Bluepad | Bluepad
Bluepad
माणिक मोत्याचा देव्हारा
Meghraj Patil
Meghraj Patil
20th Sep, 2022

Share

माणिक मोत्याचा देव्हारा ग माझे माय
वर हाय सोन्याचा फुलवारा ग माझे माय
फुल आणावी कुठून ग माझे माय
वनमाळीच्या बागातून ग माझे माय
दिला मंडप अजब ग माझे माय
त्याला हिरंमाला लोंबती ग माझे माय
पहिली आरती मानाची ग माझे माय
भोळ्या भगताच्या घरी ग माझे माय सेवकाच्या घरी
यावे डोंगर सोडूनी ग माझे माय
लाविल्या कापुराच्या ज्योती ग माझे माय
पुढं जळती अगरबत्ती ग माझे माय
बाण हिल्लाल जळतो ग माझे माय
ओवाळू अंबाची मुरती ग माझे माय काळुची मुरती
ओवाळू काळूची मुरती ग माझे माय देवीची मुरती
पहिली आरती मानाची ग माझे माय
भोळ्या भगताच्या घरी ग माझे माय सेवकाच्या घरी
केली तांदळाची खीर ग माझे माय
बायच निवद बोडण ग माझे माय
आई राजा उद उद ग माझे माय
काळूबाईच चांगभलं ग माझे माय देवीच चांगभल
आरती होतीया आनंदान ग माझे माय होतीया आनंदान...

0 

Share


Meghraj Patil
Written by
Meghraj Patil

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad