Bluepad | Bluepad
Bluepad
देहाचियारंगी २२
Vidyadhar Pande
Vidyadhar Pande
20th Sep, 2022

Share

पुस्तक तरी वाचून वाचून किती वाचावे?मामीशीही मोजकं बोलणं होई.डांबऱ्या भाऊजीची अधूनमधून चक्कर व्हायची.इकडचीतिकडची माहिती न विचारता कळायची.ते ही वारीला गेल्यापासून बंद झालं.म्हणून मी एकेदिवशी पुस्तक बदलायला कॉलेजला गेले.एम.ए.च्या अभ्यासक्रमाचे पुस्तक बदलून बाहेर आले.गेटला एक चाळीसीतील व्यक्ती भेटली.ते मला ओळखत होते.मला म्हणाले,
' तुम्ही सिमींताच ना .?
' हो तुम्हाला कसं काय माझं नाव माहिती.? " मी प्रति प्रश्न केला.
" मी अंकुश ठोंबरे माध्यमीकचा शिक्षक आहे.तुम्ही बी.ए.ला असताना कॉलेजमध्ये तुमची हुषार मुलगी म्हणून चर्चा व्हायची.येथील प्राध्यापक मंडळी माझे मीत्र आहेत.मी त्यांचेकडे सतत यायचो.तेव्हा तुमच्या समस्या घेऊन तुम्ही येत असत.तेव्हा नजरेत आलात.सध्या काय करता?"
" मी एम. ए.करतेय,घरी बसून.बी.ए.लास्ट येअरला लग्न झालं.वर्षभरात वीज पडून पती वारले.थकलेली सासू आहे.मुलबाळ झालं नाही.वर्षभरात सगळं संपलं."
" पुढे काय करायचे आहे.?" पुन्हा ठोबंरेनी प्रश्न विचारला.
मला तसं ताटकळत उभा राहून अनोळखी परपुरुषाशासी बोलनं अवघडल्यासारखे वाटत होते.तरी मला बोलावंसं वाटलं.
" खूप काही करावास वाटतं.पण पूढे काळाकुट्ट अंधार आहे.त्यात चाचपडत आहे. येऊ का मी ?" असे निरोपाचे बोलले.
पण शिक्षकांना विद्यार्थी कसे हताळयचे, हे चांगले माहीती असते.ते म्हणाले,
" थांबा,आपण चहा घेऊ."
मलाही थोडासा विरंगुळा हवाच होता.घरीगावी रोजची तेचं माणसं,त्याच कंटाळवाण्या गप्पागोष्टी.विट आला होता.
"मला सार्वजनिक वाचनालयात जायचं आहे." असं मी लटकेच म्हणाले.ते विषयांतर करत म्हणाले,
" तुम्ही एकदोन वेळा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बैठकीला आला होतात का?"
" हो आले होते.पण पुन्हा कॉलेज बंद झाले.लग्नाच्या बेडीत अडकले.तसे फुलेवाडीत देवधर्माच्या कोंडाळ्यात." ते म्हणाले,
"खेड्यात खरी गरज आहे माणसं शहाणे करण्याची.तेथील दारिद्रय व भोळेपणाचा फायदा घेऊन भोंदूगिरी खूप प्रमाणात चालवली जाते. ती कुप्रथा क़ुठे तरी थांबली पाहिजे."
"गुरुजी ते खरे आहे.किर्तनकार मोठ्या प्रमाणात समाजाला खोटं बोलून लूटत आहेत.तुकाराम महाराज विमानातून वैकुंठाला गेले,असं सांगतात.इतकं खोट बोलून समाजातील भोळ्याभाबड्या माणसाचा खिसा रिकामा करतात.अधीच एवढी प्रचंड महागाई वाढलेली.शेतीची तेवढीच दुर्दशा झाली आहे.त्यातून गावोगावी वर्षाकाठी दोन-तीन सप्ते होतात.त्यात सामान्य माणसाच्या प्रपंचातील पैसा गावकरी जबरदस्तीने हिसकावून घेतात.ते किर्तनकारांची झोळी भरतात.ही चोरी नव्हे तर दिवसाढवळ्या टाकलेला डाका आहे.असे मला वाटते.हे कुठंतरी थांबवलं पाहिजे.अस मला सतत वाटतं.पण काय करणार माझ्यासारख्या दुर्बल माणसाच काय चालतं ? खूप भिषण अवस्था आहे.मन खिन्न होतं.सगळी दुरावस्था पाहून."
"हो सिमींता , हे सत्य तुमच्या सारख्या सुशिक्षित महीलानी जाहीर मांडलं पाहिजे."
"हो " म्हणून मी उठण्याच्या तयारीत होते.गुरुजीनी पुन्हा हाताने बसण्याची खूण केली.
क्रमशः
देहाचियारंगी २२

190 

Share


Vidyadhar Pande
Written by
Vidyadhar Pande

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad