Bluepad | Bluepad
Bluepad
तू तुझं जगावं मी माझं जगावं...
Vikas chavan
Vikas chavan
20th Sep, 2022

Share

तू तुझं जगावं,मी माझं जगावं...
मनात येतात असंख्य प्रश्न
त्याचे उत्तर आपणच शोधावं
आरसा फक्त प्रतिबंधक दाखवतो
तू तुझं जगावं मी माझं जगावं....
ऋतू ही लवकर बदलत नाही
वेळ काळ त्याला ही लागतो
चुका दाखवल्यावरच माणूस
त्यातून शिकत असतो
सारं कसं सामावून घ्यावं
सागराकडून शिकावं
तू तुझं जगावं मी माझं जगावं...
फांदीवरच्या फुलाचं नशीब
एक सारख नसतं
एक गाभाऱ्यात जातं मंदिराच्या
तर दुसरं थडग्यावर वाहील जातं
खुडून सुद्धा गंध दुसऱ्याला देणं
फुलांकडून शिकावं
तू तुझं जगावं मी माझं जगावं...
तारुण्याचा सूर्यास्त ठरलेला आहे
सौंदर्याचा झरा काही क्षणाचा
लोभ राग स्वार्थ मत्सर
नाश करती ह्रदयातील प्रेमाचा
अमर कुणीच ना झाले
मग कशाला कुणावर रुसावं
तू तुझं जगावं मी माझं जगावं...
जितके आयुष्य आहे हसत ते जगावे
होईल तितके प्रेम दुसऱ्याला द्यावे
काय कमावलं काय गमावलं
जे आहे ते इथेच ठेवून जावे
मग कशाला उगाच कुणाच्या नजरेतून उतरावं
तू तुझं जगावं मी माझं जगावं....
पाखराला जीव लावला
तर पाखरू जवळ येतं
प्रेमानं समजून सांगता
वेडं ही शहाणं होतं
जगाची रितच आहे द्यावं आणि घ्यावं
तू तुझं जगावं मी माझं जगावं....
- विकी
तू तुझं जगावं मी माझं जगावं...

168 

Share


Vikas chavan
Written by
Vikas chavan

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad