Bluepad | Bluepad
Bluepad
मनाची मध्यरात्र....एक नवी सुरुवात.
डॉ अमित.
डॉ अमित.
20th Sep, 2022

Share

मनाची मध्यरात्र....एक नवी सुरुवात.
मनाची मध्यरात्र....एक नवी सुरुवात.
मनाची मध्यरात्र....एक नवी सुरुवात.
जाग आली अशीच एकदा
मनाच्या मध्यरात्री
स्वप्नांत होतो मी की खरेचं
जागा होतो नव्हती खात्री...
किर्र अंधार होता पसरला
मनात होती भीती काहीशी दाटली
रातकिड्यांची गुणगुणही तेंव्हा
उगाचच मनाला भयाण अशी वाटली
दिवसाचं अंतिम रूप म्हणू तिला
की म्हणू नव्या पहाटे पूर्वीची रात्र
शेवटचा नूर म्हणू तिला की
आरंभीचा सूर म्हणून गात राहू मी सर्वत्र
रात्र कोणतीच शेवटची नसते
प्रत्येक रात्रीची होत असते पहाट
आरंभीचा नि शेवटीचा ही सा च असतो
यातच तर सजतो सुरांच्या महफिलीचा थाट
रात्रीचीही नशा असते वेगळीच
म्हणूनच का म्हणतात तिला निशा
जगतानाही तीच असते प्रेरणादायी
तीच दाखवत राहते सदा योग्य दिशा
मध्यरात्र रोजची असो वा असो मनाची
तीचं असते सोबती तीच असते सखा
मरगळलेल्या मनाला देते पुनर्जीवन
नि देते या जीवनाला नवा वसा सारखा...
डॉ अमित.
मंगळवार.
२० सप्टेंबर २०२२.

189 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad