Bluepad | Bluepad
Bluepad
माझा राजा
Neha Sankhe
Neha Sankhe
20th Sep, 2022

Share

माझा राजा
काळोख्या रात्रीत जळत्या दिव्याप्रमाणे तो सिंह जन्मला ,
घेऊनही स्वराज्याची मिशाल हाती शिवनेरीवर आनंद महोत्सव रंगला ,
आई जगदंबेच्या आशीर्वादाने शिवाजी नाव ठेवले ,
शिव रुद्राप्रमाणे मुगलांशी ते निर्भीडपणे झुंजले ,
रामायण महाभारत गीता ऐकण्यात बालपण घालवले ,
अवघ्या लहान वयात तलवार नी भाला धरले ,
कृष्णा अर्जुन भीम राम यांच्या कथांमधून स्वत च्या जगण्याला आकार दिले ,
आणि स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगले ,
वयाच्या बाराव्या वर्षी त्या नराधमांना मातीत लोळवले ,
वीर शहाजीराजे जिजाऊंचे पुत्र आम्ही मुगलांना हे दाखवून दिले ,
रयतेवर अपार प्रेम ,
मावळ्यांवर मैत्रीपूर्ण संबंध केले ,
म्हणून तुम्ही रयतेचे राजे म्हणून आयुष्यभर आमच्या हृदयात राहिले ,
गनिमीकाव्याला हत्यार म्हणून वापरले ,
राजा तुम्ही निशस्त्र असूनही गनिमांना पायदळी तुडवले ,
हिंदू मुस्लीम स्त्री पुरुष शुभ अशुभ भेद न पाळले ,
लढाई आपली मुघलांशी नव्हती तर साम्राज्याची आहे हे तुम्ही अवघ्या जगाला सिद्ध करूनी दाखवले .

0 

Share


Neha Sankhe
Written by
Neha Sankhe

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad