, ग्लास पडायचे, अंक बनवायचे. खूप खूप मज्जा आली. मग तसच फिरत घरी आलो कपडे बदलले आणि लिहायला बसलो आणि आता झोपतो.
DAIRY 😍😔😁🤔😜👨‍❤️‍👨🥰
➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️
29 सप्टेंबर 2022
सकाळी उठलो कॉलेज ला गेलो. कॉलेज वरून आलो. जेवण बनवत होतो तर एका मित्राचा फोन आला म्हणजे मीच केला आणि अचानक त्याच्याकडे जायच ठरवल. आम्ही या आधी कधीच भेटलो नव्हतो ऑनलाईन च ओळख होती. मग निघालो नाटंबी ला. जेवलो वरती गेलो एक बाईक भेटली त्याने अर्ध्या पर्यंत सोडल आणि मग पूढे तीन km चालत गेलो. मधेच दुसऱ्या रस्त्याने घुसलो रानातून गेलो कसातरी. मग तिथे जाऊन पाणी पिलं, लस्सी पिली, आणि मग त्याचा बंगला बघितला. खूप सुंदर घर होत. मग तिथून पुन्हा चालत निघालो अर्ध्यात ट्रक भेटला त्यातून आलो खूप मज्जा आली.
DAIRY 😍😔😁🤔😜👨‍❤️‍👨🥰
मग तेथून आलो आणि झोपलो संद्याकाळी पुन्हा दुसऱ्या मित्राबरोबर दातांच्या दवाखान्यात गेलो.
तेथून आलो अभ्यास करत होतो पण लक्षच लागत नव्हतं आणि मग न राहवून वाघमारे ला फोन केला. जरा विषय झाला होता. मग मी पटकन जेवलो दुपारचंच जेवण. आणि निघालो त्याच्याकडे. मित्राला सोडायला सांगितलं. आणि मग तिथे जेवलो गप्पा मारल्या. झोपलो आणि सकाळी आलो. आज कॉलेज घर, जेवण, झोपणे बस.
➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️

168 

Share


नाम नहीं बताऊंगा
Written by
नाम नहीं बताऊंगा

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad