Bluepad | Bluepad
Bluepad
त्यादिवशी काय घडलं......
Tushar Vandhekar
Tushar Vandhekar
20th Sep, 2022

Share

त्यादिवशी काय घडलं......
वैशाली आणि रामचे नुकतेच लग्न झालं होतं. वैशाली, राम आनंदात रहात होते. राम एक प्रायव्हेट कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता. पगारही भरपूर होता. सकाळी १० वाजता त्याच्या स्विफ्ट कार मधून ऑफिसला जायचा व सायंकाळी ७ ला पर्यंत घरी. वैशाली त्याची वाट पहात रहायची. दोघे मस्त राजा राणी सारखे रहात होते.
राम ऑफिसला जात असल्याने त्याचा दिवस जात होता. मात्र, वैशाली घरी बोर होऊन जायची. लग्नाचे काही दिवस, नव्या फुलाच्या झाडाला कवळी फुल आल्या सारखे दिवस गेले. लग्नाच्या ८ महिन्यानंतर वैशाली आणि राममध्ये वादीवाद होऊ लागले.
वैशाली, रामकडे जॉबसाठी हट्ट करू लागली. माझा घरात दिवस जात नाही, मी पण जॉब करते वैशाली सांगू लागली. पण राम मात्र, वेळ मारून नेयचा. बघू म्हणून निघून जायचा... नंतर घरात वादीवाद नकोत म्हणून राम वैशालीच्या जॉबला हो म्हणाला..
१५ दिवसांनी वैशालीला छान जॉब मिळाला. आता दोघेही घरात खुश होते. रविवारी दोघांना सुट्टी असायची त्यादिवशी तो हॉटेल, फिरणे, चित्रपट असे प्लॅन त्यांचे ठरलेले असायचे... एक दिवस सकाळी वैशालीचे पोट दुखायला लागल्याने, राम तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला... डॉक्टरांनी सांगितले, राम यापुढे तुम्हाला वैशालीची काळजी करावी लागेल. तुम्ही बाबा होणार आहे...
रामने, वैशालीकडे पाहिले आणि छान स्माईल दिली. रामाचे पाय जमीनीवर राहतच नव्हते. घरी येताना रामाने गाडीमध्ये गाणं लावले...ग कुणीतरी, ग पारुताई, ग कुणीतरी येणार येणार ग..पाहुणा घरी येणार येणार ग.... रामाने ऑफिसला दोन दिवसांची सुट्टी टाकून दिली. व रात्री हॉटेलला जेवण करण्यासाठी निघून गेले. दोघे आज खूप खुश होते.
रुटिंगप्रमाणे दोघे जॉबला जाऊ लागले. राम जाम खुश होता. दोघे आता स्वप्न पाहू लागले. नाव काय ठेवायचे इथपासून ते त्याला किंवा तिला आयुष्यात डॉक्टर की, इंजिनीअर करायचं इथंपर्यंत यांचे स्वप्न रंगू लागले. वैशालीला आता ५ वा महिना लागला होता. रामाने तिला ऑफीसला जाऊ नकोस म्हणून बजावले..वैशाली म्हणाली एवढा महिना जाते त्यानंतर आराम करेल, असे सांगितले.. तो ठीक म्हणून ऑफीला गेला... राम वैशालीची काळजी घेऊ लागला...मात्र या धावपळीत रामची जास्त ओढाताण होत होती.
७ व्या महिन्यात राम वैशालीला माहेरी सोडून आला.. दोघे सकाळ संध्याकाळ फोनवर बोलायचे. एक दिवस दुपारी २ वाजता रामाला फोन आला.... फोन घेतला. तिकडून आवाज आला जावई वैशालीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहोत तुम्ही याल का..? सासर्‍यांचा फोन आल्याने रामला काही कळेना आत्ताशी सातवा महिना आहे, मंग हॉस्पिटलमध्ये का बोलावले असेल... वैशूला बरं नसेल का.. तिला त्रास होत असेल का.. असे नाना प्रकारचे प्रश्न रामला पडले. रामाने परत सासऱ्यांना कॉल केला. काय झालं विचारलं तेव्हा, त्यांनी सांगितले, वैशाली फरशीवरून पाय घासून पडली....
रामच्या काळजात चर्रर्रर... झालं त्याचे हातपाय थंड पडले. राम तातडीने हॉस्पिटला आला. डॉक्टरांनी सांगितले, वैशाली पडल्यामुळे पोटात रक्ताचा स्राव झाल्याने बाळाला स्वास नाही मिळाला. आणि त्याचा मृत्यू झाला. रामच्या पायाखालची जमीन सरकली वैशाली व राम धुमसून धुमसून रडत होते...किती तरी स्वप्न ह्या दोघांनी पाहिले होते. बागेत एखादं फुल उमलाव आणि वादळ येऊन फुलाचं झाड उन्मळून पडावं...अशी या दोघांची अवस्था झाली होती. वैशालीला घरी सोडण्यात आलं...
राम परत त्याच्या घरी निघाला घरी येत असताना दारू पिला. काही बाटल्या गाडीत ठेवल्या आणि दारू हायवेपासून पुढं आल्यानंतर टोलनाका पास केल्यानंतर डाव्या हाताला जंगलाच्या दिशेने साधारण ५ ते सहा किलोमीटर गाडी चालवत आला.. गाडी उभी करून बाहेर आला.. सोबत घेऊन आलेला दारू तो पीत बसला. रात्रीचे १० वाजले होते. बाटली माघे बाटली राम पित राहिला. काय वाईट केले कोणाचे आम्ही आमच्या आयुष्यात असे घडले म्हणून तो बोलू लागला. प्रचंड दारू पिल्यामुळे त्याला काही सुधारत नव्हतं. आणि तो तिथेच लोळत झोपी गेला.
पहाटे त्याला जाग आली. तो भानावर आला.. आणि त्याने गाडी चालू केली. गाडी वळून घेत असताना रामने पाहिले, कोणीतरी थिते बाजूला पडलेले आहे. तो खाली उतरून त्या व्यक्तीच्या जवळ गेला.. त्या व्यक्तीला हात लावून उठवण्याचा प्रयत्न करू लागला. जेव्हा रामने त्याला पलटी ककेलं तर त्याचा शर्ट रक्ताने माखला होता आणि त्याच्या पोटा जवळ मुंग्या लागल्या होत्या.. कुणीतरी खून केला आहे आणि बॉडी येथे आणून टाकली आहे. त्याच्या लक्षात आलं...राम तसाच बाजूला सारखला आणि पळत गाडी चालू करून निघून गेला..मात्र, राम अस्वस्थ होता. त्याला काहीच सुधारत नव्हते. एकतर आपल्या आणि वैशूच्या आयुष्यात एवढा मोठा प्रसंग घडला आणि दुसरं... आपण रात्री जिथे दारू पिऊन झोपलो थिते कोणाची तरी डेड बॉडी पहिली.... दुसऱ्या दिवशी गाय, म्हशी चारणाऱ्या माणसाने ती बॉडी बघितली. आणि गावातील सरपंचाला कळवले. सरपंचाने पोलिसांना कळविले. पोलिस त्या ठिकाणी आले, त्यांनी बॉडी ताब्यात घेतली, आणि पंचनामा केला. त्याठिकाणी दारूच्या बाटल्या आणि गाडीच्या टायराच्या निशाण दिसत होते. आणि पोलिसांचा शोध सुरू झाला....
कोणी मिसिंग आहे का..? जंगलाकडे किती गाड्या आल्या..? बॉडी कोणी टाकली..? पोलिसांनी टोलनाका पास करून जंगलाकडे जाणाऱ्या दोन गाड्या त्यांना टोलनाक्यावरील असलेल्या सीसीटीव्हीमध्ये दिसल्या. एक स्विफ्ट आणि दुसरी स्कॉर्पिओ.. स्कॉर्पिओ गाडीवर नंबर प्लेट नव्हती. त्यामुळे पोलिसांनी दुसऱ्या स्विफ्ट गाडीचा नंबर ट्रेस केला. तर ती गाडी रामच्या नावावर दिसली. आणि त्यांनी संशयित म्हणून रामला ताब्यात घेतल.
पंचनामामध्ये असलेल्या दारूच्या बाटल्यावरील बोटाचे ठसे आणि रामचे बोटाची ठसे मॅच झाले. डेड बॉडीच्या शर्टवर रामच्या बोटाचे ठसे मिळाले. पोलिसांनी राम व पुरावे कोर्टात सादर केले. आणि रमला सोळा दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली.....
१) आता पुढं काय होणार....?
२) रामला शिक्षा होणार का...?
भाग २ लवकर......
त्यादिवशी काय घडलं......
-तुषार वांढेकर

174 

Share


Tushar Vandhekar
Written by
Tushar Vandhekar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad