Bluepad | Bluepad
Bluepad
सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक समाज.
sagar parkhe
sagar parkhe
19th Sep, 2022

Share

स्त्री, दलित आणि बहुजनावरील ब्राह्मणी धर्माचे लादलेले ओझे हलके करण्यासाठी महात्मा फुलेंनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पारंभी सात सदस्यांच्या उपस्थित हि स्थापना झाली. या सात सदस्यांनी तळीभंडारा उचलून ह्या समाजाचे सदस्यत्व स्वीकारले. सन 1877 च्या दुष्काळात ह्या समाजाने मोलाचे कार्य केले. ज्योतिरावंच्या निष्ठावान सहकाऱ्यांनी सण 1960 पर्यंत या चळवळीचा जवळपास संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार आणि प्रसार केला. या चळवळीच्या अनुषंगाने सावित्रीबाईच्या सत्यशोधकी कार्याचा येथे आढावा घ्यायचा आहे.
सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक समाज.
सावित्रीबाई एक आदर्श गृहणी होत्या, सत्यशोधक समाज स्थापन झाल्यानंतर तीन महिन्यानंतर समाजाच्या वतीने पहिला क्रांतिकारी विवाह पार पडला या संदर्भातील सावित्रीबाईची भूमिका व्याख्याणाजोगी आहे. या विवाहप्रसंगी त्यांना अपार कष्टा खाल्ल्या. सत्यशोधक समाजाच्या नोंदणीकृत यादीत सावित्रीबाईचे नाव नसले तरी, त्या समाजाच्या खऱ्या कार्यकर्त्या होत्या. सत्यशोधक समाजाच्या वतीने पार पाडणाऱ्या विवाह समाजाने पुरोहित नाकरून साध्या पद्धतीने हुंडाविना कमी खर्चातील विवाह लावायचा कार्यक्रम हाती घेतला. या क्रांतिकारी कार्यास सावित्रीबाईंचा पुढाकार होता.
आज आपण 21 व्या शतकाची वाटचाल करीत आहोत. ही वाटचाल करीत असताना किती जणांना, प्रामुख्याने किती महिलांना सावित्रीबाईंनी समाजासाठी केलेल्या कार्याची तोंड ओळख आहे. या प्रश्नाचे अनुषंगाने उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर पदरी प्रचंड निराशाच पडेल. बहुसंख्य महिलांना आता त्यांच्या शैक्षणिक कार्याचा परिचय होत आहे. या कार्याचा परिचय करून घेण्यासाठी आमच्या भगिनींची धडपड आता दिसत आहे ही धडपड स्तुत्य आहे.
सत्यशोधक समाजाची विचारसरणी म्हणजे मानवमुक्तीची पहाट आहे. ह्या पार्टीकडे जाणारी ही पाऊलवाट सत्यवानच्या सावित्रीबाईंच्या वाटेने न जाता ज्योतिरावंच्या व सावित्रीबाईंच्या विचारांच्या वाटेने जाते. प्रामुख्याने वटसावित्री पौर्णिमेला वडाला पुजणे ऐवजी आता आमच्या भगिनी सावित्रीबाईंना पुज्य आहे.आणि आता फक्त त्यांच्या विचारांची ओळख करून घ्यावी. व त्यानी केलेले कार्य, परंपरा, धार्मिक गुलामगिरी, अंधश्रद्धा या देशासंदर्भातील त्यांची वैचारिक भूमिका समजून घ्यावी, ह्या विचारांच्या ओळखीने मानवता केंद्र घटनेस फार मोठी मदत होईल कधी नव्हे एवढेसे विचारांची आज गरज भासत आहे एवढेच.
लेखक-सागर पारखे.

181 

Share


sagar parkhe
Written by
sagar parkhe

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad