Bluepad | Bluepad
Bluepad
ओढ प्रेमाची भाग -13
Ashok Ingole
Ashok Ingole
20th Sep, 2022

Share

किडनी ट्रान्सप्लांट चे ऑपरेशन होऊन सहा महिने झाले. स्नेहलची प्रकृती पूर्वपदावर येऊ लागली . जेवणाची पथ्य वगैरे ठेवून ती हळुहळू घरात वावरू लागली. तिचा मुक्काम फार्महाऊसवर होता नेहा आपल्या जॉब वर निघून गेली होती. दोन महिन्यापूर्वी आशिष पण मुंबईला गेला होता . त्याला पुढे रजा मिळाली नव्हती. तो जरी शरीराने मुंबईला होता पण त्याचं पूर्ण लक्ष शीतल व स्नेहलच्या प्रकृतीकडे होते शितल हळूहळू नॉर्मल होत होती तिला स्नेहलची किडनी मिळाल्यापासून पुष्कळ बरे वाटत होते . पूर्वीचे प्रॉब्लेम दूर झाले होते ती पण हळूहळू घरात फिरत होती . आजी आजोबा तिची व स्नेहलची पूर्ण काळजी घेत होते . रवींद्र साने ने उषाला फार्महाउस वरच स्नेहलच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याकरिता ठेवले होते . उषा पण डॉक्टर होती व पायल पण सोबतीला होतीच त्यामुळे रोज दोघींची तपासणी त्या करत होत्या. निलेश सतत सर्वांवर लक्ष ठेवत होता . त्याने आपला पूर्ण मुक्काम येथेच हलवला होता. तो पूर्णपणे स्ट्रॉबेरीच्या प्रोजेक्टवर लक्ष ठेवून होता. आता स्ट्रॉबेरीज पीक फार चांगलं आलं होतं व व्यापारी माल बघून व करार करून गेले होते. शशांक नागपूरला आपल्या ड्युटीवर होता . अशाप्रकारे सर्व सुरळीत चालू होते.
सकाळचं वातावरण फारच प्रसन्न होतं. मोहदा हिल स्टेशन असल्यामुळे थंडी फारच जाणवायची. डिसेंबरचा महिना तसाही जास्त थंड असतो . पायल काही दिवसापूर्वीच स्नेहल ला तिच्या कॉटेजमध्ये घेऊन आली होती . दोघी सोबतच रहायच्या. उषा काकू छिंदवाड्याला गेल्या होत्या व फार्महाऊसवर निलेश व रानडे कुटुंब शितल सोबत थांबले होते. पायलला एमर्जेंसी मुळे कॉटेज वरच थांबावे लागे कारण जवळच हॉस्पिटल असल्यामुळे त्वरित केंव्हाही जाता येत होते.
स्नेहल गॅलरीत बसून बाहेर रस्त्यावरील वर्दळ बघत होती. शाळेतील काही मुलं युनिफॉर्ममध्ये जवळच्या शाळेत जात होती ते बघून तिला पण लहानपण व मम्मी पप्पांची आठवण झाली डोळ्याच्या कडा पाणावल्या तिने लगेच डोळे स्वच्छ केले मागून येणार्‍या पायल ने हे अचूक टिपले ही दोन कॉफीचे मग घेऊन गॅलरीत येत होती.
"काय ग जुन्या आठवणी पिच्छा सोडत नाहीत?" ती म्हणाली.
"हो ना ताई कधीकधी सर्व धीटपणा कोलेप्स होतो ते स्वतःला हि कळत नाही ". तिच्या हातून मग घेत स्नेहल म्हणाली.
"तू एकटी असली तर हा त्रास होईल----- एक गोष्ट सांगू नाराज तर होणार नाही ना". पायल जवळच्या चेअरवर बसत म्हणाली.
"नाही ग ताई --बोल ना ". स्नेहल तिच्याकडे बघत म्हणाली.
"स्नेहा ---पुढचं पण आपल्याला ठरवावं लागेल ना ,माझं व नेहाचं जवळपास ठरल्यातंच आहे तुझ्यासाठी पण भैया बघत आहे एखादा चांगला राजकुमार मिळाला की जमवून टाकू . पण तुझ्या पसंतीने ,असं भैया म्हणत होता". पायल म्हणाली व तिच्या चेहर्‍या वरील भाव बघू लागली.
"काय ताई ? हे अवघडल्यासारखं होतं, मी सध्या विचारंच केला नाही अजून मी मागच्या धक्क्यातून बाहेर येत आहे राहुल चं वागणं माझ्या मनाला खूप लागलं आहे त्यामुळे आता पुढे पाऊल टाकायची हिम्मत होत नाही ". स्नेहल गंभीर स्वरात म्हणाली.
"पण स्नेहा---------"
"नाही ताई सध्या तरी हा विषय नको ,. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी नक्की सांगेल ". स्नेहलने तिच्याकडे बघितले व मंदस्मित करत पुन्हा म्हणाली "तसं ही मी आता माझं लाइफ एन्जॉय करत आहे शीतल व तू मला मिळाली आहे, आपलं हे नातं घट्ट करू या तुम्हा दोघी मुळे मला खूप आधार मिळाला आहे व आनंद पण मिळतो आहे नेहा व शशांक असतांना मला तर मागचं काहीच आठवत नाही तू येथे आली हे फार चांगलं झालं निलेश दादाला पण एक टारगेट मिळालं आहे. " पायल हसली ती समजून गेली स्नेहलने हुशारीने विषय बदलला आहे.
"बरं चल ,आज येते का हॉस्पिटल ला भटनागर सर म्हणत होते इच्छा असेल तर तिला घेऊन येत जा थोडं बरं वाटेल ". पायल म्हणाली.
"खरंच आज पासून येते मी". स्नेहल म्हणाली.
"आपण उकडून घेतलेल्या पाण्याची बॉटल व तुझा टिफिन सोबत ठेवू म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही ". पायल म्हणाली.
"तहान जात नाही ग त्या पाण्याने". स्नेहल म्हणाली.
"स्नेहा ,वर्षभर तरी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. इन्फेक्शन व्हायला नको व तू चेहऱ्यावर मास्क लावायचा . हे पण आवश्यक आहे . मी चांगल्या क्वालिटीचे मास्क आणलेले आहेत" पायल म्हणाली "आणि फक्त ऑफिसमध्येच बसायचे वार्डमध्ये नाही " "चालेल याला पर्याय नाही ". स्नेहल म्हणाली. पायल खाली झालेले कॉफीचे मग घेऊन आत गेली. स्नेहल पुन्हा विचारात गेली. "आशिष ने तिच्या करिता शोध मोहीम सुरू केली होती किती काळजी घेतो हा . शितलच्या प्रेमामुळे ते जवळ आले पण मनात आशिष बद्दल आपुलकी वाटायला लागली होती . ऑपरेशन झाल्यानंतर दोन दिवस तिची तब्येत बिघडली होती ती आयसोलेशन मध्ये होती. तेव्हा आशिष पीपी किट घालून मास्क लावून तिच्याजवळ बसून पूर्ण काळजी घेत होता . दोन वेळा तर त्याने बेड पान पण दिले व बाहेर नेले तेव्हा तिला फारच ओशाळून आले होते . पण आशिष ने तिला हिम्मत दिली. "स्नेहल घाबरू नको हा पिरेड पण निघून जाईल आपले चांगले दिवस येतील". तो तिला पदोपदी सांभाळायचा आणि आता तिचा संसार आनंदी करण्याच्या प्रयत्नात होता. कळत नकळत स्नेहल चं मन आशिष कडे आकर्षित होत होतं राहुलचं चित्र हळूहळू धूसर होऊ लागलं होतं शितलचं मम्मा म्हणणं तिला आवडायचं हे पण तिला कळलं नाही पण आशिष चं काय तो तर सपनाने दगा दिल्यामुळे वैरागी होऊन बसला होता . ". पायल च्या आवाजाने तिची तंद्री तुटली "स्नेहा आत ये आता थोडा आराम कर केव्हाची बसून आहेस मी तुझ्या आवडीची लौकि ची फिकी भाजी बनवते व छान पैकी फुलके बनवते मग आपण वाश घेऊन बाहेर पडू " पायल म्हणाली. स्नेहल बेडरूम मध्ये जाऊन कॉटवर पडून राहिली पायल किचन मध्ये गेली. स्नेहल चे विचारचक्र परत सुरू झाले. ""त्या दिवशी स्नेहल ला थोडा ताप आला होता तेव्हा आशिष फार घाबरला होता सतत डॉक्टर फ्रान्सिस व डॉक्टर बेंजामिन क्रूज यांना फोन करत होता . शेवटी डॉक्टर फ्रान्सिस डॉक्टर भटनागर सोबत फार्महाऊस वर आले . त्यांनी स्नेहलची पूर्ण तपासणी केली व सर्व नॉर्मल आहे जरा एक्सर्शन झाले आहे असे समजावून सांगितले तेव्हा तो शांत झाला. त्याची तळमळ स्नेहल अनुभवत होती तसे पायलने व नेहाने पण आशिषला सांगितले होते पण डॉक्टर फ्रान्सिसनी सांगितल्यावर त्याचा विश्वास बसला. इतका हळवा हा ,तरी कसं काय याचं सपना सोबत बिनसलं असेल. स्नेहल ला सपनाची कीव येत होती इतका सामंजस्य नवरा गमावल्या बद्दल""
"अग स्नेहा". पायल च्या आवाजाने तिचे विचारचक्रही थांबले. "काय ग ताई " तिने विचारले .
"तू वाश रूम मध्ये जाऊन फ्रेश होतेस का माझं आटोपलं की मी पण तयार होते ". पायल म्हणाली . तशी स्नेहल उठून वाशरूम मध्ये गेली. पायल ने भाजी बनवली व पातळसे फुलके बनवले भाजी स्नेहल करिता बिगर तिखट ची बनवायची होती. पायल पण तीच भाजी जेवायची एक प्रकारे तिचाच डायट पायल पण फॉलो करत होती . पाणी उकळून तिने थंड व्हायला ठेवले . तोपर्यंत स्नेहल फ्रेश झाली होती. ती किचनमध्ये आली व दोघींचे डबे तयार करू लागली . पायल वाश रूम मध्ये फ्रेश व्हायला गेली हा दोघींचा नित्यक्रम होता . मोबाईलची बेल वाजली . पायल वॉश रूम मध्ये होती. स्नेहलने फोन उचलला तो आशिषचा होता. ं
"स्नेहल बोलते पायल ताई वाशरूम मध्ये आहे ". ती म्हणाली.
"तुझ्याकरिता फोन केला होता. आता कशी आहेस ?परत काही त्रास झाला का ?"आशिष ने विचारले .
"नाही आता सर्व चांगलं आहे . आज पासून जॉब वर जात आहे. " स्नेहल म्हणाली.
" बघ जास्त एक्झर्ट होऊ नको व धावपळ काही दिवस तरी करू नको . ". तो चिंतेने म्हणाला.
"मी ओके आहे काळजी करू नका आणि शीतल पण मजेत आहे" स्नेहल म्हणाली. तेवढ्यात पायल आली .
"घे, ताई------भैय्या चा फोन आहे " म्हणत स्नेहल ले फोन तिच्या कडे दिला.
"बोल भैया कसा आहेस?" पायल म्हणाली.
" मी ठीक आहे ग ,पण चिंता आहे तुमचीच, मी येऊ का तिकडे------ मी हे जॉब सोडायचा विचार करत आहे --कारण सगळं मन मोहदाला च अटकलं आहे----काहीतरी उद्योग टाकू जो तिथे चालेल ". आशिष म्हणाला.
"भैय्या याबाबतीत तू निलेश सोबत बोल तो देईल काहीतरी आयडिया कारण त्याला या बाबतीत बरीच माहिती आहे" पायल ने म्हटले.
"मी बोललो आहे त्याच्याशी आणि त्याच्या सल्ल्यानेच मी महाबळेश्वरला पंधरा दिवस मधमाशी पालन केंद्रावर ट्रेनिंग घेतले व आता त्याच्यावर पुढे जायचं आहे. ----------बाबांना पण ही कल्पना दिली आहे त्यांनी होकार दिला आहे या दोन महिन्यात मी काहीतरी निर्णय घेतो. स्नेहल कडे जरा लक्ष दे तिला जास्त अंगमेहनत नको ". आशिष म्हणाला.
"भैय्या तू निश्चिंत रहा मी तिची पूर्ण काळजी घेते " पायल म्हणाली.
"देन ओके बाय" म्हणत आशिषने फोन बंद केला.
"काय झालं ग?.". स्नेहल ने विचारले.
"भैया म्हणाला तिला जास्त एक्झर्ट होऊ देऊ नको "पायल म्हणाली.
"उगाच काळजी करता सर्व मी कुठे काय करते ,उलट मला असं नुसतं बसून राहायचा कंटाळा आला आहे" स्नेहल म्हणाली.
"स्नेहा अजून दोन-तीन महिने कळ सोस मग सर्व नॉर्मल होईल" पायल तिचे हात हातात घेऊन प्रेमाने म्हणाली.
"हो ग प्रश्न शितलचा आहे ती किती लवकर रिकव्हर होते ते महत्त्वाचे आहे" स्नेहल काळजीने म्हणाली.
"होईल ग तिला थोडा वेळ लागेल पण अजून सहा महिन्यांनी ती बरीच सावरेल तुझी म्हणजे मनाची सोबत असल्यावर ती आनंदात राहील" पायल तिच्या गालाला चिमटा काढत म्हणाली . स्नेहल जोरात हसली "हो गं काहीतरी मागचा संबंध आहे, आम्हा दोघींचा असंच वाटतंय" ती म्हणाली. दोघीही लवकर तयार झाल्या टिफिन घेऊन पायलने स्नेहल ला हळूहळू कार पर्यंत आणले. स्नेहल पायलच्या बाजूला बसली पायलने कार स्टार्ट केली . प्रथम तिने स्नेहल ला तिच्या कॅबिनमधे सोडले . मीना तिची काळजी घ्यायला तिथे होतीच . डॉक्टर भटनागर ने तिला तशी ड्युटीच दिली होती . स्नेहल ला बघताच ती धावत आली व तिला धरून आत घेऊन आली . स्नेहल ला सोडून पायल स्वतःच्या वार्डमध्ये गेली एक राउंड पूर्ण वार्डचा करून ती आपल्या केबीन मध्ये बसली. तेव्हाच निलेश चा फोन आला.
"हॅलो पायल स्नेहल आज आली का हॉस्पिटलला" त्याने विचारले.
"हो केबिनमध्ये बसली आहे आणि हो भैय्या चा फोन आला होता तो जॉब सोडायचं म्हणत होता एकटा पडला आहे मुंबईला" पायल म्हणाली.
"माझं बोलणं झालं आहे आपण मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय सुरू करतो आहे आशिष करिता फॉर्म जवळच दोन एकर शेत घेत आहे त्याचं ट्रेनिंग पण झालं आहे,रजिस्ट्रेशनचा अर्ज दिला आहे तुम्ही दोघी आज फार्महाउस वरच या काका काकुनी बोलावलं आहे. त्यांना स्नेहल ला पण भेटायचं आहे ". निलेश म्हणाला.
"ठीक आहे हॉस्पिटलला सर्व नॉर्मल आहे आम्ही संध्याकाळी येतो" पायल म्हणाली तिला पण मम्मी-पप्पा व शीतलला भेटायचं होतं व दोन दिवस आराम पण करायचा होता. सायंकाळी दोघीही फार्महाऊसवर दोन दिवसाच्या मुक्कामासाठी गेल्या.
----------------*----------------*---------------*----------------
आशिष आपल्या बेडरूममध्ये कॉटवर लोळत पडला होता. आत्ताच तो शितल सोबत फोनवर बोलला होता . शीतल स्नेहल सोबत अगदी मजेत होती . आशिष ला पुन्हा स्नेहल चा प्रश्न पडला . त्याने एक दोन स्थळ बघून ठेवली होती. एक मुलगा M. E झालेला होता. व मुंबईलाच गव्हर्नमेंट इंजिनीरिंग कॉलेज ला लेक्चरर होता तो आशिषच्या बॉस चा मुलगा होता वय 33 वर्ष झालं होतं पण त्याचं जुळत नव्हतं बॉस ने आशिष ला सर्व सांगितले होते . आशिष ने सहज स्नेहल चा विषय काढला तर बॉसने विषय काढायला सांगितले म्हणून त्याने पायलला विचारले पण नंतर पायलने स्नेहल उत्सुक नसल्याचे सांगितले त्यामुळे तो विचारात पडला. स्नेहल सोबत शीतलची जवळीक पण त्याला आवडायची. ही स्नेहलला मम्मा म्हणायची तर त्याला कुठेतरी समाधान मिळायचं, तो शितलचा विचार करून खुश होता ,पण त्याने स्नेहलच्या मनाचा विचार केला नव्हता व आता तो परत चिंतेत पडला, स्नेहलने नाही का म्हटले? जरी तिची एक किडनी शितल ला दिली आहे पण ती पूर्णपणे स्वस्थ आहे आणि एकटीच असल्यामुळे पुढे सोबती लागेलंच ना यातून मार्ग कसा काढावा या विचारात पडला . त्याने नेहा ला फोन लावला .
"नेहा आशिष बोलतो"
"बोल भैया"
"स्नेहल ला लग्नाकरिता तयार करणे हे स्थळ छान आहे गं मुलगा बघायला पण स्मार्ट व हँडसम आहे. मी तपास केला निर्व्यसनी कोण आहे स्नेहल ला आनंदात ठेवेल सुशिक्षित परिवार आहे" तो म्हणाला.
"भैय्या आम्ही दोघी तिच्या सोबत या विषयावर सविस्तर बोललो पण ती नाही म्हणते हे सध्या जे चालू आहे त्यातच आनंदी आहे जास्त म्हटलं तर तुम्हाला मी नको आहे का असं विचारते. काय करावं काही कळत नाही" नेहा म्हणाली. हे ऐकून आशिष ची चिंता वाढली.
"ठीक आहे तर आपण तिला आनंदी ठेवायचा शक्य तो प्रयत्न करू " आशिष म्हणाला.
"तू डिझाईन देणार होता ना ?"नेहाने विचारले.
"हो दिले आहे . येत्या वीस तारखेला मी इथुन निघतो आहे, फ्लॅट ला पण ग्राहक मिळाला आहे . सर्व सोपस्कार आटोपून मुंबईला बाय करतो " तो जरा हसतच म्हणाला.
"बरं होईल काका काकू आणि शीतलच्या दृष्टीने त्यांना पण तुझा आधार मिळेल ". नेहा म्हणाली.
"अगं तसं काही नाही निलेश असल्यामुळे मम्मी पप्पा मजेत आहे जावई आहे ना सोबत मग काय ". तो हसत म्हणाला.
"काय भैया ?तू पण मस्करी करतो ". नेहा म्हणाली.
"आता बहिणीची होणारी नणंद आहे तू म्हणून गंमत केली---- चल ठेवतो 20 नंतर मी तिकडेच आहे ". आशिष म्हणाला त्याने फोन कट केला. शेवटी त्याने पुन्हा स्नेहल चा विचार केला आणि प्रत्यक्ष भेटल्यावरच आपण तिच्या सोबत बोलू असं ठरवून तो उठला. तेवढ्यात डोअरबेल वाजली आशिष लवकरच हॉलमध्ये आला त्याने दार उघडले आणि समोर उभ्या व्यक्तीला पाहून तो आश्चर्यचकित झाला व त्याला राग पण आला. समोरची व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून त्याच्या आयुष्याची वाट लावणारा मनोहर आप्टे होता.
"मनोहर तू इथे काय करतो आहेस?"तो किंचित रागात म्हणाला. त्याला त्याचं येणं आवडलं नव्हतं हे त्याच्या बॉडी लॅंग्वेज वरून मनोहर च्या लक्षात आले.
"शांत हो आशिष तुझं असं वागणं स्वाभाविक आहे---- मी का आलो ----हे तरी ऐकून घे ". तो म्हणाला. आशिष थोडा शांत झाला तो मागे हटला.
"ये आत ये" तो म्हणाला. मनोहर आत येऊन सोफ्यावर बसला आशिष समोर बसला. "बोल काय सांगायचं ते "आशिष म्हणाला.
"मला माफ कर आशिष मी स्वार्थापायी तुला दगा दिला व तुमच्या आयुष्यात विष कालवलं पण त्याचं फळ मी भोगतो आहे " मनोहर म्हणाला . त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले होते .
"म्हणजे?"
"मी सर्व गमावून बसलो आहे माझी नोकरी पण गेली आहे " मनोहर म्हणाला.
"का बरं तू तर सपना सोबत लग्न केलं होतं ना?" आशिष ने विचारले.
"नाही आशिष ही सपनाची चाल होती तुला आयुष्यातून दूर करण्याकरिता तिने माझा उपयोग करून घेतला व तेव्हा मी मूर्खासारखा तिच्या प्लॅनमध्ये सामील झालो होतो "मनोहर म्हणाला.
"काय? मला सविस्तर सर्व सांग "आशिष काहीशा आश्चर्याने म्हणाला.
"तुला डिव्होर्स दिल्यानंतर तिने मला हळूहळू कॉर्नर करणे सुरू केले लग्न वगैरे काही केले नाही . तिचे एका अमेरिकन निक सोबत अफेअर होतं तू इकडे आल्यानंतर मी तुझ्यासारखा गोडबोले ला जॉईन झालो आणि एका वर्षातच त्यांनी मला काढून टाकले . कसा तरी मी मुंबईला परत आलो पण मला जॉब मिळाला नाही प्लीज मला तुझी मदत हवी" मनोहर म्हणाला.
"मी काय मदत करू शकतो ?" आशिष करड्या स्वरात बोलला.
"मित्रा रागावू नको मला माफ कर पण सपना तुझ्या योग्य नव्हतीच कारण ती फारच चंचल आहे की कुणीही सोबत राहू शकणार नाही तू योग्यच केले की शीतलला घेऊन आला. शीतल कुठे आहे? मनोहर ने विचारले.
आशिष थोडा गोंधळला पण लगेच म्हणाला "ती मम्मी पप्पा सोबत आहे"
"आणि तू पण जॉब सोडून जात आहे?" मनोहरने विचारले.
"हो पण तुला कसं कळलं?"
"तुझ्या बॉस ने सांगितले "मनोहर म्हणाला.
"तू त्यांना कसा ओळखतो? आशिष ने विचारले.
"ते माझे दूरचे नातेवाईक आहे त्यांचा मुलगा राकेश व मी क्लासमेट होतो राकेश नेच मला त्यांना भेटायला सांगितले" मनोहर म्हणाला. आशिष मी दीर्घ श्वास सोडला. म्हणजे हा पुन्हा माझ्याच जागेवर जॉब करणार तर करू दे मला कुठे येथे राहायचे आहे. तो मनात विचार करत होता.
"मग मी काय मदत करू शकतो तुला? आशिषने विचारले.
"बॉसचे असे म्हणणे आहे की आपण मित्र आहोत तर तू माझी शिफारस करावी ". मनोहर म्हणाला.
"ओके ठीक आहे मी तसं करेल पण आता तू निघ मला तहसील कार्यालयात जायचे आहे ". आशिष म्हणाला.
"ठीक आहे मी उद्या भेटतो". म्हणत मनोहर निघून गेला.
आशिष ला फ्लॅटची खरेदी रजिस्टर्ड करायला तहसील कार्यालयात रजिस्ट्रार ऑफिसला जायचे होते. त्यामुळे तो पण लवकरच तयार झाला. ग्राहक चेक घेऊन तिथेच येणार होता. थर्ड फ्लोअर वरील हा तीन बीएचके चा फ्लॅट आशिष ने एक कोटी ला घेतला होता. दोन वर्षानंतर त्याला दीड कोटीचा ग्राहक मिळालं होतं त्यामुळे त्याने त्याने सौदा पक्का केला होता. आज पूर्ण दिवस त्याचा त्या कामात गेला. रात्री दहा वाजता तो टीव्ही बघत होता तेव्हाच फोन वाजला आशिष ने बघितले नंबर नवीनच वाटला.
"हॅलो कोण बोलतय ?" आशिष ने विचारले.
"मी सपना ओळखलं का?" सपनाचा आवाज ऐकून आशिषच पूर्ण अंग शहारलं आता ही चं काय त्याला मनोहर बद्दल शंका आली आपल्या पूर्व पत्नी चा फोन इतक्या वर्षानंतर परत काहीतरी प्लान असावा.
"हॅलो आशिष सपना बोलते तुझी जुनी बायको" ती म्हणाली.
"परत हा शब्द उच्चारू नको कारण तुला बायको शब्दाचा अर्थ कधीच कळला नाही". आशिष थोडा रागानेच बोलला.
"जूनं उगळण्यात काहीच अर्थ नाही मला माझ्या मुलीशी बोलायचं होतं". तिचा खणखणीत आवाज आला.
"का बरं ती तर नकोशी होती ना तुला आता काय प्रेम दाटून आलं" तो रागानेच म्हणाला.
"अरे ती काहीही झाले तरी माझी मुलगी आहे आणि मला तिला भेटायचं आहे दोन दिवसांनी मी अमेरिकेला परत जाणार आहे" ती म्हणाली.
"सपना शितल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे तिच्या दोन्ही किडन्या गेल्या आहे आम्ही किडनीच्या शोधात आहोत तु तिची आई आहेस देशील तिला किडनी जीव वाचेल माझ्या पोरीचा "आशिष शांत स्वरात म्हणाला.
"व्हॉट तिच्या किडन्या गेल्या आहेत ,तुम्ही लोकांनी तिची काळजी घेतली नसेल ,मी केस टाकेलतुमच्यावर ". सपना रागात बोलली.
"माईंड युवर लैंग्वेज तुझा आणि तिचा काहीही संबंध नाही तू कोर्टासमोर सर्व लिहून दिलेलं आहे आणि आता हक्क दाखवायला आली आहे ! त्या मनोहरला थापा मारायला माझ्याकडे का पाठवलं ?"आशिष ने विचारले.
"मी कशाला पाठवू कोणाला माझा याच्याशी काहीही संबंध नाही" सपना म्हणाली.
"मग माझा नंबर तुला कोणी दिला आई म्हणवतेस पण मुलीसाठी काहीच करायला तयार नाहीस?"
"आशिष प्लीज इतका बोलू नको मी स्वतः कॅन्सरची पेशंट आहे केमो घेणे चालू आहे"सपना चा रडका आवाज ऐकून आशिष चा राग पूर्ण मावळला.
"काय कधी झालं हे?" त्याने सहज स्वरात विचारले .
थोडा वेळ ती स्तब्ध होती " सहा महिन्यापूर्वी डिटेक्ट झाला-----माझ्या कर्माची फळं मी भोगते आहे कदाचित परत इकडे येणार पण नाही म्हणून एकदा तिला बघायचे आहे" सपना थकलेल्या स्वरात म्हणाली . "आणि आता तिचा पण प्रॉब्लेम झाला आहे मी किडनी देऊ शकत नाही आशिष ,पण तिच्या करिता डोनर शोध पैसे कितीही लागू दे मी देईल, कारण ". ती गप्प झाली व फोन कट झाला. आशिष तिचा पडला त्याला काहीच कळेनासे झाले तशी त्याची स्वप्न सोबत आता काहीच नाते नव्हते पण तिने जे सांगितले ते ऐकून मात्र त्याचं हळवं मन व्यतीत झालं होतं. अमेरिकेतील ते दिवस त्याच्या नजरेसमोरून घर करून निघून गेले रिंग परत वाजली या वेळेस फोन गोडबोलेंनी घेतला होता
"आशिष सपना लास्ट स्टेजला आहे तिला शीतलला बघायचे आहे कुठल्या हॉस्पिटलला आहे ती ". त्यांनी विचारले.
"सर " आशिष म्हणाला "शितल चं किडनी ट्रान्सप्लांट झालेलं
आहे ,ती मध्यप्रदेशमध्ये मोहदा हिल स्टेशनला आहे " आशिष शांतपणे म्हणाला.
"डोनर मिळाला?"
"नाही तिच्या मम्मानेच तिला किडनी दिली ". म्हणत आशिष ने त्यांना स्नेहल बद्दल सर्व सांगितले ,सर्व ऐकून सपना परत फोनवर आली .
"आशिष मला दोघींना भेटायचं आहे मी तिला सांगणार नाही की मी तिची मम्मी आहे आणि तू पण सांगायचं नाही. आज ज्या मुलीने माझ्या लेकीला मरणातून बाहेर आणलं मी तिच्या भावना दुखावणार नाही" सपना रडतच म्हणाली.
"सपना मला तुला आत्ताच भेटायचं आहे आणि सर्व जाणून घ्यायचं आहे "आशिष म्हणाला.
"थांब आशिष मी माझ्या स्वभावाप्रमाणे मनोहरला दूर केले व निक ची सोबत पकडली पण मला कॅन्सर झाला पाहिल्यावर तो मला सोडून कन्नड आला निघून गेला व मी बाबासोबत एकटीच पडले मी पश्चातापाचा अग्नीमध्ये जळत आहे आणि मृत्यू समोर दिसत आहे तुझा आणि शीतल चा विचार कधीच केला नाही पण आज वाटते एकदा तुम्हाला भेटावं मी तिला दुरूनच बघेल कारण नुकतेच ऑपरेट झाल्यामुळे तिला इन्फेक्शन ची भीती आहे पण मी थांबू शकत नाही पुढील आठवड्यात मला ॲडमिट व्हायचं आहे. "सपना थांबली तिला दम लागला "उद्या सकाळीच आपण निघू मला तिला व स्नेहल ला एकदा बघू दे प्लिज ". सपना रडत म्हणाली.
"ओके मग आपण सकाळी नागपूर पर्यंत फ्लाईटने जाऊ तिथून पाच तासाचा प्रवास आहे. ". आशिष म्हणाला.
"हे ठीक नाही मी तिकीट बुक करते तू आठ पर्यंत एरोड्रम वर पोहोच ". सपना म्हणाली.
"ओके" म्हणत आशिष ने फोन कट केला.
------------*--------------*---------------*---------------*--------------
(क्रमशः). ( ओढ प्रेमाची भाग-13 पूर्ण)

146 

Share


Ashok Ingole
Written by
Ashok Ingole

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad