Bluepad | Bluepad
Bluepad
🌹🌹नात्यातील गोडवा🌹🌹
दत्तात्रय केरबा पाटील
दत्तात्रय केरबा पाटील
20th Sep, 2022

Share

🙂माझ्या वाचनात आलेल्या शेक्सपियर यांच्या एका कवितेमध्ये खूप सुंदर संदेश देण्यात आलेला आहे, की प्रत्येक माणसाला या रंगमंचावर वेगवेगळे रोल निभवावे लागतात.म्हणजे या पृथ्वीतलावर व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत.प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, रंग वेगळा , ढंग वेगळा, पोशाख वेगळा, आणि विचार ही वेगवेगळे.एका व्यक्तीला मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, वेगवेगळ्या रोल मधून जावं लागत.उदाहरणच घ्यायचं म्हटल तर एखाद्या स्त्रीला आई, अत्या, मावशी, आजी, काकी अशी बरीच पात्रे (रोल)सादर करावे लागतात.🙂🙂
आता ही सगळी पात्रे निभावताना नात्यातील गोडवा टिकून राहतो का? किंवा नात्यांमध्ये अंतर तर येत नाही ना? याच्याकडे कोण लक्ष देत असेल काय, किंवा पुढं जाऊन सांगायचं म्हटल तर नाती टिकून राहण्यासाठी कुठेतरी स्वतःला इतरांच्या बरोबर नाहीतर इतरांना स्वतःबरोबर मिळून मिसळून घेतल जात काय. असे एक ना अनेक प्रश्न आहेत ज्यांचा कधी किंचितसा का असेना पण कुणीतरी विचार केला असेल.🌹🌹
आपल्याच घरामध्ये बघा कोणत्या ना कोणत्या क्षुल्लक कारणावरून सुद्धा भांडणे ,रुसवे, फुगवे हे होतातच.पण अशा वेळी आपण आपला संयम राखला पाहिजे.कारण "राग" हा माणसाच्या अधोगतीचे लक्षण आहे.बापा,मुलाची भांडणे नवरा ,बायकोची भांडणे किंवा भावा ,भावांची भांडणे असतील तर त्या दिवशी घरातील वातावरण गढूळ होत, असमाधानी होत आणि आपल्या आयुष्यातील तो सरनारा दिवस जो की परत येणार नाही. तो आनंदात न जाता नाराजित जातो. अशा भांडणाच्या वेळी प्रत्येकाला आपला अहंकार प्रिय असल्यामुळे ,कोणीच माघार घेत नसत,याला कारण म्हणजे मी जर माघार घेतली तर माझे महत्त्व कमी होईल किंवा माझ्या (खोट्या )आत्मविश्वासाला तडा जाईल, हा प्रतेकाचा असणारा गोड गैरसमज.🙏🙏
मी अशी बरीच कुटुंबे बघितली आहेत जिथं पैसा ,प्रसिध्दी भरपूर आहे पण सुख ,समाधान क्वचितच,नाहीतर अगदी थोड्या प्रमाणात.पण अजून अशी बरीच कुटुंबे आहेत जिथं कुटुंबातील सगळी माणसे एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने राहतात.एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात.आणि कधी भांडण झालेच तर ते थोड्या वेळे पुरते,नंतर सगळं विसरून एकमेकात मिसळून जातात.ज्यामुळे नात्यातील गोडवा टिकून राहतो. आपल्या संपूर्ण कुटुंबात बघा थोड निरीक्षण केलं तर कळतं की कितीही भांडणं झाल तरी आपली आई जी या संपूर्ण कुटुंबाचा चेहरा मोहरा सांभाळते.?अगदी चूक कोणाचीही असली तरी सगळ्यांना व्यवस्थित समजून सांगते, पण घराचं घरपण मजबूत आणि घट्ट राहील याची काळजी घेते.🌄🌄
जसं प्रत्येक माणसाला वेगवेगळी पात्रे निभवावी लागतात त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाला आयुष्यात सात प्रकारच्या स्टेज मधून जावे लागते, म्हणजेच सात प्रकारची पात्रे किंवा भूमिका बजाव्या लागतात.जस बाल्यावस्था व शेवटी वृद्धावस्था.आता नाती म्हटल तर फक्त कुटुंबातीलच नसतात तर हे विश्व सुद्धा एक घर किंवा कुटुंबच आहे अस मानून जावं लागतं.कारण इथ घरातून बाहेर पडल्यावर भेटणाऱ्या प्रत्येक माणसाशी आपले काहीना काही नाते असतेच. हा! आता आपण ते नातेसंबंध कसे टीकवतो यावर सगळं अवलंबून आहे.या जगात पैशाने गरीब झाला तरी हरकत नाही पण मनाने कधीही गरीब होऊ नका.कारण पैसा ,गाडी,बंगला,स्थावर मालमत्ता किंवा बँक बॅलन्स यातली कोणतीच गोष्ट कोणीही सोबत नेऊ शकणार नाही. हे त्रिकालाबाधित सत्य आहे, पण जर आयुष्यभर तुम्ही तुमच्या गोड आणि प्रेमळ स्वभावामुळे माणसे जोडली किंवा नातेसंबंध घट्ट जपले.तर तुम्ही सर्वांच्या मनात एक चांगली व्यक्ती म्हणून चिरंतर राहाल याला अपवाद नाही.🙂🙂
जी जी माणसे मरणोत्तर कायम सकारात्मक स्मरणात राहिली ती सगळी नातेसंबंध जपणारी आणि अडी अडचणीला गोरगरिबांना मदत करणारी होती.त्या सर्वांच काम हे आदर्शवादी आणि समाजहिताचच होत.त्यामुळं एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आयुष्य खूप सुंदर आहे, त्याचा आनंद घ्या.प्रेम दिल्याने प्रेम वाढते आणि मत्सराणे मत्सर.तेंव्हा सर्वश्री प्रेमाने वागा, गरजूंना मदत करा, आपण या जगात ज्यावेळी नसू त्यावेळी सुद्धा आपली आठवण चांगला माणूस म्हणूनच काढली पाहिजे.कुणाला माहीत आयुष्य किती आणि कस आहे त्यामुळे सदासर्वदा हसत खेळत आनंदाने व्यतीत करा.एक एक सेकंद महत्त्वाचा आहे,कारण तो जाणारा सेकंद पुन्हा ना तुमच्यासाठी ना माझ्यासाठी परत येणार आहे.🌷🌷
जगाच्या दृष्टीने तुम्ही चांगली व्यक्ती होण्यासाठी खूप वेळ लागेल पण वाईट होण्याला एखादा क्षण पुरेसा आहे.तेंव्हा कायम चांगल्या व्यक्तींच्या संगतीमध्ये राहा, आपले प्रॉब्लेम्स शेअर करा किंवा दुसऱ्यांच्या प्रॉब्लेमवर सोल्यूशन द्यायचा प्रयत्न करत रहा.आपल्यामुळे कोणा व्यक्तीचा एक वेळ फायदा नाही झाला तरी चालेल पण नुकसान अजिबात होवू देवू नका.सत्कर्म करत रहा पण सत्कर्म करताना फळाची अपेक्षा ठेवू नका कारण त्याच फळ नक्की योग्य वेळी तुमच्या पदरात पडतच.🙂🙂
जाता जाता एवढंच सांगेन, सुखी राहा, आनंदी राहा आपल्या नात्यातील माणसांची काळजी घ्या आणि सर्वांशी असणारे नातेसंबंध अतिशय हळुवार काळजीपूर्वक जपा, कुणाचं मन आपल्यामुळे दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्या...धन्यवाद!!!🌷🌷
......stay safe and stay healthy !!!🙂🙂
लेखन : श्री.दत्तात्रय के पाटील.🙏🙏
🌹🌹नात्यातील गोडवा🌹🌹

179 

Share


दत्तात्रय केरबा पाटील
Written by
दत्तात्रय केरबा पाटील

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad