Bluepad | Bluepad
Bluepad
नात्यातील दुरावा
नयन धारणकर
19th Sep, 2022

Share

आलो परत शहरात तेव्हाच मित्राकडे
धाडला होता बोलावण्या तुला सांगावा
पण एवढ्या तेवढ्या क्षुल्लक गोष्टींवर
माणसाने का करावा इतका कांगावा ?
कंटाळा आला सगळ्याचा मला आता
हा रुसवा तरी कसा म्हणायचं सुटावा
सोड राणी ये मिठीत माझ्या गं साजणी
सॉरी शब्द अजून किती वेळा लुटावा
लक्षात नाही आलं दिलेला निरोप माझा
तुझ्यापर्यंत कदाचित पोहोचला नसावा
तरी म्हणतो रोज कधीही लागणारा कॉल
आज नेटवर्क कव्हरेज बाहेर बरा असावा
वाटतं खूपदा मनापासून गैरसमजूतीपेक्षा
प्रेमात आपल्या सुगंध विश्वासाचा उरावा
वाद, भांडणातून राग निर्माण झाला तरी
नको पुन्हा कधी दोघांच्या नात्यात दुरावा
- नयन धारणकर,नाशिक

186 

Share


Written by
नयन धारणकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad