Bluepad | Bluepad
Bluepad
षड्रिपु
Girish
Girish
20th Sep, 2022

Share

दंभ - दंभ म्हणजे ढोंग. मोठेपणा मिरवणे.
चार दांभिक लोक एकत्र आले तर कार्य तर होत नाहीचं पण भांडणे मात्र होतात. जे खरे ज्ञानी, वैरागी, निस्पृह असतात त्याना ढोंग करण्याची जरुरी नसते. दांभिक लोकांच्यात विवेक नसतो त्यामुळे ते दुःखी राहतात. कितीही ढोंग केले तरी त्या माणसाचे हातुन काहीच कार्य होत नाही.
अखंड आठवावे रे मरणाचे ध्यान अंतरी
तेव्हाचि उठे दंभ लोटे परोपरी ।।.
प्रपंच - प्रपंचामुळे " देव तो राहतो दुरी ". बालवयात आई, पोरवयात खेळ यापुढे देवाची आठवण होत नाही.
तरुणपणी लग्न झाल्यावर काम लोभेची भुलला. नंतर पोराबाळांच्यात वेळ जातो. खर्च वाढतो. माणूस अर्थार्जनासाठी फिरतो मग वृध्द होतो मग मृत्यू पावतो.
प्रपंचे भुलला प्राणी व्यर्थ आयुष्य वेचले.
षड्रिपू जिंकिले जेणे तोचि ज्ञानी महाभला ।
दीक्षेने उद्धरी लोका वैरागी तो उदासिन.
श्री समर्थ रामदास स्वामी.

178 

Share


Girish
Written by
Girish

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad