Bluepad | Bluepad
Bluepad
गोळाबेरीज
Neha Sankhe
Neha Sankhe
20th Sep, 2022

Share

आज म्हटलं हिशोब लावूया
जे आपल आहे ते मोजून पाहूया
एवढी सजलेली सृष्टी होती
पण ते माझी नव्हती
नजर जाईल तोवर निरभ्र
आकाश ही होते
पण त्याच्यावरही मासे हक्क नव्हते
सुंदर पानं वेली फुले पक्षी ही होते
पण तेही माझे नव्हते
जमीनजुमला घरदार होते पण
ते सुध्या माझे कुठे होते
गहन विचारात पडले आता
माझे असे काय आहे ?
माझे सौंदर्यच तर मासे होते पण
ते पण काळानुसार निस्तेज होणार होते
माझ्या हिशेबाचे वही कोरीच राहिली
कारण मासे म्हणावे असे काहीच नव्हते
भगवंतांना दिलेल्या आयुष्य हे
मातीतून जन्मलेले मातीतच मिसळणार
मग हिशेब कसला लावणार
हिशेबाची गोळाबेरीज शुन्यच राहणार

0 

Share


Neha Sankhe
Written by
Neha Sankhe

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad