Bluepad | Bluepad
Bluepad
आयुष्यातील सुवर्ण क्षण ...
हर्षला अनंत महाजन
20th Sep, 2022

Share

कधीकधी असे काही क्षण असतात की जे कधीच विसरले जात नाही त्यापैकीच हे खास क्षण ....
८ जानेवारी २०१७ ची गोष्ट मी नेहमीप्रमाणे शाळेतून निघत होते, आणि तेवढयात एक फोन आला मला वाटलं असेल कुठल्यातरी कंपनीचा ..सहा सात दिवसांपासून फोन येत होता त्याच नंबरवरून शेवटी एकदाचा उचलला फोन मुंबई विद्यापीठातून होता त्यांना माझा मेल आयडी हवा होता तो दिला तर त्यांनी मला दिक्षांत समारंभाचे आमंत्रण असलेले आणि मला असलेल्या मेडल्सच पत्र पाठवलं मी ते बघितल्यावर माझा विश्वासच बसला नाही की गोल्ड मेडल असेल मी जाऊन पहिले मळेकर मॅडमना भेटले . त्यांना मेल दाखविला.. माझा विश्वासच बसत नव्हता... मी एवढी खूश होते. खरं तर तेव्हा मला काहीच सुचत नव्हतं .. सरांना भेटले त्यांना सांगितलं एवढे खूश होते सगळे ... मला प्रश्न पडला की मी एवढा अभ्यास केला कधी? ??? इतके दिवस जो फोन मी कंपनीचा किंवा बॅकेतून असेल असं समजत होते तो चक्क विद्यापीठातून होता तेव्हा मला असं वाटलं की किती वेडी आहे मी ... पण खूप आनंद झाला होता.
१६ जानेवारीला दीक्षांत समारंभ होता . प्रमुख अतिथी मुकेश अंबानी होते. इतका प्रशस्त आणि भारदस्त हॅाल होता त्या हॅालमध्ये पोहोचल्यावर बसलेली असताना महाविद्यालयातील सगळी वर्षे भराभरा डोळ्यासमोरून गेली... वेगवेगळ्या विभागातील लोक तिथे उपस्थित होते इतकं छान वाटत होतं feeling proud. ...पण हा सगळा सोहळा बघायला ज्यांनी एवढी वर्षे मार्गदर्शन केले ते म्हात्रे सरच नव्हते.. त्यांना फोन केला तिथूनच नि सांगितलं हे सगळं बघायला तुम्ही हवे होतात ... सोहळा सुरू झाला अगदी डोळ्याचे पारणे फेडणारा..मुख्य स्टेजच्या अगदीजवळच आमची बैठक व्यवस्था होती हळूहळू सगळे अतिथी यायला सुरूवात झाली आणि या नेत्रदीपक सोहळ्याला सुरूवात झाली . मुकेश अंबानींच्या हस्ते मेडल मिळाले. मेडल घेताना अनिल पाटील सरांनी माझी ओळख करून दिली माझ्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी एवढं भारी वाटलं ना.... तो सोहळा संपूच नये असं वाटत होतं. खरा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता तो म्हणजे १७ जानेवारीला माझा शाळेत केलेला सत्कार... अायुष्यातील पहिला सत्कार तो पण मी जिथे काम करते त्या केळकर विद्यालयात आजवर तिथे कोणत्याही शिक्षकाचा सत्कार झाला नव्हता जो सरांनी पहिला माझा केला खरंच खूप छान वाटत होतं ... सरांनी सत्कार झाल्यावर बोलायला सांगितलं खरंच सांगते जेवढं अंबानींकडून मेडल घेताना भावनिक झाले नव्हते तेवढी भावनिक आपल्या माणसांसमोर सत्कार होताना झाले ... एरवी माइकवर सहज बोलणारी मी ..त्याक्षणी माझ्याकडे शब्द नव्हते नि डोळ्यात अश्रू उभे होते पहिल्यांदा माइकवर बोलताना मी रडले होते.
आनंद या गोष्टीचा होता की माझ्या या आनंदामध्ये संपूर्ण शाळा माझ्यासोबत होती अगदी माझे विद्यार्थीसुद्धा जेवढा आनंद तिथे मेडल गळ्यात घातल्यावर झाला नाही तेवढा माझ्या विद्यार्थ्यांच्या समोर मेडल गळ्यात घालताना झाला.
हे तिन्ही दिवस अविस्मरणीय होते अगदी आयुष्याच्या पुस्तकात सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्याजोगे ..
-हर्षला महाजन.

190 

Share


Written by
हर्षला अनंत महाजन

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad