Bluepad | Bluepad
Bluepad
जीवनात जोखीम घेणे का महत्त्वाचे आहे?
Aarya
Aarya
20th Sep, 2022

Share

जीवनातल्या समृद्धीचे खरे रहस्य हे जीवनात स्थैर्य शोधण्यात वेळ वाया घालवणे थांबवून संधीचा मागोवा घेण्यात वेळ खर्च करण्यामध्ये आहे . आयुष्य परिपूर्णतेने जगण्यासाठी जोखीम घेणे महत्त्वाचे आहे .कारण म्हातारपणी  तुम्ही जे धोके पत्करले त्याबद्दल तुम्हाला जास्त पश्चात्ताप होणार नाही . उलट ज्या भितींना  तुम्ही सामोरे गेला नाहीत, ते सर्व धोके जे तुम्ही पत्करले नाहीत त्याबद्दल तुम्हाला जास्त वाईट वाटेल , पश्चात्ताप होईल . ज्या गोष्टी करायला आपण घाबरतो त्या केल्या पाहिजेत . कारण भीतीच्या दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्य आहे. जितकी जास्त जोखीम घ्याल तितका जास्त मोबदला मिळेल.
बहुतांश लोकांचे म्हणणे असते कि सर्व सुरळीत चालू असेल तर का बदल करावा ? जोखीम का घ्यावी ? जसे पाणी बराच काळ साचून राहिले तर त्याचे डबके बनते तसेच आयुष्य ठराविक साच्यात जगले तर कंटाळवाणे बनते . सुरक्षित खेळून तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करत नाही. तुम्ही साधारण आयुष्य जगता . जोखीम न घेता तुम्ही व्यवसाय चालवू शकत नाही. जोखीम न घेता तुम्ही उद्योजक बनू शकत नाही. माझा मित्र एका बँकेत शाखा प्रमुख आहे. आयुष्यात सर्वकाही सुरळीत असूनही त्याला कंटाळा आला होता. मी त्याला सांगितले कि तुझा जॉब बदल, दुसऱ्या मोठ्या बँकेत प्रयत्न कर जेथे आव्हानात्मक परिस्थिती असेल. त्याने प्रयत्न केला आणि अजून चांगला जॉब मिळवला.
जीवन हे निवडीवर अवलंबून असते . तुमचे उर्वरित आयुष्य किनाऱ्यावर बसून सुरक्षिततेत घालविण्याची निवड करता किंवा संधीचा वापर करून, पाण्यात झोकून धाडसी माणसाच्या आयुष्यात येणारे मौल्यवान क्षण अनुभवता. जोखीम घेतल्याने आत्मविश्वास दिसून येतो आणि तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे राहण्यास मदत होते. 'कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम हैं कहना' हे लक्षात ठेवून जोखीम घेण्याचे / बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य जो बाळगतो तो जिंकतोच. तेव्हा तुम्हीसुद्धा तुमच्या विचारात, जीवनात बदल घडवून आणण्यासाठी स्वतःचा मार्ग निवडा व उत्तम बदलाचे साक्षीदार व्हा.
जोखीम घेताना अपयश येण्याची शक्यता असते . पण अपयश हा एखाद्याच्या यशाच्या प्रवासाचा शेवट नसून सहसा सुरुवात असते. धोका पत्करण्याचा अर्थ असा नाही की असे बेधडकपणे करणे. विचारपूर्वक अभ्यास करून अंमलबजावणी करणे महत्त्वाचे असते . कोणतीही जोखीम न घेणे ही सर्वात मोठी जोखीम आहे. झपाट्याने बदलत असलेल्या जगात, जोखीम न घेणे हे धोरण अयशस्वी होण्याची हमी आहे.आपल्या मार्गावर ठाम राहणाऱ्या व्यक्तीला यश भलेही उशिरा मिळो पण ते मिळतेच . अशावेळी गरजेचं असतं तो स्वतःवरचा विश्वास, विचारांबद्दल असलेली स्पष्टता. तसेच मार्गावर निडरपणे चालत राहण्याची जिद्द.
जीवनात धोका पत्करावा, जिंकलात तर नेतृत्व करू शकता, पराभूत झालात तर मार्गदर्शन करू शकता !

0 

Share


Aarya
Written by
Aarya

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad