Bluepadनातं
Bluepad

नातं

Sangieta Devkar
Sangieta Devkar
16th Jun, 2020

Share

इकडे तो भरून आला आहे.
खुप काही मनात साठवून आला आहे,
नक्कीच काही सलत् असणार त्याच्या मनात,
काही तरी गुपित असणार दडलेले त्याच्या हृदयात.
अश्रु रूपी पावसात तो ही न्हावून निघनार.
कदाचित तिच्या आठवणीत तो पुन्हा पुन्हा बरसनार,रडनार......!!!!
हे कसले बंध,ही कसली ओढ,
आता आला आहे तो,तर नको ठेवू मनात तेढ.
मिठीत बध्द होऊन त्याच्या जगाला तू विसर.
अंगावर झेलीत रहा त्याची बरसणारी एक एक सर.
त्याच आणि तुझं नात काहीसं सारखच आहे.
तू ढाळतेस अश्रू त्याच्या आठवणीत.
हा वेडा ही कोणाच्या आठवणीत असेल बरसत?
कसले हे गुंतने,कसले हे बंधन.
तो येतो तसे सुखावून जाते तुझे मन.


10 

Share


Sangieta Devkar
Written by
Sangieta Devkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad